पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेंढपाळ पालकांचा मुलगा बनला एसबीआयमध्ये ज्युनिअर असोसिएट; संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी

इमेज
मेंढपाळ पालकांचा मुलगा बनला एसबीआयमध्ये ज्युनिअर असोसिएट;  संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी  पुरंदर :         प्रत्येक यशामागे संघर्षाची एक कहाणी दडलेली असते. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनसामग्री यांवर मात करत एका मेंढपाळ कुटुंबातील मुलाने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. अर्जुन बिरा महानवर याची भारतीय स्टेट बँकेत (SBI) ज्युनिअर असोसिएट (JA) पदावर निवड झाली आणि मेंढपाळांच्या झिरिपवस्तीत आनंद साजरा झाला.      पुरंदर तालुक्याच्या गुळूंचे कर्नलवाडी येथील झिरिपवस्तीतील अर्जुनचे आई-वडील पारंपरिक पद्धतीने मेंढ्या राखून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ग्रामीण आणि साध्या वातावरणात वाढलेल्या अर्जुनने लहानपणापासूनच शिक्षणाला प्राधान्य दिले. घरची परिस्थिती मर्यादित असतानाही त्याने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले. अनेक अडचणी, अभाव आणि संघर्ष असूनही त्याने हार मानली नाही.     अर्जुनचे प्राथमिक शिक्षण पुरंदर तालुक्यातील झिरिपवस्तीच्या पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. मा...

इतिहासावर बुलडोझर नको!” निरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर हात टाकताच संताप उसळला; निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा

इमेज
इतिहासावर बुलडोझर नको!” निरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर हात टाकताच संताप उसळला; निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा  पुरंदर :           पुरंदर तालुक्यातील निरा नदीवरील सुमारे शतकभर जुना ब्रिटिशकालीन दगडी पूल पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी दिल्याची माहिती समोर येताच निरा व पाडेगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याशी ऐतिहासिक, धार्मिक आणि भावनिक नाते असलेल्या या पुलाला बुलडोझर लावण्याऐवजी त्याचे जतन व बळकटीकरण करावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली असून, प्रशासनाने निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.            निरा नदीवरील हा दगडी पूल सुमारे १९२७ मध्ये वाल्हाचे अभियंता कृष्णा मांडके यांनी उभारल्याचे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील हा पूल वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी लाखो भाविकांच्या साक्षीने संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या पुलावरू...

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना दिलासा; कोण राहणार प्रशासक, राज्य सरकारचा तात्पुरता तोडगा

इमेज
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच राहणार प्रशासक, राज्य सरकारचा तात्पुरता तोडगा  मुंबई :         राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयातील गुंता अखेर सुटला असून २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित संख्या लक्षात घेता प्रशासनात सातत्य राखण्यासाठी हा तात्पुरता उपाय करण्यात आला आहे.      राज्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत एकाच कालावधीत संपत असल्याने प्रशासक नियुक्तीचा प्रश्न निर्माण झाला होता. जानेवारी २०२६ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर स्वतंत्र प्रशासक नेमण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकाऱ्यांची अपुरी संख्या आणि ग्रामपंचायतींची मोठी संख्या यामुळे प्रशासनास अडचणी येण्याची शक्यता होती.        ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने सुधारित निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार, ...

“मी माझ्या मर्जीने जहीरसोबत आले, आई-भावाची तक्रार खोटी” — भिगवण प्रकरणात तरुणीचे प्रतिज्ञापत्र; कुटुंबीयांचा अपहरणाचा आरोप कायम

इमेज
 “मी माझ्या मर्जीने जहीरसोबत आले, आई-भावाची तक्रार खोटी” — भिगवण प्रकरणात तरुणीचे प्रतिज्ञापत्र; कुटुंबीयांचा अपहरणाचा आरोप कायम       बारामती  इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून २१ वर्षीय तरुणी आणि संबंधित तरुण स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. तरुणीने पोलिसांसमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण पूर्णपणे स्वेच्छेने जहीर शेखसोबत आल्याचे स्पष्ट केले आहे. प्रतिज्ञापत्रात तिने नमूद केले आहे की, “आमचे गेल्या एक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. माझ्यावर कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. आई आणि भावाने दिलेली तक्रार खोटी आहे. मी सज्ञान असून पुढील आयुष्य जहीरसोबतच व्यतीत करणार आहे.” हजर होण्यापूर्वी काही राजकीय व्यक्तींनी केलेले आरोपही निराधार असल्याचे तिने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांनी मात्र तिच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. तिच्या भावाने “बहिणीला जबरदस्तीने नेण्यात आले, आम्हाला मारहाण करून डोळ्यात चटणी फेकली,” असा आरोप करत मुलगी आमच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी केली आहे. तर मामाने...

जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता दुर्गाडे यांनी केली कामाला सुरुवात. प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत दिल्या सुचेना

इमेज
जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता दुर्गाडे यांनी केली कामाला सुरुवात. प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत दिल्या सुचेना निरा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राजक्ता दुर्गाडे यांची सदिच्छा भेट; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचा गौरव पुरंदर : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा देणाऱ्या निरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पुणे जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता दुर्गाडे यांनी सदिच्छा भेट देत तेथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली. रुग्णसेवेसाठी केलेल्या अखंड परिश्रमांची दखल घेत त्यांच्या समस्या जाणून घेत जिल्हा परिषदेमार्फत आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.         निरा येथील आयुष्यमान आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागासाठी आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. आपत्कालीन सेवा, लसीकरण मोहिमा, माता-बाल संगोपन, तसेच विविध आरोग्य जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र समाजाच्या आरोग्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत आहे. या सर्व उपक्रमांची माहिती घेत दुर्गाडे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.    ...

तुमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पहिले पाऊल जानेवारी ते डिसेंबर २०२६ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

इमेज
तुमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पहिले पाऊल  जानेवारी ते डिसेंबर २०२६ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर  मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :            माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनच्या ग्राम विकास विभागाने या संदर्भात सविस्तर आदेश जारी केला असून, निवडणूक प्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.       राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभाग रचनेची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील सुधारित तरतुदींनुसार ही कार्यवाही केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपण्याच्या सहा महिने अगोदर त्यांच्या क्षेत्र व हद्दीत कोणताही बदल करता येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.     ...

तुमच्या गावचा कारभारी कोण? ६७ ग्रामपंचायतींवर १० प्रशासकांची नियुक्ती पुरंदर तालुक्यात प्रशासकीय कारभार हाती; अधिकारीनिहाय गावांची जबाबदारी निश्चित

इमेज
तुमच्या गावचा कारभारी कोण? ६७ ग्रामपंचायतींवर १० प्रशासकांची नियुक्ती  पुरंदर तालुक्यात प्रशासकीय कारभार हाती; अधिकारीनिहाय गावांची जबाबदारी निश्चित  पुरंदर :      पुणे जिल्हा परिषद यांच्या आदेशानुसार पुरंदर तालुका अंतर्गत ६७ ग्रामपंचायतींवर १० प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने पुढील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी प्रशासकीय कारभार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.       जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकारीनिहाय गावांची जबाबदारी निश्चित केली असून प्रत्येक अधिकाऱ्याकडे ठराविक ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे. त्यानुसार पुरंदर पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी बी.बी. चखाले यांच्याकडे साकुर्डे, दौंडज, कोळविहीरे, केतकावळे, सुपे खुर्द, पिंपळे, भिवडी, पूरपोखर व देवडी अशी ९ गावे देण्यात आली आहेत.  पुरंदर पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी एस.डी. कांबळे यांच्याकडे कुंभारवळण, दिवे, सोनोरी, झेंडेवाडी, जेऊर, परिंचे, वाघापूर व गुऱ्होळी अशी ८ गावे सोपविण्यात आली आहेत. ...

निरा येथे घरफोडी; १२.६२ लाखांचा ऐवज लंपास पोलीसांनी तपास यंत्रणा तत्काळ कामाला लावली.

इमेज
निरा येथे घरफोडी; १२.६२ लाखांचा ऐवज लंपास पोलीसांनी तपास यंत्रणा तत्काळ कामाला लावली.  निरा (ता. पुरंदर) :         पुरंदर तालुक्यातील नीरा येथील पालखी तळाच्या परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १२ लाख ६२ हजार ७६० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास यंत्रणा तत्काळ कामाला लागली असुन वेगात तपास सुरू केला आहे.       जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 39/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 305, 331(4), 331(5) अन्वये अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद निरेतील प्रसिद्धी व्यावसायिक उत्तम किसनराव आगवणे (वय ६९ वर्षे) यांनी दिली आहे. आगवणे यांचे मोरगाव येथे पेट्रोल पंप, निरा बस स्थानकासमोर चप्पल दुकान व राधाकृष्ण मंगल कार्यालय असे व्यवसाय आहेत. ते 'कृष्णकूंज' नगर सातारा रोड निरा वॉर्ड नं. ६, ता. पुरंदर येथील स्वमालकीच्या इमारतीत राहतात.       पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार...

पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण काय ? १३ तालुक्यांतील पंचायत समिती सभापती आरक्षणाची स्थिती.

इमेज
पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण काय ?  १३ तालुक्यांतील पंचायत समिती सभापती आरक्षणाची स्थिती.  पुणे :        ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी सन २०२५ सालाकरिता आरक्षण ऑक्टोबर महिन्यात जाहीर करण्यात आले आहे. ही अधिसूचना महाराष्ट्र शासन यांच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.       महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती) आणि पंचायत समिती (सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम १९६२ अन्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.        दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार आणि दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या सोडतीनुसार पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे :  १) इंदापूर – अनुसूचित जाती २) जुन्नर –...

पांचाळ, गायकवाड यांना ‘मार्तंड भूषण’ पुरस्कार

इमेज
 पांचाळ, गायकवाड यांना ‘मार्तंड भूषण’ पुरस्कार जयमल्हार ग्रामीण विकास संस्थेच्या वर्धापनदिनी होणार सन्मान सोहळा नीरा         जयमल्हार ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या वार्षिक वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘मार्तंड भूषण’ पुरस्कार यंदा दिग्दर्शक प्रकाश पांचाळ आणि कार्यशील समाजसेवक शिक्षक सुशील गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. दि. १३ फेब्रुवारी रोजी पुरंदर येथील असेंड इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे. गेल्या अकरा वर्षांपासून संस्थेच्या वतीने राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो. याआधी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर, खेळाडू, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दिग्दर्शन व पटकथा लेखनाच्या कौशल्याने ठसा उमटविणारे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश पांचाळ यांना ‘मार्तंड कला रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच निवृत्तीनंतरही शिक्षण क्षेत्रात विज्ञान प्र...

जेजुरीत विजेच्या डीपीला चिकटून अनोळखी तरुणाचा मृत्यू

इमेज
 जेजुरीत विजेच्या डीपीला चिकटून अनोळखी तरुणाचा मृत्यू जेजुरी, दि. 10 फेब्रुवारी 2026   – जेजुरी येथील कडेपठार रोडवर हॉटेल मल्हार एम्पायर समोर एक धक्कादायक घटना घडली. विजेच्या लाईटच्या डीपीला चिकटून एक अनोळखी पुरुष जळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेण्यात आली. पोलिस स्टाफ व स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीस बाजूला काढून तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याच्या अंगात काळ्या रंगाचे अर्धवट जळालेले जर्किन आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट आढळून आली आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत रमेश भोंगळे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून त्यावरून अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 13/26 बी.एन.एस.एस. 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नांद...

निरा–शिवतक्रार व कोळविहिरेमध्ये राष्ट्रवादीचा निर्णायक विजय

इमेज
 निरा–शिवतक्रार व कोळविहिरेमध्ये राष्ट्रवादीचा निर्णायक विजय शिवसेनेला मोठा धक्का, प्राजक्ता दुर्गाडेंची ‘कामातून उत्तर’ देण्याची भूमिका   नीरा  पुरंदर तालुक्यातील निरा–शिवतक्रार जिल्हा परिषद गट आणि कोळविहिरे व निरा–शिवतक्रार पंचायत समिती गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निकालामुळे मागील निवडणुकीत शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघांमध्ये यावेळी शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. निरा–शिवतक्रार जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांनी 13,521 मते मिळवत विजय मिळवला. शिवसेनेच्या भारती अतुल म्हस्के यांना 7,803 मते मिळाली. प्राजक्ता दुर्गाडे यांनी 5,748 मतांची ठोस आघाडी घेत शिवसेनेचा पराभव केला. पंचायत समितीच्या कोळविहिरे गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता निगडे यांनी 5,729 मते मिळवत शिवसेनेच्या शीतल साळुंखे यांचा 1,066 मतांनी पराभव केला. शीतल साळुंखे यांना 4,663 मते मिळाली. तसेच निरा–शिवतक्रार गणात राष्ट्रवादीच्या मोनिका कांबळे यांनी 6,109 मते मिळवत भाजपच्या वंदना भोसले यांच...

पुरंदरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का

इमेज
 पुरंदरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का आमदार विजय शिवतारे यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा फटका, राष्ट्रवादी–भाजपची सरशी सासवड  पुरंदर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाने शिवसेनेसाठी चिंताजनक चित्र निर्माण केले आहे. तालुक्याचे आमदार विजय शिवतारे यांना या निवडणुकीत मोठा राजकीय फटका बसला असून, जिल्हा परिषदेत शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. मागील नगर परिषद निवडणुकीनंतर हा सलग दुसरा मोठा पराभव असल्याने पुरंदरमधील शिवसेनेची पकड सैल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने महत्त्वाच्या गटांवर विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी–भाजपचा दबदबा तालुक्यातील दिवे–गराडे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली अमोल झेंडे यांनी 21,824 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात भाजपच्या दिव्या जगदाळे यांना 7,834 मते मिळाली. झेंडे यांनी तब्बल 13990 मतांची मोठी विजयी आघाडी घेत राष्ट्रवादीचा गड मजबूत केला. बेलसर–माळसिरस गटात भाजपचे अजय कैलास इंगळे यांनी 7,637 मते मिळवत...

अजित दादा नाहीत मग पुणे जिल्हा परिषदेमध्ये जनतेने कोणाला दिला?

इमेज
 अजित पवारांच्या निधनानंतरही पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व कायम ५१ जागांवर विजय; मतदारांनी ‘दादांच्या विचारांनाच’ दिला कौल   बारामती: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी भावनिक नव्हे, तर ठाम राजकीय निर्णय घेतल्याचे चित्र समोर आले आहे. गेली अनेक वर्षे अजित पवारांचे पुणे जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. त्यांच्या निधनानंतरही तोच विश्वास मतदारांनी कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांवर मोठा कौल दिला आहे. पुणे जिल्हा परिषदेत एकूण ७३ जागा असून बहुमतासाठी ३७ जागांची आवश्यकता होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल ५१ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा केवळ गाठलाच नाही, तर तो मोठ्या फरकाने ओलांडला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने ७२ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी ५१ उमेदवार विजयी झाले आहेत. ‘व्यक्ती गेली, पण विचार जिवंत’ – मतदारांचा संदेश अजित पवार यांच्या कालीन निधनानंतर पक्षासमोर नेतृत्व, संघटन आणि विश्वास टिकवण्याचे मोठे आव्हान होते. मात्र या निवडणुकीत मतदारांनी...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : प्रशासनाची जय्यत तयारी, सोमवारी सकाळी किती वाजता मतमोजणी होणार?

इमेज
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : प्रशासनाची जय्यत तयारी, सोमवारी सकाळी किती वाजता मतमोजणी होणार?  पुणे :          पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी पार पडलेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि.०९) सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सर्व निर्धारित (तालुक्याच्या मुख्यालयात) मतमोजणी केंद्रांवर एकाचवेळी सुरू होणार आहे.       मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सीसीटीव्ही देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक कर्मचारी व माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.        जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निकालाबाबत राजकीय वातावरण तापले असून, प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांचे भवितव्य सोमवारी स्पष्ट होणार आहे. काही तालुक्यां...

पुरंदर तालुक्यात ६८.३२ टक्के मतदान चार जिल्हा परिषद गटांत १ लाख २९ हजार ४०७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

इमेज
पुरंदर तालुक्यात ६८.३२ टक्के मतदान चार जिल्हा परिषद गटांत १ लाख २९ हजार ४०७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क  पुरंदर :         पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. थंडीमुळे सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग मंद असला, तरी दुपारनंतर मतदारांचा उत्साह वाढताना दिसून आला. सायंकाळी साडेपाचनंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. अखेर तालुक्यात चारही जिल्हा परिषद गटांत सरासरी ६८.३२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली.      शनिवार सकाळी पहिल्या दोन तासांत चारही गटांत मिळून ८.१० टक्के मतदान झाले होते. अकरा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी २१.५१ टक्क्यांवर पोहोचली. दुपारी दीड वाजेपर्यंत ३७.५५ टक्के, तर साडेतीन वाजेपर्यंत ५०.७५ टक्के मतदान झाले. सायंकाळनंतर मतदानाचा वेग आणखी वाढत गेला आणि अखेरीस रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणची मतदान यंत्रे तालुका निवडणूक कार्यालयात जमा करण्यात आली.         तालुक...

