Sunday, July 31, 2022

नीरा येथे येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती नीरा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली साजरी

 नीरा  येथे  येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती नीरा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली साजरी




    पुरंदर तालुक्यातील नीरा येथे साहित्यरत्न, शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.आज सकाळी नीरा ग्रामपंचायत, अण्णाभाऊ साठे विकास प्रतिष्ठान व नीरा ग्रामस्थ यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

   नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे यांच्या हस्ते पतीमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नीरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विरज काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण ,प्रमोद काकडे,अभिषेक भालेराव,सुनील चव्हाण, अनंता शिंदे,वकील आदेश गिरमे,अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पाटोळे राष्ट्रवादीचे अजित जैन,भारतीय बौध्द महासंघाचे दादा गायकवाड यांचासह नीरा आणि परिसरातील अनेक लोक उपस्थित होते.

कपलिंग तुटल्याने निरा येथे रेल्वे गाडीचे झाले दोन भाग

 कपलिंग तुटल्याने निरा येथे रेल्वे गाडीचे झाले दोन भाग



 नीरा दि.१

    पुरंदर तालुक्यातील निरा रेल्वे स्टेशनवर मालगाडी येत असताना दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटल्याने मालगाडीचे दोन भाग झाले. अर्धा भाग पाठीमागे राहिलाच राहिला . तर इंजिनचा भाग नीरा रेल्वे स्टेशनवर दाखल झाला होता. याबाबतची घटना समोर आलीय. 


       रविवारी सायंकाळी पुण्याहून आलेल्या मालगाडीच्या बाबत हिंघटना ही घटना घडली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने पुन्हा पुढे गेलेला इंहिनाचा भाग माघारी आणून या दोन्ही रेल्वेभाग जोडले.यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान रेल्वेचे किंवा स्थानिक लोकांच झालं नाही. मात्र रेल्वेचा कपलिंग तुटून अर्धी रेल्वे (म्हणजे गार्डचा भाग) पिंपरे येथील फाटकात उभी राहिली. तर अर्धी गाडी रेल्वे ( इंजिन कडील अर्धा भाग) स्टेशन मध्ये गेली. यामुळे पिंपरे आणि परिसरातील अनेक लोक या ठिकाणी बघ्याच्या भूमिकेत आले होते.

       मालवाहू गाडी असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा अपघात होण्याच्या धोका नव्हता. कपलिंग तुटलेले रेल्वेचे डबे ऑटोमॅटिक ब्रेक लागुन जागेवर उभे राहिले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात या ठिकाणी झाला नाही. मात्र अशा प्रकारच्या घटना वाढू लागल्याने रेल्वे विभागाकडून याची तातडीने दखल घेणे गरजेचे असल्याचे पिंपरे गावचे माजी सरपंच उत्तम थोपटे यांनी म्हटले आहे.

पोलिस असल्याचे भासवून नीरेत दागिने लुटले.

 पोलिस असल्याचे भासवून नीरेत दागिने लुटले. 



व्यापाऱ्याचे तीन तोळे सोने केले लंपास 


नीरा :

        नीरा (ता.पुरंदर) येथे पोलिस असल्याचा बनाव करून भररस्त्यात जेष्ठ व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाम रामचंद्र सोनी (वय ७३) यांची सोन्याची एक चैन व एक अंगठी असे तीन तोळे सोने लंपास करुन चोरांनी पोबारा केला आहे. याबाबत सोनी यांनी जेजूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .  


       याबाबतीत जेजूरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शाम सोनी हे शनिवार दि. ३० जुलै रोजी दुपारी ०३:१५ च्या सुमारास रहदारी असलेल्या पालखी महामार्गावरील नीरा रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल जवळ चालत होते. त्याचवेळी एका अनोळखी इसमाने मोटरसायकल वरून येऊन पोलीस असल्याचा बहाना करत ओळखपत्र दाखविले. फिर्यादी यांना म्हणाला की या ठिकाणी चोऱ्या होतात, आम्ही तपासणी करीत आहोत. तुम्ही तुमचे हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील सोन्याची चैन माझे ताब्यात द्या. असे म्हणाल्यावर फिर्यादी यांनी त्यांच्या हातातील अंगठी व गळ्यातील चैन त्या इसमाचे ताब्यात दिली असता त्याने चैन व अंगठी रुमालामध्ये ठेवून सोनी यांच्याकडे दिली व तो पालखी मार्गावरुन लोणंद बाजुकडे मोटरसायकल वरुन निघून गेला. त्यानंतर सोनी यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यात ठेवलेली सोन्याची चैन आणि अंगठी दिसली नाही. 


       त्यामुळे सोनी यांची खात्री झाली की अनोळखी इसम थांबून त्यांचा विश्वास संपादन करून पोलीस असल्याचे खोटे सांगून अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन व अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी  असा एकूण ८५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. याबाबत जेजुरी पोलीसांत गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र भापकर करीत आहेत.

Friday, July 29, 2022

पुण्यातील व्यापाऱ्याची वीर धरणाच्या पाण्यात आत्महत्या

 पुण्यातील व्यापाऱ्याची वीर धरणाच्या  पाण्यात  आत्महत्या 



   वीर दि.३०



खंडाळा तालुक्यातील तोंडल गावच्या हद्दीमध्ये वीर धरण परिसरातील नीरा नदीच्या पात्रामध्ये पुणे येथील व्यापारी सुरज हणमंत सुंदर (वय ४२,रा.पुणे) असे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  दरम्यान सुरज सुंदर यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज शिरवळ पोलीसांनी वर्तविला आहे.

         याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, पुणे येथील जमीन व्यवहार व लाइजनिंगचा व्यवसाय करणारे सुरज सुंदर हे बुधवार दि.२७ जुलै रोजी पुणे येथील घरामधून पैश्यांचे काम आहे असे सांगत घरातून कार (क्रं.एमएच-०२-डिजे-४७६१) घेऊन बाहेर आले होते. यावेळी सुरज सुंदर यांनी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान व्हिडिओ दूरध्वनीद्वारे पत्नी ज्योती सुंदर यांना आला असता त्यांनी मी हरलो आहे व सिधुला मुलगा आर्यनवर लक्ष ठेवण्यास सांग मी माझे जीवन संपवणार आहे असे सांगितले.दरम्यान,गुरुवार दि.२८ जुलै रोजी सुरज सुंदर यांनी आणलेली कार तोंडल ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये शिरवळ - लोणंद रस्त्यावरील नीरा नदीच्या पात्रा लगत असणाऱ्या एका हॉटेलजवळ शिरवळ पोलिसांना बेवारस स्थितीमध्ये आढळून आली होती. यावेळी शिरवळ पोलीसांनी माहिती घेत पत्नी ज्योती सुंदर यांना याबाबतची कल्पना देत वीर धारण परिसरामध्ये असणाऱ्या नीरा नदीच्या पात्रात शोध मोहीम राबविली. यावेळी शुक्रवार दि.२९ जुलै रोजी सुरज सुंदर यांचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रामध्ये स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने मिळून आला.यावेळी घटनास्थळी शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ,सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे,पोलीस अंमलदार सुनील मोहरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

    या घटनेची फिर्याद सिदार्थ कांबळे याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस अंमलदार सुनील मोहरे हे करीत आहे.

