'बायोपिक करावा असं एकमेव व्यक्तीमत्व, ते म्हणजे...'; राज ठाकरेंनी घेतलं काँग्रेसच्या 'या' माजी पंतप्रधानांचं नाव!
मुं बईत ' अथांग ' या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अभिनेत्री तेजस्वीनी पंडितनं राज ठाकरे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. यात राज ठाकरे यांनी तजेस्वीच्या विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली. यात राज ठाकरेंवर बायोपिक बनवायचा झाला तर त्यात कुणाला काम करताना पाहायला आवडेल असं विचारलं असता राज यांनी मिश्किलपणे बायोपिकआधी घरी बायकोपिकची परवानगी घ्यावी लागेल असं म्हटलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. " हल्ली बायोपिकचं भयंकर पेव फुटलं आहे. मी जी आजपर्यंत पाहिलेली बेस्ट बायोपिक आहे ती म्हणजे अॅटबरो यांची ' गांधी ' ही आहे. भारतात जर समजा पुन्हा कुणावर बायोपिक करायचा झाला तर त्यासाठी एकमेव व्यक्तीमत्व ते म्हणजे इंदिरा गांधी या आहेत. आयुष्यात जी रोलर कोस्टर राईड आपण ज्याला म्हणतो तसे बरेच उतार-चढाव इंदिरा गांधी यांच्या आयुष्यात आहेत. ते मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावरचा सिनेमा खूप इंटरेस्टिंग होऊ शकतो. एखादा माणूस मला आवडला म्हणून त्यावर बायोपिक होऊ ...