पुरंदर तालुक्यात मतदान जोमात; साडेतीन वाजेपर्यंत ५०.७५ टक्के मतदान

इमेज
पुरंदर तालुक्यात मतदान जोमात; साडेतीन वाजेपर्यंत ५०.७५ टक्के मतदान  पुरंदर :        पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शनिवारी शांततेत मतदान सुरू आहे. सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत तालुक्यातील विविध गटांमध्ये ८.१० टक्के मतदान झाले होते. अकरा वाजेपर्यंत मतदानाचा टक्का वाढून २१.५१ टक्क्यांपर्यंत, दिड वाजेपर्यंत ३७.५५, त्यानंतर आता साडेतीन वाजेपर्यंत ५०.७५ टक्के पोहोचल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.       तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये मतदारांचा संमिश्र प्रतिसाद दिसून येत आहे. गराडे गणात सर्वाधिक ५९.७५ टक्के मतदान झाले असून दिवे गणात ५७.९८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. बेलसर गणात ४८.२२, माळशिरस गणात ४९.७, वीर गणात ४९.१३ टक्के मतदान झाले आहे. भिवडी गणात ४६.८२, निरा गणात ४६.९ तर कोळविहिरे गटात ४८.१३ टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांची हळूहळू वाढती गर्दी दिसून येत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिला मतदारांनी सक...

पुरंदर तालुक्यात मतदानाला सुरुवात; अकरा वाजेपर्यंत २१.५१ टक्के मतदान

इमेज
पुरंदर तालुक्यात मतदानाला सुरुवात; अकरा वाजेपर्यंत २१.५१ टक्के मतदान  पुरंदर :        पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शनिवारी शांततेत मतदान सुरू आहे. सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत तालुक्यातील विविध गटांमध्ये ८.१० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर अकरा वाजेपर्यंत मतदानाचा टक्का वाढून २१.५१ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.       तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये मतदारांचा संमिश्र प्रतिसाद दिसून येत आहे. गराडे गटात सर्वाधिक २७.३८ टक्के मतदान झाले असून दिवे गटात २५.५७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. बेलसर गटात २०.३६, माळशिरस गटात २१.१७, वीर गटात २०.२४ टक्के मतदान झाले आहे. भिवडी गटात १८.८१, निरा गटात १९.२० तर कोळविहिरे गटात १९.३४ टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांची हळूहळू वाढती गर्दी दिसून येत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिला मतदारांनी सकाळच्या वेळेत मतदान करण्यास प्राधान्य दिल्याचे चित्र आह...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पुरंदरचे प्रशासन सज्ज : वर्षा लांडगे ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी पुरंदर तालुक्यात १.९४ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार

इमेज
 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पुरंदरचे प्रशासन सज्ज : वर्षा लांडगे  ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी पुरंदर तालुक्यात १.९४ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार  पुरंदर :      पुरंदर तालुक्यात होणाऱ्या पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीत होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.         पुणे जिल्हा परिषद व पुरंदर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक होत आहे. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी १६ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार १६ ते २१ जानेवारीदरम्यान नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आली, २२ जानेवारी रोजी छाननी पूर्ण झाली, तर २७ जानेवारी रोजी उमेदवारी माघारी घेण्याची प्रक्रिया पार पडली.  जिल्हा परिषदेसाठी १९, पंचायत समितीसाठी ३३ उमेदवार जिल्हा परिषद ...