Thursday, July 28, 2022

कोल्हापूर ते गोंदिया रेल्वेने नीरा रेल्वे स्टेशनवर रात्री घेतला 5 तासाचा ब्लॉक. प्रवाशांचे झाले हाल

 कोल्हापूर ते गोंदिया रेल्वेने नीरा रेल्वे स्टेशनवर रात्री घेतला 5 तासाचा ब्लॉक. प्रवाशांचे झाले हाल




  कोल्हापूर ते गोंदिया या रेल्वे गाडीने गुरवारी नीरा रेल्वे स्टेशनवर रात्री अचानक 5 तासांचा ब्लॉक घेतला .यामुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यातच परीक्षेसाठी निघालेले परीक्षार्थी व आजारी असलेल्या लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. येथील रेल्वे प्रशासनाने कोणतेही सहकार्य केले नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय.दरम्यान येथील कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्थानिक तरुणांना मदतीला घेत या प्रवाशांना मदत पोचविण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी रेल्वे प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं दिली गेल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड चिडचिड वाढल्याचा पाहायला मिळाले


    दिनांक 28 जुलै रोजी पुणे कोल्हापूर रेल्वे लईन काही कामानिमित्त दिवस भर बंद ठेवण्यात आली होती. मात्र सायंकाळी कोल्हापूर वरुन गोंदिया ला जाणारी गाडी नंबर 11039 या रेल्वे ने तब्बल नीरा रेल्वे स्टेशन वर चक्क 5 तासांचा ब्रेक घेतला. प्रवाशांनी आणि कोल्हापूर वरुन पुण्यामध्ये परीक्षेला जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी रेल्वे मास्टर यांना विचारणा केली असता त्यांनी पुढे डबल लाईनचे काम चालू आसलेल्या कारणामुळे रेल्वे कधी निघू शकेल याची खात्री नाही आसे सांगत प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी दिसून आली. याच वेळी नीरा रेल्वे स्टेशन मध्ये एकच पोलिस अधिकारी उपलब्ध होते. दरम्यान त्यांनी गावातील काही सामाजिक कार्यातील युवकांची मदत घेत प्रवाशांना पाणी, चहा, वडापाव मिळण्यासाठी मदत केली. याच वेळी रेल्वेतील 2 प्रवाशांना अचानक त्रास होत होता त्यांना गावातील युवकांच्या मदतीने दवाखान्यात जाण्यास मदत देखील केली. दरम्यान त्या पेशंट च्या नातेवाईकांनी पोलिस महेश निर्मळ यांचे आभार मानले. यानंतर रात्री उशिरा रेल्वे ने तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 5 तासांनंतर धाव घेतली.

राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे

 *राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे* :

*एस.एम.देशमुख यांची सरकारकडे मागणी* 



*वडवणी* : राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे आणि त्यासाठी जागा आणि निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त *एस.एम देशमुख* यांनी केली..

बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज एस.एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी देशमुख बोलत होते.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शेषराव जगताप होते..

एस.एम देशमुख पुढे म्हणाले, शासन जिल्हा स्तरावर पत्रकार भवनासाठी जागा आणि निधी देते मात्र तालुका स्तरावरील पत्रकारांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने आपल्या धोरणात बदल करीत प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवनासाठी जागा आणि निधी दिला पाहिजे.. त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.. वडवणी नगर पालिकेने मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे केले आहे तेथील एखादा गाळा नगरपालिकेने पत्रकारांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी सूचना देखील देशमुख यांनी यावेळी नगराध्यक्ष जगताप यांच्याकडे केली..


बीड जिल्हा हा ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा आहे, मागास जिल्हा आहे ही बीडची ओळख पुसून काढण्यासाठी येथील सकारात्मक बातम्या मुंबई, पुण्याच्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्या पाहिजेत,बीड जिल्हा आता कात टाकतोय, बीड जिल्ह्यात नवे ९ महामार्ग होत आहेत, रेल्वे येत आहे,शेती क्षेत्रात आधुनिकतेची कास धरत नवे प्रयोग केले जात आहेत, विकासाचे नवे प्रकल्प राबविले जात आहेत, बीड जिल्हा आता बदलतो आहे.. या बातम्या प्राधान्याने मुंबई, पुण्यातील वर्तमानपत्रात आल्या तर जिल्ह्यात नवे उद्योग बीड जिल्ह्यात येतील आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल त्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असा सल्ला देशमुख यांनी पत्रकारांना दिला..


प्रारंभी स्थानिक शाखेचे अध्यक्ष विनायक जाधव यांनी प्रास्ताविक केले तर परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे यांनी आभार मानले..

कार्यक्रमांस शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते..

पुरंदर तालुक्यातील दिग्गजांची तयारी गेली वाया ; पाहा जिल्हापरिषद निवडनुकीसाठी गटनिहाय आरक्षण

 पुरंदर तालुक्यातील दिग्गजांची तयारी गेली  वाया ;  पाहा 

जिल्हापरिषद निवडनुकीसाठी  गटनिहाय आरक्षण 





पुणे जिल्हा परिषदेच्या पुरंदर तालुक्यातील पाच गटांसाठी आरक्षण खालील प्रमाणे. 


मांडकी - परींचे  = सर्वसाधारण 

दिवे - गराडे =   सर्वसाधारण महिला

पिसर्वे - माळशिरस = सर्वसाधारण 

वाल्हा - नीरा = सर्वसाधारण महिला

बेलसर - कोळविहिरे = सर्वसाधारण महिला.

पुरंदर पंचायत समिती आरक्षणाने दिग्गजांचा हिरमोड तर काहींनी बांधले गुढग्याला बाशींग

 पुरंदर पंचायत समिती आरक्षणाने दिग्गजांचा हिरमोड तर काहींनी बांधले गुढग्याला बाशींग 



नीरा :

   पुरंदर पंचायत समितीत पुर्वी आठ सदस्य होते, आता जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. त्यामुळे पुरंदर पंचायत समितीत आता सदस्य संख्या दहा झाली आहे. पैकी पाच सदस्य महिला राखीव आहेत. सर्वसाधारण महिला दोन जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन जागा, अनुसूचित जाती महिला एक जागा, सर्वसाधारण जागेसाठी तीन जागा, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग एक जागा राखीव असे आरक्षण सोडत झाली आहे. या अनपेक्षित सोडती मुळे तालुक्यातील काही दिग्गजांचा हिरमोड तर काहींनी आताच गुढग्याला बाशींग बांधण्याची तयारी सुरु केली आहे. 


      आज गुरवारी पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी सभागृहात दौंड पुरंदरचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने यांच्रा उपस्थित चिठ्ठ्या टाकून रोटेशन पद्धतीने आरक्षण सोड करण्यात आली. 



पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुक 2022

         गण आरक्षण 


परींचे = सर्वसाधारण 

मांडकी = नागरिकांचा मागास प्रवर्ग 


बेलसर = सर्वसाधारण 

कोळविहिरे = सर्वसाधारण 


पिसर्वे = सर्वसाधारण महिला

माळशिरस = सर्वसाधारण 


वाल्हे = नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 

निरा = नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 


दिवे = अनुसूचित जाती महिला

गराडे = सर्वसाधारण महिला

Wednesday, July 27, 2022

रस्त्याच्या रुंदीकरणात हजारो झाडांची होणार कत्तल

 रस्त्याच्या रुंदीकरणात हजारो झाडांची होणार कत्तल



वाल्हे दि.२७


   आळंदी ते पंढरपूर या मार्गाच्या विस्तारीकरणात जेजुरी ते निरा दरम्यान हजारो झाडांची कत्तल होणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम नुकतच सुरू झाले आहे. यामध्ये जेजुरी वाल्हे दरम्यानच्या रुंदीकरणात रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडांची कत्तल सध्या सुरू आहे. या झाडांची कत्तल न करता त्याची दुसऱ्या ठिकाणी पुन्हा लागवड केली जावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत.


  पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील जेजुरी ते नीरा यादरम्यानच्या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करून वाहन चालकांना दिलासा मिळावा अपघात कमी व्हावे म्हणून अनेक दिवसापासून लोक मागणी करत आहेत. या रस्त्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मात्र या रस्त्याच्याकडेला असलेली अनेक झाडे यामध्ये उध्वस्त होत आहेत. प्रशासनाने ही झाडे काढून टाकून देऊ नयेत तर या झाडांचं पुनर्वसन केलं जावं. अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत. ही झाडे साधारण सरसकट काढून फेकून दिले जात आहेत. ती फेकून न देता या झाडांची योग्य ठिकाणी लागवड केल्यास निसर्गाचे होणार नुकसान कळेल टळेल.याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन पर्यावरणाचा होणार नुकसान टाळावं असं पर्यावरण प्रेमी अमोल साबळे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, सरकारनेच ही झाडे लावली आहेत. त्याचे जतनही चांगल्या प्रकारे केले. पण आता लगेच ती काढून टाकली जात आहेत. त्या ऐवजी त्याचं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केलं तर ही झाडे वाचू शकतील.

