पोस्ट्स

पोलीस पाटील लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पुरंदर तालुक्यातील ३० गावातील पोलीस पाटील आरक्षण सोडत जाहीर

इमेज
 पुरंदर तालुक्यातील ३० गावातील पोलीस पाटील आरक्षण सोडत जाहीर नीरा दि 30   पुरंदर तालुक्यातील 30 गावातील पोलीस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत आज 30 जून रोजी संपन्न झाली पुरंदर-दौंडचे उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हो सोडत पारपडली.   पुरंदर तालुक्यातील आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे चिव्हेवाडी अनुसूचित जमाती, देवडी (अनुसूचित जमाती महिला,), सुपे खुर्द (अनुसूचित जमाती,) देवकरवाडी (अनुसूचित जमाती), काळदरी (अनुसूचित जमाती), राख (विशेष मागास प्रवर्ग), वीर (विशेष मागास प्रवर्ग महिला), तक्रारवाडी (भटक्या जमाती), लपतळवाडी (भटक्या जमाती महिला), तोंडल (भटक्या जमाती महिला), सुकलवाडी (भटक्या जमाती) पिंपळे (भटक्या जाती) आडाचीवाडी (भटक्या जाती) नवलेवाडी (इतर मागास वर्ग) बेलसर (इतर मागासवर्ग महिला), जवळ अजून (इतर मागासवर्गीय), कोळविहिरे( इतर मागासवर्गीय महिला) थोपटेवाडी (इतर मागासवर्गीय) तर वागदरवाडी, सटलवाडी, सोमुर्डी, हरगुडे, आंबोडी,हरणी, नारायणपूर, हिवरे, राजेवाडी, मांडकी, पोंडे या गावातील पोलीस पाटीलपद राखीव असणार आहे.. अशाप्रकारे आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली याबाबतची माहि...

पुरंदर तालुक्यातील ३० गावात होणार पोलीस पाटील भरती आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

इमेज
 पुरंदर तालुक्यातील ३० गावात होणार पोलीस पाटील भरती   शुक्रवारी होणार आरक्षण सोडत  नीरा दि 23   पुरंदर तालुक्यातील 30 गावातील पोलीस पाटील भरतीसाठी 30 जून रोजी आरक्षण सोडत होणार आहे.या बाबतचे आदेश पुरंदर-दौंडचे उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.याबाबतची माहिती प्रत्येक गावात देण्याबाबतच्या सूचना तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. सबंधित गावातील इच्छुक लोकांनी यावेळी उपस्थित राहण्या बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुरंदर मधील तीस गावांना लवकरच पोलीस पाटील मिळणार आहेत.गावातील कायदा व सुव्यवस्था पाहण्याचे काम पोलीस पाटील करत असतात. नारायणपूर,काळदरी, सोमुर्डी,हिवरे,तोंडल,सुपे खुर्द हरणी,सोनोरी,आंबोडी,हरगुडे,तक्रारवाडी, कोळविहरे वाल्हे,बेलसर,देवडी,चिव्हेवाडी,थोपटेवाडी,मांडकी, पोंढे,वीर सटलवाडी,नवलेवाडी,लपतळवाडी,वागदरवाडी,आडाचीवाडी,सुकलवाडी जवळार्जुन,राजेवाडी,राख,पिंपळे या गावातील पोलीस पाटील भरती साठी ही सोडत होणार  आहे.

पोलीस पाटलांच्या मागण्यांवर लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ : गिरीश महाजन यांचे आश्वासन

इमेज
  पोलीस पाटलांच्या मागण्यांवर लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ : गिरीश महाजन यांचे आश्वासन  पुणे दि.१४   राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागणी संदर्भात येणाऱ्या कॅबिनेटमध्ये लवकरच निर्णय घेऊ असा आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिनांक 13 जून रोजी पोलीस पाटलांच्या शिष्टमंडळाला दिले आहे याबाबतची माहिती पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी दिली       राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यासंदर्भात पोलीस पाटलांनी आंदोलन केलं होतं. यावेळी सरकारने या मागण्यांवर लवकरच निर्णय घेऊ असा आश्वासन दिले होते. मात्र यानंतरही पोलीस पाटलांच्या मागण्या अद्यापही मंजूर झाल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथी गृहावर दिनांक 13 जून रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. यामध्ये राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन राज्यातील पोलीस पाटलांना मानधन व...