पोस्ट्स

महारष्ट्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुंबईत आढळला HMPV चा रुग्ण ६ महिन्यांच्या चिमुकलीला लागण; रुग्णालयात उपचार सुरू

इमेज
 मुंबईत आढळला HMPV चा रुग्ण ६ महिन्यांच्या चिमुकलीला लागण; रुग्णालयात उपचार सुरू मुंबई दि.८      भारतातील पहिला एचएमपीव्ही रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर देशातील इतर राज्यातही या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. कर्नाटकनंतर गुजरात आणि महाराष्ट्रातही एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत. नागपूर नंतर आता महाराष्ट्रातील मुंबईमध्ये देखील या विषाणूने बाधित असलेला एक रुग्ण आढळून आला आहे महाराष्ट्रात नागपूरनंतर आता मुंबईत रुग्ण सापडले आहेत. मुंबईत सहा महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्हीची लागण झालीय. तिला गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल केलं होतं. तिच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.  हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरनी बोलताना सांगितलं की, याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आलीय. 1 जानेवारीलाच या प्रकरणाची माहिती समजली होती. बीएमसीच्या परेलमधील आरोग्य विभागाच्या कार्यालयाने मात्र अशी काही माहिती नसल्याचं सांगितलंय. देशभरात १० पेक्षा जास्त रुग्ण गेल्या काही दिवसात आढळले आहेत. नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात दोन रुग्ण आढळल्याची माहिती सोमवारी दिली होती. चीनमध्ये एचएमपीव्ही र...