सासवड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

 सासवड नगर परिषद व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सासवड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन




   पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सासवड नगर परिषद व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबतची माहिती सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी दिली असून, जास्तीत जास्त तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.


     उद्या दिनांक 29 जुलै रोजी हा मेळावा सासवडनगर परिषदेच्या सभागृहात होणार आहे 18 ते 45 वयोगटातील तरुणांनी या मेळाव्यात येऊन शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या मेळाव्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याबाबतची माहिती देण्यात येणार आहे.

मेळाव्याला येताना इच्छुक तरुणांनी शाळा सोडल्याचा दाखला,मार्कशिट ,आधार कार्ड, पॅनकार्ड , बँकेचे पासबुक जागेचे कागदपत्र, असल्यास प्रकल्पाचा अहवाल घेऊन यावे असे सांगण्यात आले आहे. उद्या दिनांक 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे

सावधान !! बिगरशेती प्लॉट घेताय ? खात्री करा तुमची फसवणूक होऊ शकते

 सावधान !! बिगरशेती प्लॉट घेताय ? खात्री करा तुमची फसवणूक होऊ शकते


बिगर शेती अर्थात एन ए चा खोटा आदेश देऊन शासनाची फसवणूक ; सासवड पोलिसात फिर्याद दाखल.



 सासवड दि.२८


    पुरंदर तालुक्यातील  तहसील कार्यालयात बिगर शेतीचा खोटा आदेश देऊन शासनाची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सासवड पोलिसात नायब तहसीदार यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 468,420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


   याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आरोपी अल्तापहुसेन बाबासाहेब पाटील याने मार्च 2022 मध्ये  हिवरे येथील गट नं.829,830,831,832,833 या शेतजमीन गटाचे फाळणीबारा नुसार प्लॉटच्या नोंदी करता येतील का असे तेथील तलाठी यांना विचारले.यासाठी  तलाठी निलम देशमुख यांना त्यांचेकडे असलेली एन.ए. ऑर्डर  ही दाखविली. तलाठी यांनी सदर ऑर्डरनुसार नोंद करता येत नाही. तुम्ही कजाप करुन आणा, त्याशिवाय नोंदी धरता येणार नाहीत. असे सांगितले. त्यानंतर मा.उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर उपविभाग पुरंदर यांनी तलाठी यांना या गटाचा पंचानामा करुन मागितला. त्याप्रमाणे तलाठी यांनी पंचनामा सादर केला. यानंतर उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर  यांच्या आदेश नुसार  हिवरे  येथील जमीनगट नं.829 व इतर बाबत पारित केलेल्या बिनषेती आदेशाची एस आर रजिस्टरची साक्षांकित प्रत सादर करण्यास सांगितले. त्या पत्राचे अनुशंगाने अभिलेख कक्षामध्ये शोध घेतला.  त्यावेळी  हिवरे येथील ही केस आढळुन आली नाही. तसेच त्यावेळेच्या अकृशीक नोंदवहीमध्ये सुद्धा सदर आदेषाची नोंद आढळुन आली नाही. त्यानंतर अकृषिक नोंदवही रजिस्टरची सत्यप्रती सह कार्यालयाकडील  अहवाल उपविभागीय अधिकारी  यांना देण्यात आला. यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी या प्रकरणी फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्याचे आदेश दिली  यानंतर निवासी नायब तहसिलदार दत्तात्रय भिकाजी गवारी, यांनी  फसवणूक प्रकरणी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहेत.


Tuesday, July 26, 2022

शहीद शंकर शिंदे यांच्या त्या पत्राच्या आठवणीने पिंगोरीकरांच्या डोळ्यात पुन्हा आले पाणी

 शहीद शंकर शिंदे यांच्या त्या पत्राच्या आठवणीने पिंगोरीकरांच्या डोळ्यात पुन्हा आले पाणी


कारगील विजय दिनानिमित्त शहिदांना करण्यात आले अभिवादन



     दि.२६


         आज दि.२६ जुलै रोजी  देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. कारगिलमध्ये शहीद झालेल्या शंकर शिंदे यांच्या पिंगोरी गावात सुद्धा आज कारगिल विजय दिनानिमित्त कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आले.

            पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी मध्ये आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आज गावातील सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कारगिल मध्ये झालेल्या लढाईत पिंगोरी येथील शहीद शंकर शिंदे यांना वीरमरण आले होते. लढाई सुरू असताना रणांगणामधून त्यांनी आपल्या पत्नीला  पत्र लिहिलं होतं. त्या पत्राची आठवण आज पिंगोरकरांना पुन्हा आली युद्धभूमीवर असताना त्यांनी लिहिलेले पत्र म्हणजे मरणापूर्वीच त्यांनी आपले मरण पाहिले होते असे दिसते. त्यांनी लिहिलेल्या या ओळी आजही पिंगोरीकरांच्या  डोळ्यात पाणी आणतात. त्यांनी आपल्या पत्रात असं म्हटलं होतं की,

      "हे पत्र मी डोंगरावर बसून लिहीत आहे , माझ्या आवती भवती शत्रूंच्या तोफेतून सूटलेले गोळे फुटत आहेत. या धूमचक्रितून मी वाचेलच अस नाही, काळजी घे.कदाचित माझं हे शेवटचं पत्र असेल"  शिंदे यांच्या पत्रातील या ओळी आज पिंगोरीकरांना पुन्हा आठवल्या.



  अभिमानाने भरलेला छातीनं आणि अश्रुनी भरलेल्या नयनांनी आज पिंगोरीकरांनी या वीराला अभिवादन केलं. यावेळी माजी सैनिक कॅप्टन शामराव शिंदे, अंकुश शिंदे, निवृत्त पोलीस सदाभाऊ शिंदे यांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पिंगोरीचे उपसरपंच प्रकाश शिंदे, सोसायटीचे चेअरमन कैलास गायकवाड,पोलीस पाटील राहुल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संदीप यादव, शहीद शंकर शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, प्रवीण शिंदे, शरद ताकवले, शशिकांत चौधरी, कांताराम शिंदे महादेव शिंदे, माजी उपसरपंच धनंजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Monday, July 25, 2022

शैक्षणिक ,सामाजिक पत्रकारिता व धार्मिकक्षेत्रात नितीन राउत यांचे योगदान; अंकुश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक

 शैक्षणिक ,सामाजिक पत्रकारिता व धार्मिकक्षेत्रात नितीन राउत यांचे योगदान:  अंकुश माने  सहाय्यक पोलीस निरीक्षक 



जेजुरी    वार्ताहर दि २४  शैक्षणिक,सामाजिक,पत्रकारिता व धार्मिक क्षेत्रात नितीन राउत यांचे काम उल्लेखनीय आहे. शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत विद्यार्थी व समाज घडविण्यासाठी त्यांचे योगदान आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून  सर्व सामान्यांना न्याय देवून सामाजिक,धार्मिक विषयांवर त्यांनी सतत लिखाण केले आहे. आणि संघटन कौशल्याच्या जोरावर सर्वच क्षेत्रात त्यांचे नावलौकिक आहे असे मनोगत सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी व्यक्त केले.

