Posts

Showing posts with the label नैराश्य

उच्चशिक्षित तरुणीने नैराश्येतून आयुष्य संपवलं, कामावर रुजू होण्याच्या एक दिवस आधी टोकाचं पाऊल

Image
    पालघर ( Palghar ) जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील निंबवली इथल्या एका उच्चशिक्षित तरुणीने नैराश्येतून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली. या तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ( Suicide ) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून ममता परेड (वय 24 वर्षे) असं तरुणीचं नाव आहे. वसई-विरार महापालिकेत पीआरची नोकरी वाडा तालुक्यातील निंबवली इथे ममता परेड ही तरुणी आपल्या कुटुंबासह राहत होती. तिचे एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि ती पुण्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. त्याचप्रमाणे तिने पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयामधून पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. ममताला वसई-विरार महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकाऱ्याची नोकरी देखील लागली होती आणि ती आज सोमवारपासून ( 12 डिसेंबर) कामावर रुजूही होणार होती. परंतु तिने हे अचानक टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अजूनही स्पष्ट झाले नाही. आईने ममताचा मृतदेह पाहिला परेड कुटुंबातील सर्वजण शनिवारी ( 10 डिसेंबर) रात्री जेवण झाल्यानंतर झोपी गेले. मात्र , रविवारी ( 11 डिसेंबर) पहाटेच्...