पोस्ट्स

शिंदे सेना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का ? शिरसाटांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल

इमेज
 फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का ? शिरसाटांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल     मुंबई दि १८ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीच्या जागा वाटपबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून भाजप- शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त ४८ जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत असून, आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहे. फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का? असा खोचक टोला शिरसाट यांनी बावनकुळेंना लगावला आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही. बावनकुळे यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिले त्यांना अधिकार...अशाप्रकारे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बे-बनाव येतोय, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. आम्ही काही मूर्ख आहोत का? फक्त ४८ जागा लढवण्यासाठी, याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल आणि तिथे काय तो निर्णय घेतला...