      जेजुरी उद्योजक संघ व केबीसी यांच्या वतीने सेवापुर्तीच्या निमित्ताने मुख्याध्यापक नितीन राउत यांच्या गौरव कार्यक्रमाचे आयोजन जेजुरी एमआयडीसीतील जिमाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ.रामदास कुटे, कार्याध्यक्ष रवींद्र जोशी,उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे,सचिव राजेश पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने,पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, डॉ.मोनाली कुटे, डॉ.विश्वास नाझीरकर,उद्योजक राजेंद्र महामिने,मनेश सरमाने,जिमाच्या व्यवस्थापक जालिंदर कुंभार,जेजुरी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष एन डी जगताप,संतोष खोमणे, म्हाळसा मंडळाच्या प्रमुख विद्या म्हेत्रे,कला शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक साबळे आदी उपस्थित होते.  यावेळी जिमा व केबीसीच्या वतीने सन्मानचिन्ह देवून नितीन राउत यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.

    


  जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ.रामदास कुटे या प्रसंगी बोलताना म्हणाले नितीन राउत यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम तर केलेच तसेच  पत्रकारितेच्या माध्यमातून जेजुरी एमआयडीसी मधील उद्योजक,कामगार ,येथील समस्यांना न्याय देण्याचे काम केले. श्री मार्तंड देवसंस्थान ट्रस्टवर विश्वस्त असताना ऐतिहासिक भेटीचे शिल्प,भक्तनिवास बांधण्यासाठी पुढाकर घेतला. सामाजिक क्षेत्रात सर्व सामान्यांना समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले.

      यावेळी आनंद नाईक.आशिष कदम,रवींद्र जोशी,पांडुरंग सोनवणे,पुंडलिक गावडे, एन डी जगताप,डॉ मोनाली कुटे, विद्या म्हेत्रे यांची भाषणे झाली.

    सूत्रसंचालन उद्योजक रवींद्र जोशी तर आभार अशोक साबळे यांनी मानले.


Sunday, July 24, 2022

आपल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी प्राण नक्कीचं वाचेल; डॉ.प्रा.दिगंबर दुर्गाडे

 आपल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी प्राण नक्कीचं वाचेल;  डॉ.प्रा.दिगंबर दुर्गाडे




   "आपण केलेल्या रक्तदानातून, कोणातरी एका व्यक्तींचे प्राण नक्कीच वाचत असतो. कधी काळी याच रक्तामुळे  कळत - नकळत आपल्या नातलागांचाही प्राण वाचतो..  त्यामूळे प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य,  सामाजिक कर्तव्य,  म्हणून  रक्तदान करायलाच हवे"; असे मत, पुणे  जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी वाल्हे येथे मानले. 


 रविवार (दि. २४) विरोधी पक्षनेते   अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त   वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत  कार्यालयात 'भव्य रक्तदान' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.  दुर्गाडे बोलत होते.


 यावेळी वाल्हे गावाचे सरपंच अमोल खवले, नीरा- वाल्हा जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष उत्तमराव धुमाळ, राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्ष कोमल निगडे, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, राजेश चव्हाण, माजी उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, सुर्यकांत भुजबळ, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे समन्वयक अशोक बरकडे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष किरण गदादे, शिवशक्ती पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र बरकडे, मुंबई सेवादल अध्यक्ष हनुमंत पवार, तंटामुक्ती अध्यक्ष समदास भुजबळ, राष्ट्रवादी सरचिटणीस दादासाहेब मदने, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब राऊत यांच्यासह अनेक ग्रामस्थ तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, July 23, 2022

सरकारने नोकरी देणे बंद केले आहे. तरुणांनी व्यावसायिक क्षेत्रात यावे माजी कुलगुरू डॉ.पंडितराव पलांडे

सरकारने नोकरी देणे बंद केले आहे. तरुणांनी व्यावसायिक क्षेत्रात यावे माजी कुलगुरू डॉ.पंडितराव पलांडे



जेजुरी वार्ताहर दि २३ सरकारने शिक्षणावरील खर्च कमी केला आहे. सर्वच क्षेत्रात नोकऱ्या देणे बंद केले आहे. सरकारच्या नोकरीची वाट न पाहता तरुणांनी उद्योग व्यवसाय क्षेत्रात पुढे यावे व या व्यवसायातून इतरांना नोकरीची संधी निर्माण करून द्यावी असे आवाहन माजी कुलगुरू आणि कस्तुरी शिक्षण संस्था शिक्रापूरचे संस्थापक डॉ.पंडितराव पलांडे यांनी केले. 


        पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील श्री मल्हार शिक्षण मंडळ व विद्या महामंडळ प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक नितीन राउत व काशिनाथ भोंग यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमा वेळी डॉ पंडितराव पलांडे बोलत होते. 


      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे होते. यावेळी जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे,कार्यध्यक्ष रवींद्र जोशी,उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे,सासवड बार असोशिएशनचे अध्यक्ष अड धनंजय भोईटे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंत ताकवले,सामाजिक कार्यकर्ते अड नितीन कुंजीर,सरपंच शहाजी जगताप,माजी विध्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संदीप जगताप आदी उपस्थित होते. यावेळी श्री मल्हार शिक्षण संस्था,विद्या महामंडळ प्रशाला,कोथळे ग्रामपंचायत, माजी विद्यार्थी संघटना ,आदी विविध संस्थाच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक नितीन राउत,काशिनाथ भोंग यांचा सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला.


       यावेळी बोलताना जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे म्हणाले की, शाळांबाबत शासन आपली जवाबदारी झटकत आहे. शिक्षक भरती होत नसल्याने अनुदानित शाळेवर संकट आले आहे. शाळेत घेतलेल्या शिक्षकांना पगार कसे द्यावेत हा प्रश्न संस्था चालकांसमोर आहे.शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. असे सांगून त्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना शुभेछ्या दिल्या. 


     यावेळी पांडुरंग सोनवणे,अड नितीन कुंजीर, ज्ञानेश्वर भोईटे,शंकरनाना जगताप,डॉ सुरेश उबाळे, प्रल्हाद पवार ,संदीप जगताप,सचिन भोसले आदींची भाषणे झाली. संस्थेचे पदाधिकारी पी एम जगताप,ज्ञानेश्वर जगताप,विजय जगताप,सुरेश खैरे,रवींद्र जगताप,खुशाल कुदळे,बबन भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ देवकर तर आभार केलास भोसले यांनी मानले.

Friday, July 22, 2022

अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिव तक्रार येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

 अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिव तक्रार येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप 




निरा ःप्रतिनिधी दि 22 

   महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेतेअजितदादा पवार  यांच्या वाढ दिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य  कांचनदादा निगडे देशमुख यांनी   निरा-शिवतक्रार  येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना   खाऊ वाटप केले .

 यावेळी आपल्या मनोगतात कांचन दादा यांनी  अजितदादा पवार यांच्या शैक्षणिक कामातील भरीव योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली . यावेळी त्यांच्या समवेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.उपाध्यक्ष राजेश चव्हाण, पुणे जिल्हा काँग्रेस ओ बी सी सेल अध्यक्ष राजेंद्र बरकडे ,निरा शिवतक्रार ग्रामपंचायत सदस्य संदीप  धायगुडे ,प्रगती पत संस्थेचे संचालक अरविंद जेधे उपस्थित होते

मुख्याध्यापक नंदकुमार चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले . 

संदीप धायगुडे यांनी आपल्या मनोगतात प्राथमिक शाळा शिवतक्रारचे दुरुस्ती काम चालू असुन याकामी आर्थिक मदत करावी असं आवाहन केलं .

मुख्याध्यापक नंदकुमार चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं, तर आभार विद्यार्थी शिवराज जेधे याने मानले



अजित पवार यांच्या वाढ दिवसा निमीत्त वीर येथे शालेय साहित्याचे वाटप

 अजित पवार यांच्या वाढ दिवसा निमीत्त वीर येथे शालेय साहित्याचे वाटप



वीर दि.२२


     राज्याचे माजी उपमुखयमंत्री अजित पवार यांच्या वाढ दिवसा निमीत्त आज शुक्रवार दि.२२ जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर येथे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.


