बेलसर येथे महिलांसाठी मोफत विमा पॉलिसी वितरण व आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 बेलसर येथे महिलांसाठी मोफत विमा पॉलिसी वितरण व आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद



बेलसर, ता. पुरंदर : शारदा महिला संघाच्या विश्वस्त सचिव आदरणीय सौ. सुनंदाताई पवार यांच्या सामाजिक बांधिलकीतून व महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेतून बेलसर येथे महिलांसाठी मोफत विमा पॉलिसी वितरण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थ व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महिलांच्या सामाजिक व आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत न्यू इंडिया एश्युरन्स कंपनी या सरकारी विमा कंपनीच्या माध्यमातून शारदा महिला संघाच्या महिला सभासदांसाठी मोफत वैयक्तिक अपघात विमा तसेच मेडिक्लेम विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत विमा पॉलिसींचे वितरण करण्यात आले.

तसेच ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि शारदा महिला संघ, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तदाब (BP), रक्तातील साखरेची (Sugar) तपासणी, प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यासह गरजेनुसार मोफत औषधांचेही वितरण करण्यात आले.

सौ. सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिलांना आरोग्य व आर्थिक सुरक्षेचा दुहेरी लाभ मिळाला. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.



या कार्यक्रमाला ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील-गरुड, डॉ. शंकर भंडगे, गणेश खोमणे, पुरंदर तालुका महिला समन्वयक निकिता महामुनी, माजी सरपंच वनिता जगताप, समाजसेवक विशाल जगताप, नामदेव जगताप, संजय रणदिवे, काशिनाथ जगताप, नामदेव गरुड, प्रफुल्ल कदम यांच्यासह बेलसर येथील महिला व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शारदा महिला संघामार्फत राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारे असून, महिलांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासही मोलाचे योगदान देत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

पुणे–पंढरपूर पालखी मार्गावरील भीषण अपघातात नीरा गावातील दुचाकीस्वाराचा मृत्यू