शहीद शंकर शिंदे यांच्या त्या पत्राच्या आठवणीने पिंगोरीकरांच्या डोळ्यात पुन्हा आले पाणी

शहीद शंकर शिंदे यांच्या त्या पत्राच्या आठवणीने पिंगोरीकरांच्या डोळ्यात पुन्हा आले पाणी कारगील विजय दिनानिमित्त शहिदांना करण्यात आले अभिवादन दि.२६ आज दि.२६ जुलै रोजी देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. कारगिलमध्ये शहीद झालेल्या शंकर शिंदे यांच्या पिंगोरी गावात सुद्धा आज कारगिल विजय दिनानिमित्त कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आले. पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी मध्ये आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आज गावातील सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कारगिल मध्ये झालेल्या लढाईत पिंगोरी येथील शहीद शंकर शिंदे यांना वीरमरण आले होते. लढाई सुरू असताना रणांगणामधून त्यांनी आपल्या पत्नीला पत्र लिहिलं होतं. त्या पत्राची आठवण आज पिंगोरकरांना पुन्हा आली युद्धभूमीवर अ...