      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर येथे त्याच बरोबर माळवाडी,रामोशीवाडा,समगीर  वाडी,बनकरवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जवळपास २२५ रायटिंग पॅडचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वीर व सोमेश्वरच्या माजी संचालक  सौ ऋतुजा राजेंद्र धुमाळ यांच्यावतीने  करण्यात आले हे वाटप करण्यात आले. यावेळी  माजी आमदार अशोकराव टेकवडे, तर पुणे जि.मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे ,मा.जि.अध्यक्ष विजयराव कोलते,आदर्श जि.प.सदस्य हेमंतकुमार माहूरकर, आदर्श जि.प.सदस्य सुदामआप्पा इंगळे,पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष पुष्कराज जाधव,सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मा. संचालिका सौ.ऋतूजाताई धुमाळ,ज्येष्ठ नेते श्री राजेंद्र धुमाळ, श्री विश्वासनाना जगताप, गावातील ग्रामस्थ राजेंद्र शिंदे ,अनिरुद्ध धुमाळ मणेश कुंभार सुजित धुमाळ सोमनाथ धुमाळ व लपतळवाडीचे उपसरपंच रवींद्र मोरे व सुहास पिलाणे व सर्व शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.

    यावेळी विजयराव कोलते यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्रबापू धुमाळ,रेणुका मस्के  यांनी केले व आभार रामोशीवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका बोरावके मॅडम यांनी मानले 

Monday, July 18, 2022

वाल्हेकरांवर संत ज्ञानेश्वर माऊली रुसली ; परतीचा मुक्काम वाल्हे येथे केला नाही

 वाल्हेकरांवर  संत ज्ञानेश्वर माऊली रुसली ; परतीचा मुक्काम वाल्हे येथे केला नाही



वाल्हे. दि.१८




संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला. या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम वाल्हे येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयात असतो. मात्र संत ज्ञानेश्वर माऊलींनी आजचा मुक्काम या विद्यालयात न करता दौडज येथील भैरवनाथ मदिरत  केला आहे.


आज सायंकाळी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामासाठी आला होता मात्र वाल्हे येथे मुक्काम न करता हा सोहळा मुक्कामासाठी दौंडज येथे गेला. दरम्यान वाल्हेकर ग्रामस्थांनी पालखी सोहळा प्रमुखांना वाल्हे येथेच  मुक्काम करण्याची विनंती केली होती. मात्र नाराज झालेल्या पालखी सोहळ्यातील कारभाऱ्यांनी वाल्हे ते मुक्काम न करता पालखी सोहळा दौंडज येथे नेला. यानंतर  दौंडज येथील  मंदिरात पालखी सोहळ्याचे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाल्हेकरांवर रुसण्याची ही दुसरी वेळ आहे. माऊलींचा पालखी सोहळा वाल्हे येथे आल्यावर   खांद्यावर पालखी घेऊन गावातून जात असतो. ही प्रथा सुद्धा बंद करण्यात आली आणि आता  आजचा मुक्काम न करता पालखी सोहळ्याने दौंडज येथील  भैरवनाथ मंदिरामध्ये  मुक्काम केला. ग्रामस्थांनी वादानंतर  विनंती केली होती. मात्र या विनंतीकडे सोहळा चालकांनी दुर्लक्ष करून वाल्हेकरांवर राग आळवला आहे. दरम्यान याबाबत सोहळा प्रमुखंकडे विचारणा केली असता .मुक्कामाच्या ठिकाणी खोल्या लवकर उपलब्ध न करून दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.



Sunday, July 17, 2022

परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले.

 परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले.  



नीरा :  दि.१८


    संत  ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी  सोहळा आषाढी एकादशी  नंतर आता  परतीचा प्रवास करतो आहे.आज (दि.१८) हा सोहळा  पाडेगाव येथील मुक्काम.आटोपून पुणे जिल्ह्याच्या दिशेने निघाला.आहे त्यापूर्वी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. 'माऊली माऊलीच्या गजरात माऊलींच्या ' पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले.  


      सातारा जिल्हयातील पाडेगाव येथील कालचा मुक्काम होता. आज सोमवारी सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा नीरा नदी किनारी आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माऊलींच्या पादुका सोहळा प्रमुखांनी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे स्नानासाठी देण्यात आल्या. आरफळकर, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, चोपदार बाळासाहेब रणदिवे चोपदार, दिनकर पाटील व त्यांच्या सहकार्यांनी 'माऊली माऊलींच्या' जयघोषात प्रसिद्ध दत्ता घाटावर माऊलींच्या पादुकांना ठिक सव्वानऊ वाजता स्नान घातले. 


         माऊलींचे स्नान सुरु असताना सोहळ्या सोबत आलेले पुरुष विणेकरी व तुळस घेतलेल्या महिलांनी रथाच्या पुढे व मागे दोन रांगा केल्या होत्या. पादुका पुन्हा रथाकडे आल्यावर प्रथम रथा पुढील व नंतर रथा मागील विणेकऱ्यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन देण्यात आले. हा अभुतपुर्व सोहळा पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. परतीच्या प्रवासातील हा सोहळा 'माऊली माऊलीच्या' जयघोषात मोठय़ा उत्साहात व शांतते पारपडला. यानंतर माऊलींच्या सोहळ्याने सकाळी दहा वाजता पुणे जिल्ह्यातील नीरा शहरात प्रवेश करत विठ्ठल मंदिरात विसाव्यासाठी ठेवण्यात आली.

Saturday, July 16, 2022

बापरे !! हा दिवे घाट आहे की खड्ड्यांचा घाट: दिवे घाटात खड्ड्यांचे साम्राज्य

 दिवे घाटात खड्ड्यांचे साम्राज्य ; वाहन चालकांना करावी लागते कसरत 



पुरंदर दि.१७


    पुरंदर तालुक्यात पुणे येथून येत असताना लागणारा अवघड चढणीचा आणि तीव्र वळणांचा दिवेघाट हा वाहन चालकांसाठी सध्या कसरतीचा मार्ग बनला आहे. दिवेघाटात दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पावसाळ्यात खड्डे पडलेले आहेत .आणि या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना खड्ड्यात चुकवताना वाहन चालवताना अतिशय कसरत करावी लागत आहे.

       खड्ड्यात वाहने आपटून वाहनांचाही मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे. चार चाकी दुचाकी चालकांना तर या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात त्रास करावा लागत आहे या खड्यांमध्ये आधळून वाहन चालकांचे अपघात देखील होत आहेत. दुचाकी स्वरांना रात्रीच्या अंधारामध्ये व पावसामध्ये या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि या खड्ड्यांमध्ये वाहने आपटत आहेत. परंतु या कशाचीही फिकीर प्रशासनाला राहिलेली नाही. पाऊस पडला आणि सालाबाद प्रमाणे खड्डे देखील आता घाटामध्ये पडलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा काही दिवसा पूर्वीच दिवे घाटातून गेलेला आहे. पालखी सोहळा पूर्वी जी नियोजन बैठक झाली होती. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग पप्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे गोडवे गायले होते. या ठिकाणी खड्डे बुजवलेले आहेत घाट आधी चकाचक झालेला आहे आणि आता सुकर प्रवास होणार आहे. अशा पद्धतीने गोडवे गायले जात असताना आज जर परिस्थिती बघितली तर आत्ता कुठे पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. तरच घाटामध्ये खड्ड्यांचा साम्राज्य झाले आहे. तीव्र वळणांवरती अगोदर समोरून येणारे वाहन बघायचं, की खड्डा बघायचा की वाहन चालवायचं अशी परिस्थिती आता वाहन चालकांची झालेली आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित प्रशासनाच याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.



या मार्गावर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे.वाहन चालक देखील तक्रारी करतात परंतु प्रशासन ढिम्मच आहे आणि या प्रशासनाच खरच या गंभीर बाबीकडे लक्ष जाणार का? हा प्रश्न आता या रस्त्याने रोज प्रवास करणाऱ्या वाहन चालकांकडून विचारला जातोय. एकंदरीत आत्ताच पावसाळा चालू झालेला आहे पावसाचा जोर वाढल्यानंतर मात्र घाटातील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळून झाल्याशिवाय राहणार नाही आणि या खड्ड्यांमध्ये आपटून एखाद्या वाहन चालकाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी तात्काळ खड्डे बुजवावेत व या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

वीर धरणातून आज १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग सुरु

 वीर धरणातून आज १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग सुरु. 

