पोस्ट्स

एस.एम.देशमुख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'राज्यभरातील पत्रकारांनी आदर्श घ्यावा असे पत्रकार भवन पुरंदरचे सहकारी करत आहेत' : एस.एम. देशमुख

इमेज
   'राज्यभरातील पत्रकारांनी आदर्श घ्यावा असे पत्रकार भवन पुरंदरचे सहकारी करत आहेत' : एस.एम. देशमुख  मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पुरंदरच्या पत्रकार भवनाच्या स्थळाची पाहणी पुरंदर :          'पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी एकत्रीत येत पुणे-पंढरपूर पालखी मार्गालगत स्वमालकीची सहा गुंठे जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी सर्व सोईंयुक्त, देखणी व भव्य वास्तू होत आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी लगत असलेल्या या पत्रकार भवनाचा लाभ राज्यभरातील पत्रकारांसह यात्रेकरूंना होणार आहे. राज्यभरातील पत्रकारांनी आदर्श घ्यावा असे पत्रकार भवन पुरंदरचे सहकारी करत आहेत, असाच आदर्श राज्यातील इतर पत्रकारांनी ही घ्यावा' असे प्रतिपादन एस. एम. देशमुख यांनी पुरंदरमध्ये केले.           मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित पुरंदर तालुका पत्रकार संघाने सहा गुंठे जागा खरेदी करुन भव्य इमारत बांधण्याचे नियोजन केले आहे. या इमारतीचे भुमिपूजन रविवार दि. ०५ रोजी माजी केंद्र मंत्री शरद पवार व पुण्याचे पालकमं...

पत्रकारिता करणे गुन्हा आहे का? - एस.एम. देशमुख

इमेज
 चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार असमर्थनीयच पण शाई फेक प्रकरणाचे खापर पत्रकारांवर फोडणे संतापजनकच पत्रकारिता करणे गुन्हा आहे का? - एस.एम. देशमुख मुंबई-  पत्रकारिता करणं गुन्हा आहे का? किमान सत्ताधाऱ्यांना तसं वाटतंय.. चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा जो प्रकार घडला त्याचा प्रत्येक सूज्ञ आणि लोकशाही प्रेमी व्यक्ती निषेधच करील.. मात्र या शाईफेक प्रकरणाचं खापर पत्रकारांवर फोडून त्यांच्यावर अटकेची कारवाई करणं संतापजनक आणि निषेधार्ह आहे. शाईफेक प्रकरणाची चौकशी व्हावी आमचा विरोध नाही मात्र आपलं काम करणाऱ्या माध्यमांना नाहक त्रास देऊ नये ते आम्ही खपवून घेणार नाही..असा इशारा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिला आहे.  मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,  चंद्रकांत पाटील म्हणतात, "शाईफेक प्रकारचं छायांकन एवढं व्यवस्थित कसं केलं गेलं? एवढा अचूक अँगल कसा घेतला गेला? म्हणजे तो पत्रकारच शाईफेक प्रकरणामागचा मास्टरमाईंड आहे.. त्याला अटक झाली नाही तर मी पोलीस स्टेशन समोर उपोषण करतो" .. दादा, बात...