आषाढीवारी निमित्त इंदू इंग्लिश स्कूलच्यावतीने पालखी व दिंडी सोहळा

आषाढीवारी निमित्त इंदू इंग्लिश स्कूलच्यावतीने पालखी व दिंडी सोहळा संतांच्या मेळ्याने दिला पर्यावरण वाचविण्याचा संदेश जेजुरी वार्ताहर दि ८ राज्याच्या विविध भागातून विशेषता आळंदीहून पंढरीकडे श्री पांडुरंगाच्या दर्शनसाठी संतांचे पालखी सोहळे मार्गस्थ झाले आहेत. दि १० रोजी आषाढी एकादशी असून या निमित्ताने इंदू इंग्लिश स्कूलच्या वतीने सलग दहाव्या वर्षी जेजुरी शहरातून पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संताच्या मेळ्याने आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे वेश परिधान करून पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला. इंदू स्कूल कोळविहीरेच्या वतीने संस्थेच्या संस्थापिका श्रीमती इंदुमती कुटे,अध्यक्ष डॉ रामदास कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढीवारीच्या निमित्ताने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते, शुक्रवार दि ८ रोजी या सोहळ्याचे उद्घाटन जेजुरी उद्योजक संघाचे सचिन राजेश पाटील,देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राउत,जिल्हा कला शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक साबळे, पुरंदर...