वीर धरण ९८.९१ टक्के भरले : आता नीरा दुथडी वाहणार. 



नीरा : १६ 

          नीरा नदीच्या धरण साखळीत संपूर्ण जून व जुलैचा पहिला आठवड्यात पावासाचे प्रमाण नगण्य होते. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या आठवड्यात तर पावसाने उसंतीच घेतली नाही, परिणामी आता भाटघर धरण ५४.३१ टक्के, नीरा-देवधर ४७.७४ टक्के, वीर धरण ९८.९१ टक्के, तर गुंजवणी धरण ७४.०१ टक्के भरले आहे. वीर धरणात पावसाचे पाणी वाढत असल्याने शनिवारी दुपारी चार वाजल्या पासून वीर धरणाचे तीन दरवाजे एका फुटांनी उचलून १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. 


        शुक्रवारी सकाळ पासून वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन १,४०० क्युसेक्सने व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेक्सने असे नीरा नदीपात्रात १ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. त्यानंतर धरणसाखळीत पावसाचा जोर वढता राहिल्याने धरणातील पाणपातळी वाढत गेली. परिणामी वीर धरणाच्या सांडव्यातून दुपारी २ वाजता ४ हजार ४१८ क्युसेक्सनै विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे रात्रभर नीरा नदीपत्रात एकून ६ हजार १६८ क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. आज शनिवारी ही दिवसभर संतधारा सुरुच आहेत. वीर धरणात पाणी वाढतच आहे. शनिवारी दुपारी वीर धरण ९८.९१ टक्के भरले आहे. तसेच धराणीची पाणीपातळी वेगाने वाढत असल्याने शनिवारी दुपारी ४ वाजता ९ हजार १४४ क्युसेक्सने विसर्गात वाढ करण्यात आली. त्यामुळे नीरा नदिच्या पात्रात दुपारी चार नंतर १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग सुरू झाला.  त्यामुळे आता नीरा नदी दुथडी भरुन वाहणार असुन नदीचे सर्व बंधारे भरणार आहेत.



नीरा पाटबंधारे विभागाच्यावतीने नदीकाठच्या सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल आहे. नदिवलील बंधारे, छोटे पुल, तसं नदी तीरावरील मंदिरे, स्मशानभूमीत वावर असणाऱ्या सर्वांनी काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.

सासवड उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई.

 सासवड उत्पादन शुल्क विभागाची मोठी  कारवाई.



गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मद्य वाहतूक प्रकरणी केली कारवाई


सासवड दि १६


        गोवा राज्यात विक्रीकरीता असलेले  मद्य महाराष्ट्रात विक्री साठी आणल्या प्रकरणी 

सासवड उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई  भोर तालुक्यातील सारोळा येथे करण्यात आली आहे.


    याबाबत सासवड येथी उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की,दिनांक १५ जुलै रोजी 

राज्य् उत्पादन शुल्क, पुणे यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार सारोळा गावचे हद्दीत, बँगलोर-पुणे महामार्ग क्र. ४ वर, हॉटेल नानाचीवाडी समोर, रोडवर सापळा लावुन संशयित वाहनांची तपासणी करीत असता, संशयित ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मदयसाठा व बिअरचा मुद्देमाल मिळुन आला. त्यावरुन ट्रक चालक नामे सुरेश चंद्रा कलाल वय ३६ वर्षे रा. सियाल मांग्री घाटी, पो. लसाणी, ता. देवगड जि. राजसंबंद व किसनलाल प्यारचंद खटीक वय २८ वर्षे रा. धानेन, ता. कोमलगढ, जि. राजसंबंद यांना जागीच अटक करुन ताब्यात घेण्यात आले. वाहतुकीसाठी वापरलेला  टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक क्र. आरजे ३२ जीए ५९५६ या ट्रकमध्ये ताब्यात घेण्यात आला त्यामध्ये १. गोवा राज्यात विक्रीस असलेले टयुवर्ग स्ट्राँग बिअरचे ५०० मिली क्षमतेचे ५० वॉक्स, २. इंम्पेरीयल ब्ल्यू व्हीस्कीचे ७५० मिली क्षमतेचे १५० बॉक्स, ३, मॅकडॉल व्हीस्कीचे ७५० मिली क्षमतेचे २५० बॉक्स ४. रॉयल चॅलेंजर्स व्हीस्कीचे ७५० मिली क्षमतेचे ५० बॉक्स् ५. जारव्हीस व्हीस्कीचे ७५० मिली क्षमतेचे ५० बॉक्स मिळुन आले सदरचा विदेशी मदयसाठा व बिअर अ.किं.रु. ३९१८०००/- इतक्या किंमतीचा मदयसाठा तसेच कुजलेली लोकर अं किं. रू. २०००/-, तीन मोबाईल फोन रु. ५,०००/- व गोवा राज्यात विक्रीस असलेले मदय वाहतुकीकामी वापरलेले वाहन किंमत रु. १०,००,०००/- असा एकुण ४९२५०००/- किंमतीचा प्रो. गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात आला.



 ही कारवाई मा. आयुक्त्  कांतीलाल उमाप  व  संचालक (अं.व.द.) श्री. सुनिल चव्हाण. यांचे आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप आयुक्त श अनिल चासकर, अधीक्षक  चरणसिंग बी. राजपुत, उपअधीक्षक  संजय आर. पाटील,  युवराज एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभाग, पुणे या पथकाने केली.  या  कारवाईत निरीक्षक  पी.सी. शेलार, दुय्यम निरीक्षक  राजेंद्र झोळ, आर. एम. सुपेकर, स. दु. नि. संदिप मांडवेकर,  जवान अक्षय म्हेत्रे, भागवत राठोड, रणजित चव्हाण, राम चावरे, सुनिल कुदळे, दत्ता पिलावरे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक राज्य् उत्पादन शुल्क् सासवड विभाग, पुणे या कार्यालयामार्फत चालु आहे.


वीर धरणातून आज १५ हजार १३१२ क्युसेक्सने विसर्ग होणार

 वीर धरणातून आज १५ हजार १३१२ क्युसेक्सने विसर्ग होणार. 

वीर धरण ९७.८३ टक्के भरले : आता नीरा दुथडी वाहणार.




नीर : नीरा नदीच्या धरण साखळीत संपूर्ण जून व जुलैचा पहिला आठवड्यात पावासाचे प्रमाण नगण्य होते. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या आठवड्यात तर पावसाने उसंतीच घेतली नाही परिणामी शनिवारी दुपारी भाटघर धरण ५३.९३ टक्के, नीरा देवधर ४६.५३ टक्के, वीर धरण ९७.८३ टक्के, तर गुंजवणी धरण ७३.५१ टक्के भरले आहे. वीर धरणात पावसाचे पाणी वाढत असल्याने शनिवारी दुपारी चार वाजल्या पासून वीर धरणाच्या चार दरवाजे एक फुटांनी उचलून १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. 


        शुक्रवारी सकाळ पासून वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन १,४०० क्युसेक्सने व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेक्सने असे नीरा नदीपात्रात १ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. त्यानंतर धरणसाखळीत पावसाचा जोर वढता राहिला परिणामी धरणातील पाणपातळी वाढत गेली. परिणामी वीर धरणाच्या सांडव्यातून दुपारी २ वाजता ४ हजार ४१८ क्युसेक्सनै विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे रात्रभर नीरा नदीपत्रात एकून ६ हजार १६८ क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. आज शनिवारी ही दिवसभर संतधारा सुरुच आहेत. वीर धरणात पाणी वाढतच आहे. शनिवारी दुपारी वीर धरण ९७.८३ टक्के भरले आहे. तसेच धराणीची पाणीपातळी वेगाने वाढत असल्याने शनिवारी दुपारी ४ वाजता ९ हजार १४४ क्युसेक्सने विसर्गात वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदिच्या पात्रात दुपारी चार नंतर १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आता नीरा नदी दुथडी भरुन वाहणार असुन नदीचे सर्व बंधारे भरणार आहेत.



