पोस्ट्स

फडणवीसांनीच पुढाकार घ्यावा. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अग्रलेख : फडणवीसांनीच पुढाकार घ्यावा

इमेज
  म हाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद नव्याने उफाळून आला असून त्याला आता हिंसाचाराचेही गालबोट लागू लागले आहे. बेळगाव-हिरेबागवाडी टोल नाक्‍याजवळ कन्नडिगांच्या एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या गाड्यांवर दगडफेक करण्याचे सत्र अवलंबले आहे. हा हिंसाचार थांबला नाही तर आमचाही संयम सुटेल , असा कडक इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की , सीमावादाला गंभीर वळण देण्याचे काम सुरू असून आता यावर ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे. दोन राज्यांतील सीमावाद हा आतापर्यंत दोन्ही बाजूंकडून होताहोईल तो संयमाने हाताळण्याचा प्रयत्न होत असे ; पण कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी घेतलेल्या आक्रस्ताळी भूमिकेमुळे हा नाहक वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांवर त्यांनी दावे सांगायला सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्‍यातील काही गावांनी त्यांच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही गावे कर्नाटकात विलीन करण्याचा ठराव आपापल्या पंचायतीत केला होता. ही खूप जुनी घटना आहे. त्याला पुन्हा हवा देण्याचे काम करीत...