Posts

Showing posts with the label 'आज जेल

'आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल' कोणंय हा गुंड, ज्याची क्लिप झाली व्हायरल?

Image
  नागपूर :   राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृहखातं आहे त्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच पोलिसांचा धाक उरलाय की नाही , असा प्रश्न उपस्थित करणारा प्रकार समोर आलाय. एका आरोपीला पोलीस वाहनातून घेऊन जात असतानाचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओ पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने केलेलं धक्कादायक वक्तव्य सध्या चर्चेत आलंय. या व्हिडीओ आरोपी , ' आज जेल , कल बेल , फिर वही पुराना खेल ' असं म्हणाला होता. या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच या प्रकाराने पोलिसांवरही अनेक सवाल उपस्थित केलेत. नेमका हा आरोपी कोण आहे , आणि त्याला पोलिसांनी ताब्यात का घेतलं होतं , हे देखील आता समोर आलंय. नागपूरात गुंडांचं धाडस वाढतंय का ? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याला कारण आहे , गुंडाने तयार केलेल्या एका व्हायरल व्हिडिओ क्लिपचं. या गुंडाने चक्क पोलीस वाहनात एक व्हिडिओ शूट केला. त्यात – ' आज जेल , कल बेल , फिर वही पुराना खेल ' असं तो म्हणताना दिसला होता. म्हणतोय. हे एक प्रकारे पोलिसांनाच चॅलेंज केल्यासारखं असल्याची चर्चा रंगलीय. व्हिडीओ काढलेल्या या आरोपीचं नाव अच्छी इंदूरकर अस...