सध्या वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ६१६८ cusecs विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणी पातळी वाढत आहे.त्यामुळे ९१४४ cusecs विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नीरा नदीच्या पात्रात एकूण १५३१२ cusecs विसर्ग राहील. आज दि.१६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता विसर्ग वाढविण्यात येणार आहे.नदीकाठच्या सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती.

Friday, July 15, 2022

वीर धरणातून ६ हजार ११८ क्युसेस वेगाने नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू.

 वीर धरणातून ६ हजार ११८ क्युसेस वेगाने नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू. 


वीर धारण ९३  टक्के भरले



नीरा :  दि.१५,


       नीरा नदिच्या धरण साखळीत पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पुरंदर व खंडाळा तालुक्याची सिमा असलेल्या नीरा नदीवरील वीर धारण ९० टक्के भरले असून. शुक्रवार दि. १५ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून नीरा नदीपत्रात ६ हजार ११८ क्युसेक्सने विसर्ग सुरु झाला आहे.


    शुक्रवारी सकाळी आकरा वाजल्यापासून वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन १,४०० क्युसेक्सने व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेक्सने असे नीरा नदीपात्रात १ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. त्यानंतर धरणसाखळीत पावसाचा जोर वढता राहिला परिणामी धरणातील पाणपातळी वाढत गेली. वीर धरणाच्या सांडव्यातून दुपारी २ वाजता ४ हजार ४१८ क्युसेक्सनै विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता नीरा नदीपत्रात एकून ६ हजार ११८ क्युसेक्सने विसर्ग सुरु झाला आहे.


       पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी. नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. असा सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

Thursday, July 14, 2022

वीर धरणातून पुढील २४ तासात पाणी सोडणार

 वीर धरणातून पुढील २४ तासात पाणी सोडणार

वीर धरणात ८२.५६ टके पाणीसाठा



नीरा : १४

      पुरंदर व खंडाळा तालुक्याच्या सिमेवरुन वाहत असलेल्य नीरा नदिवरील वीर धरणात मागील आठवड्याभरात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. ९.५० टीएमसी क्षमता असलेल्या वीर धरणात गुरवारी सकाळ पर्यंत ७.७६ टीएमसी म्हणजे ८२.५६ टक्के भरल्याने आता पुढिल २४ तासांत केंव्हाही धरणातून पाणी सोडण्याची सुचाना धरण प्रशासनाने केली आहे. 


     धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दि. १४/०७/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७८.३२ मी. इतकी असून उपयुक्त पाणीसाठा ७.७६ टीएमसी झाला असून धरण ८२.५३% इतके भरले आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत संततधार पाऊस पडत असून वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये पुढील २४ तासात विसर्ग सुटण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सुरक्षिततचेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आव्हान धरण प्रशासनाने केले आहे.

Wednesday, July 13, 2022

गुरूंची जाणीव मनात ठेवून गुरु विषयी आदर व्यक्त करावा : प्रा. निवेदिता पासलकर.

 गुरूंची जाणीव मनात ठेवून गुरु विषयी आदर व्यक्त करावा : प्रा. निवेदिता पासलकर.



सौ.लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 

नीरा : 

    "गुरुचे स्थान आयुष्यात आहेच, आपण आपल्या आयुष्यात इतरांचेही चांगले गुरु व्हावे. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर योग्य गुरुची साथ असेल तर आयुष्य यशस्वी होते. गुरुचे आयुष्यातील स्थान पुरातन काळापासून वंदनीय मानले गेले आहे. गुरूंची जाणीव मनात ठेवून गुरु विषयी आदर व्यक्त करावा." असे मार्गदर्शन प्राचार्य निवेदिता पासलकर यांनी केले. 


      नीरा येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयात बुधवार (दि.१३) रोजी उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी झाली. यावेळी प्रा. पासलकर बोतल होत्या. पर्यवेक्षक उत्तम लोहकरे आणि सर्व सेवकांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. इयत्ता पाचवी ते दहावी अखेरील विद्यार्थिनींनी सुंदर शुभेच्छापत्र तयार केली व शाळेतील शिक्षकांना देण्यात आली. विद्यार्थिनींनी गुरुचे महत्व दर्शवण्यासाठी सुंदर भाषणे केली. इयत्ता दहावी मधील राणी मोरे, सृष्टी शेंडगे, यशस्वी जाधव या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची तयारी केली. यावेळी विद्यालयातील सहशिक्षक शितल शिंदे, रूपाली रणनवरे, संजय भोसले, सपना ओव्हाळ, अश्विनी खोपे, ज्ञानेश्वर जाधव व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.



Tuesday, July 12, 2022

नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण नाही : १९ जुलैला होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष

 

नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण नाही १९  जुलैला होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष





नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याच्या संदर्भात आज कोणताही निर्णय होऊ शकला नाही.

यापूर्वी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बांठिया समितीने सादर केलेल्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी पुढील सुनावणी येत्या १९ जुलैला होणार असून, तोपर्यंत पुढील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करू नये, असे निर्देश कोर्टाने दिले.

न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमाेर या प्रकरणाची सुनावणी झाली. निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी राज्य सरकारतर्फे तुषार मेहता यांनी केली. ओबीसी आरक्षणासंदर्भात जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नियुक्त केला आहे. आयोगाचा अहवाल आता प्राप्त झाला आहे. या अहवालाचा अभ्यास होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्या अशी मागणी राज्य सरकारतर्फे केली. त्यावर, आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया कशी थांबविता येईल, असा सवाल कोर्टाने न्यायालयाने केला. तर, आता निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या ओबीसी उमेदवारांवर अन्याय होईल, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला.

यासंदर्भात निवडणूक आयोगाची काय भूमिका आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली. यावेळी निवडणूक आयोगाचे वकील मनिंदर सिंग यांनी एक आठवड्याने निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यास संमती दिली.

 जाहीर केलेल्या  निवडणुका ठरल्याप्रमाणेच निवडणुका घ्या
यावेळी आता निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या ९२ नगर परिषदांच्या निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही. परंतु ज्या नगर परिषदा व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित व्हायचा आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले.
यासंदर्भात पुढील सुनावणी येत्या १९ जुलैला होईल. यानंतर ओबीसी आरक्षणाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

·         ज्या निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही, तेथील ओबीसी आरक्षण बांठिया आयोगाच्या वैधतेवर अवलंबून आहे.

·         आयोगाने विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विभागवार मतदार यादीतील मतदारांच्या आडनावांवरून ओबीसींचे लोकसंख्येतील प्रमाण निश्चित केले आहे.

·         या महापालिका, जिल्हा परिषदा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य १९ जुलैला ठरणार आहे.

 

6 जण प्रवास करीत असलेली स्कॉर्पिओ नाल्यात गेली वाहून

 



    नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केळवदजवळ एका नाल्यामध्ये स्कॉर्पिओ अडकली असून त्यामध्ये असलेले 6 प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत.

    सतरापूर आणि नांदा गावांमधून वाहणाऱ्या नाल्याला पूर आलाय. पुलावरून पाणी वाहात असताना स्कॉर्पिओ चालकानं गाडी नेण्याचं भलतं धाडस केलं. मात्र पाण्याचा मोठा लोंढा आला आणि स्कॉर्पिओ वाहून गेली. एका खडकाला गाडी अडकली मात्र त्यातून प्रवाशांना बाहेर येता आलं नाही, असं दृष्यांवरून दिसतंय.

