शरद पवारांच्या विश्वासू माणसाचा राष्ट्रवादीला 'जय महाराष्ट्र', शिंदे गटात करणार प्रवेश
सोलापूर , : बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये इन्कमिंग सुरूच आहे. आता सोलापुरात मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाने शिवसेना आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आधीच शिंदे गटात सामील झाले आहे. आता राष्ट्रवादीचे नेतेही प्रवेश करत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी सात वाजता वर्षा निवासस्थानी प्रवेश होणार आहे. दिलीप कोल्हे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वास मांणले जात होते. दिलीप कोल्हे आपल्या कार्यकर्त्यांसह आता मुंबईला निघाले आहेत. पक्षातील स्थानिक नेतृत्वांना कंटाळून दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दिलीप कोल्हे...