पिकांचं नुकसान झाल्यास सरकार करणार भरपाई, फक्त करा हे एक काम
मुंबई : बऱ्याचदा शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे फटका बसतो. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान होतं. पिकासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं असतं. त्यामुळे पिकांचंच नुकसान झालं तर शेतकरी कर्ज फेडणार कुठून हा प्रश्न असतो. मग अशावेळी पिकाचा विमा देखील उतरवला जातो. ज्यामुळे नुकसान झाल्यास सरकारकडून त्याची एक ठरावीक रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. पिकाची पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना बराच काळ वाट पहावी लागते. दरम्यान , त्यांना सिंचन , तण व इतर कामांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात आणि पीक तयार असतानाही कापणी व वाहतुकीसाठी पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना हंगामात पीक घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. अशातच जर वादळामुळे पिकाचे नुकसान झाल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा पडू शकतो. हा बोजा कमी करण्यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. पीक विमा योजनेत विमा मिळाला तर त्याचा लाभ घेता येईल. सध्या रब्बी पिकांचा विमा ...