स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा जाधववाडी येथील आढाळगे परिवाराला मदतीचा हात
स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा जाधववाडी येथील आढाळगे परिवाराला मदतीचा हात गराडे दि.९(वार्ताहर) : दिवे गावाजवळील जाधववाडी ( ता. पुरंदर ) येथील कुमार सर्जेराव आढाळगे यांच्या घरात शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत अंदाजे चार लाख रुपयांचे वस्तू जळून नुकसान झाले होते. ही बातमी समजताच स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष जगताप यांनी संसार उपयोगी वस्तू देऊन आढाळगे परिवाराला मदतीचा हात दिला. यावेळी त्यांच्या समवेत स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे सचिव हेमंत ताकवले ,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सामाजिक कार्यकर्ते अंकुर शिवरकर ,माधव शिवरकर, ग्रामपंचायत सदस्य निलेश जाधवराव , राजू आढाळगे,श्रीकांत जाधवराव, भगवान आढाळगे, सोमनाथ आढाळगे उपस्थित होते. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की जाधववाडी येथे कुमार आढाळगे,आई जयश्री आढाळगे पत्नी करिष्मा आढाळगे यांचे राहते घर आहे. हे तिघेही मजूर कामानिमित्त सासवडला गेले होते. सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली. शेजारील ग्रामस्थांना घरातून धुराच...