दादांशिवाय पहिलीच सांगता… पुरंदर गहिवरला; आठवणींनी भर सभेत अश्रू अनावर

इमेज
 दादांशिवाय पहिलीच सांगता…  पुरंदर गहिवरला; आठवणींनी भर सभेत अश्रू अनावर  पुरंदर :          पुणे जिल्हा परिषद व पुरंदर तालुका पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. मात्र यावेळी प्रचाराची सांगता नेहमीसारखी नव्हती, ती होती मौनात, आठवणींत आणि अश्रूंमध्ये. पुरंदर आणि बारामती तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीचा शेवट ज्यांच्या दमदार, ज्वालाग्राही आणि लोकांच्या काळजात घर करणाऱ्या सभेने व्हायचा, ते दिवंगत अजित पवार आज प्रत्यक्षात नव्हते. पण त्यांच्या आठवणी मात्र प्रत्येक कार्यकर्त्याच्या, उमेदवाराच्या आणि मतदाराच्या डोळ्यांत पाण्यासारख्या दाटून आल्या होत्या.      दादांच्या सांगता सभेशिवाय प्रचाराची सांगता होणे, हे पुरंदरकरांसाठी अवघड क्षण होते. विमान अपघातात त्यांच्या आकस्मिक निधनामुळे यंदा ती सभा होऊ शकली नाही. मात्र, त्यांनी मागील निवडणुकांत गाजवलेल्या असंख्य सांगता सभांच्या आठवणी आजही जिवंत आहेत—आणि त्याच आठवणींनी गुरुवारी नीरा-कोळविहीरे जिल्हा परिषद व पुरंदर तालुका पंचायत समितीच्या निमित्ताने झालेल्या कोपरा सभेत उपस्थितांचे मन गह...

“२४ तास काम हाच आमचा अजेंडा; पुरंदरचा अखंड विकासच आमची ताकद” – प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचा निर्धार

इमेज
“२४ तास काम हाच आमचा अजेंडा; पुरंदरचा अखंड विकासच आमची ताकद” – प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचा निर्धार  पुरंदर :       “निवडणूक आली म्हणून काम नाही, तर पाच वर्षे—बाराही महिने पुरंदरच्या विकासासाठी झटणे हाच आमचा अजेंडा आहे,” असे ठाम प्रतिपादन शिवसेनेचे नेते व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित सभेत केले.        कडक उन्हातही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांकडे पाहून, “शिवसेनेचा निष्ठावंत, शंभर टक्के बांधिल कार्यकर्ता आजही ताठ उभा आहे,” असा विश्वास शिवतारेंनी व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, “२४ तास काम आणि पुरंदरचा अखंड विकास हीच आमची एकमेव स्ट्रॅटेजी आहे,” असे शिवतारे यांनी स्पष्ट केले.  यावेळी उमेदवारांचा उल्लेख करत, “हे फक्त उमेदवार नाहीत, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा धनुष्यबाण आहे,” असे सांगण्यात आले. शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात २४...

विकास पदोपदी म्हणूनच राष्ट्रवादी! निरा–कोळविहीरे गटात आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती व रोजगाराचा ठोस वचननामा

इमेज
 विकास पदोपदी म्हणूनच राष्ट्रवादी! निरा–कोळविहीरे गटात आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती व रोजगाराचा ठोस वचननामा  पुरंदर :        निरा–कोळविहीरे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी विकासाला केंद्रस्थानी ठेवत सर्वसमावेशक व लोकाभिमुख असा वचननामा जाहीर केला आहे. आरोग्य, महिला सक्षमीकरण, शिक्षण, शेती, युवक रोजगार आणि पायाभूत सुविधांचा समतोल विकास साधण्याचा निर्धार या वचननाम्यात स्पष्टपणे मांडण्यात आला आहे.  आरोग्य व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे (PHC) सक्षमीकरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रत्येक PHC मध्ये तज्ज्ञ डॉक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ, अद्ययावत रक्तचाचणी सुविधा तसेच २४ तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महिलांसाठी गावोगावी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.       महिला आर्थिक सक्षमीकरणाचा ठाम संकल्प महिलांच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ठोस योजना मांडल्या आहेत....

निरा - कोळविहीरे गटातून सिमा धायगुडेंच्या प्रचाराचा झंजावात ! वाल्हे गावात आज रॅली, गटात विकासकामे करण्याचा संकल्प

इमेज
 निरा - कोळविहीरे गटातून सिमा धायगुडेंच्या प्रचाराचा झंजावात !  वाल्हे गावात आज रॅली, गटात विकासकामे करण्याचा संकल्प  पुरंदर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे सध्या वेगाने वाहत आहे. निरा- कोळविहीरे गटातून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सिमा संदिप धायगुडे यांनी जोरदार प्रचारात मोठी आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचाराचा झंझावात वेगात सुरु झाला आहे.        गावभेटीवेळी सिमा धायगुडे यांना चांगला प्रतिसाद मिळत असून धायगुडे दांपत्यावरील लोकांचे प्रेम प्रचारावेळी दिसून येत आहे. महिला, शेतकरी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध प्रश्नांची त्यांना माहिती आहे. समाजसेवेच्या अनेक कामांत त्या संदीप धायगुडे यांसह हिरिरीने सहभागी झाल्या आहेत.        प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी गावोगावी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, बचतगटांना चालना, बळीराजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.          नगरपा...

