अस्पृश्यता अन् जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा फुले; जाणून घ्या त्यांच्याविषयी महत्वाचं
सामाजिक कार्यकर्ते , विचारवंत , जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक महात्मा जोतिराव फुले यांचा आज स्मृतिदिन. अस्पृश्यता , जातिव्यवस्थेचे निर्मूलन , स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेलं कार्य फार मोठं आहे. महाराष्ट्रासह देशातील समाजसुधारणेच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे , स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा जोतीराव फुले. महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणांची चळवळ उभारताना उद्योग क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. महात्मा फुले यांनी एक प्रकारे सामाजिक सुधारणांची चळवळ चालवताना दुसरीकडे देश उभारणीचे ही कार्य केले. 11 एप्रिल 1827 रोजी जन्मलेल्या महात्मा फुलेंनी आपलं अख्खं आयुष्य समाजसेवेसाठी वाहिलं. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला. जाणून घेऊयात महात्मा फुले यांच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी: - शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून मुलींसह सर्व शोषित घटकांना शिक्षण मिळायला हवे अशी त्यांनी सातत्याने मागणी केली. एक जानेवारी 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांच्या पत्नी ...