निरा–कोळविहिरे गड राखण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज; प्राजक्ता दुर्गाडेंसह मोनिका कांबळे व स्मिता निगडे या महिला नेतृत्व मैदानात

इमेज
निरा–कोळविहिरे गड राखण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज; प्राजक्ता दुर्गाडेंसह मोनिका कांबळे व स्मिता निगडे या महिला नेतृत्व मैदानात  पुरंदर :        पुरंदर तालुक्यातील निरा–कोळविहिरे जिल्हा परिषद गटात यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महिला नेतृत्वावर ठाम विश्वास टाकत प्रचाराला वेग दिला आहे. घरोघरी भेटी, थेट संवाद आणि लोकाभिमुख आश्वासनांच्या जोरावर राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला कायम राखण्याचा निर्धार उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.       “निरा–कोळविहिरे जिल्हा परिषद गटातील घरोघरी भेटींमुळे नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा योग येत आहे. गावकऱ्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांना मनापासून ऐकून घेताना मिळणारे प्रेम व आशीर्वाद हीच आमच्या कार्याची खरी ऊर्जा आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वांगीण विकास, लोकाभिमुख निर्णय आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार मी करते,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद उमेदवार प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांनी केले.       पुणे जिल्हा पर...

वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 6 गुन्हे उघड, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

इमेज
  देहूरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 6 गुन्हे उघड, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त   पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत देहूरोड पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत देहूरोड पोलिसांनी एकूण 6 गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 6 मोटारसायकली आणि 1 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे , सहआयुक्त शशिकांत महावरकर , अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड आणि अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिमंडळ-4 चे पोलीस उपआयुक्त यांच्या आदेशानुसार देहूरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने दोन स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली. बिगर नंबर प्लेटमुळे संशय दि. 15 जानेवारी रोजी पेट्रोलिंगदरम्यान देहूरोड हद्दीत बिगर न...

अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी २०.५० लाखांची चोरी; बारामती पोलिसांकडून सात आरोपी अटकेत

इमेज
  अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी २०.५० लाखांची चोरी; बारामती पोलिसांकडून सात आरोपी अटकेत   बारामती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारा वेळी भल्या मोठ्या गर्दीत गैरफायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम असा अंदाजे २० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारामती तालुका पोलिसांनी सात चोरट्यांना अटक केली आहे. राजकुमार बाबुराव आठवले , मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस , एजाज भगु मीरावले , मोहम्मद सादिक मोहम्मद गफार,बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे, तुषार कैलास मासाळ,नितीन अंकुश गायकवाड आदी आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अटक आली आहे.  तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फिर्यादी रणजीत बाळासाहेब जाधव तसेच साक्षीदार विश्वजीत अनिल तुपे, अंकुश शांताराम दिघे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलास भागवत, रणजीत मधुकर भोंगळे व इतर यांच्या सोन्याच्या चैन रोख रक्कम असा अंदाजे २० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्...

“जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे देशाच्या भवितव्याचा कौल” — महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसलाच संधी द्या : प्रशांत जगताप

इमेज
“जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे देशाच्या भवितव्याचा कौल” — महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसलाच संधी द्या : प्रशांत जगताप  पुरंदर :       निरा (ता. पुरंदर) येथे झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या जाहीर सभेत पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त नगरसेवक प्रशांत जगताप यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर जोरदार टीका करत, ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची नसून देशाच्या भवितव्याची दिशा ठरवणारी असल्याचे ठामपणे सांगितले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राष्ट्रीय सुरक्षेवरून त्यांनी सरकारला जाब विचारत काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.       “आज आपण ज्या निवडणुकीसाठी एकत्र आलो आहोत, ती केवळ जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणूक नाही. ही आपल्या गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या आणि थेट देशाच्या भवितव्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे,” असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केले.       ते पुढे म्हणाले की, लोकसभेत खासदार कोणाचा आहे, विधानसभेत आमदार कोणाचा आ...