    पोलीस घटनास्थळी पोहोचले असून गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यातील कुणी बचावलं असण्याची शक्यता फारच कमी असल्याचं मानलं जातंय. या धक्कादायक घटनेमुळे भलतं धाडस कसं जीवावर बेतू शकतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

    हे सुद्धा वाचा

लोकशाही मध्ये पोलिसी राज नको; जामीन मिळण्यासाठी सोपा कायदा कारा ; सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

 लोकशाही मध्ये पोलिसी राज नको; जामीन मिळण्यासाठी सोपा कायदा कारा ; सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना




नवी दिल्ली : दि.१३


   लोकशाहीत पोलीस राज्य आहे, असा आभास कधीच निर्माण केला जाऊ शकत नाही. कारण, दोन्ही संकल्पना एकमेकांच्या विरुद्ध आहेत. असे निरीक्षण करून सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे .त्याच बरोबर केंद्र सरकारला जामीन मंजूर करणे सुलभ करण्यासाठी 'बेल ॲक्ट'च्या स्वरूपात विशेष कायदा आणण्याची शिफारस केली.


सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमारच्या निकालातील निर्देशांचे उल्लंघन व कलम ४१ आणि ४१अ सीआरपीसी (पोलीस केव्हा अटक करू शकतात) चे उल्लंघन करून होणाऱ्या अनावश्यक अटकेमुळे ही समस्या उद्भवली आहे, असे म्हटले आहे.


अनावश्यक अटक टाळण्याचे निर्देश


निर्देशांचे पालन करण्यात तपास यंत्रणांचा निष्काळजीपणा आढळल्यास न्यायालयाने तो उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावा.

सीआरपीसीच्या कलम ४१ आणि ४१ अ चे पालन न झाल्यास आरोपी जामिनासाठी पात्र आहे.

जामिनावर विचार करताना, जामीनपात्र गुन्ह्यात आरोपीला हजर केले जाते तेव्हा किंवा पोलिसांनी अशा प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यावर पुन्हा स्वतंत्र जामीन अर्जाची गरज नाही.

जामीन अटींचे पालन करण्यास सक्षम नसलेल्या कच्च्या कैद्यांचा शोध घेण्याची व त्यांच्या सुटकेसाठी कारवाई करण्याची मोहीम उच्च न्यायालये राबवावी.

जामीन अर्ज दोन आठवड्यांत निकाली काढावेत. अटकपूर्व जामिनासाठीचे अर्ज सहा आठवड्यांत निकाली काढण्यात यावेत.

भारतातील कारागृहे कच्च्या कैद्यांनी भरलेली आहेत. आकडेवारी दर्शवते की २/३ पेक्षा जास्त कैदी अंडरट्रायल आहेत. यापैकी बहुतेक सात वर्षे किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांत आरोपी असून, त्यांच्या अटकेची गरज नसावी. ते गरीब आणि अशिक्षित आहेत आणि त्यात महिलांचा समावेश आहे. असं 

न्यायाधीश संजय किशन कौल आणि एम.एम. सुंदरेश यांनी म्हटले आहे.

डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिस बंदीला आव्हान, शासनाच्या २०१२ च्या 'त्या' अध्यादेशाला न्यायालयाकडून स्थगिती

 डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिस बंदीला आव्हान, शासनाच्या २०१२ च्या 'त्या' अध्यादेशाला न्यायालयाकडून तूर्त स्थगिती



मुंबई- 

         सरकारी नोकरी करणाऱ्या  डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करण्यास मनाई करणारा राज्य सरकारचा २०१२ च्या अध्यादेशाला डॉक्टरांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्याची दखल घेत खंडपीठाने 'त्या' अध्यादेशाला तुर्तास स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकारी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने ऑगस्ट २०१२ रोजी अध्यादेश काढून खाजगी सेवा देण्यावर बंधने घातली आणि त्या ऐवजी डॉक्टरांना विशेष व्यवसाय रोध भत्ता सुरू केला. मात्र, या अध्यादेशामुळे डॉक्टरांचे नुकसान होत असल्याचा दावा करत डॉक्टरांनी या निर्णयाला २०१२ मध्ये मॅट कडे दाद मागितली. मॅटने सरकारचा निर्णय योग्य ठरवत २०१४ साली डॉक्टरांची मागणी फेटाळून लावली. मॅटच्या या निर्णयाला पुण्यातील भोर येथील वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ अनिल राठोड यांनी ड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्या अधिकारांवर गदा येत आहे. असा दावा याचिकाकर्त्यांकडून ड. सांगवीकर यांनी केला. त्यांच्या युक्तिवादाला राज्य सरकारच्यावतीने विरोध करण्यात आला. खाजगी प्रॅक्टिसमुळे सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर परिणाम होतो त्यांना डॉक्टरांकडून अपेक्षित सेवा मिळत नाही असा दावा सरकारच्या वतीने ड. एन सी वाळिंबे यांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेत खंडपीठाने याचिकाकर्त्याना दिलासा देत राज्य सरकारच्या २०१२ च्या 'त्या' अध्यादेशाला तुर्तास स्थगिती दिली आणि सुनावणी तहकूब केली

महापालिका स्टाफ नर्स भरतीला स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

 महापालिका स्टाफ नर्स भरतीला स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश


राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची माहिती



पिंपरी, १३ जुलै - पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागात मानधनावर 15 वर्षांपासून काम करणारे, कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणा-या स्टाफ नर्स, एएनएम यांना महापालिका सेवेत कायम करण्याचा ठरावाकडे दुर्लक्ष करुन पालिका प्रशासनाने राबविलेल्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच महापालिका सर्वसाधारण सभेने केलेल्या ठरावावर 6 आठवड्यात नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांनी निर्णय घ्यावा. याचिकाकर्ता राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या 123 सभासदांना कामावरुन कमी करु नये असा आदेशही न्यायालयाने दिला. त्यामुळे या स्टाफ नर्सला मोठा दिलासा मिळाला असल्याचे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत सांगितले.


पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला संघटनेचे समन्वयक  शशांक इनामदार, सल्लागर अॅड. सुशील मंचरकर, अमोल घोरपडे, दीपक पाटील, राहुल शितोळे आणि संघटनेच्या सभासद बहुसंख्येने स्टाफ नर्स उपस्थित होत्या.  यशवंतभाऊ भोसले म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात गेल्या 10 ते 15 वर्षांपासून स्टाफ नर्स, एएनएम, लॅब टेक्‍निशियन,  एक्‍स रे टेक्‍निशयन मानधनावर काम करतात. कोरोना महामारीत रणांगणात उतरून या कोरोना योध्यांनी काम केले. कामाची दखल घेत महापालिका सभेने 31 जुलै 2021 रोजी या 493 कोरोना योद्ध्या कर्मचा-यांचा पालिका सेवेत कायम करण्याचा ठराव पारित केला. आयुक्तांच्या स्वाक्षरीने त्या ठरावाचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास खात्याकडे मान्यतेसाठी पाठविला. नगरविकासने त्याला आक्षेप घेतला नाही. त्याऊलट महापालिकेकडून अधिकची माहिती मागवून घेतली. दरम्यान, 13 मार्च 2022 रोजी नगरसेवकांची मुदत संपली. निवडणूक झाली नसल्याने प्रशासकीय राजवट लागली.


मानधनावरील कर्मचा-यांना कायम करण्याची प्रक्रिया प्रलंबित असतानाच महापालिका प्रशासनाने स्टाफ नर्स, एएनमसह इतर तांत्रिक अशा कर्मचा-यांच्या 131 जागांकरिता भरती काढली. त्यावर राष्ट्रीय श्रमिक आघाडीने प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने ठरावाची अगोदर अंमलबजावणी करावी. तोपर्यंत नवीन भरती करु नये असे लेखी पत्र महापालिका प्रशासनाला दिले.  तरीही, प्रशासनाने भरती प्रक्रिया थांबविली नाही. त्यामुळे याविरोधात संघटनेच्या सभासद असलेल्या स्टाफ नर्स, एएनएम अशा 123 सभासदांच्या यादीसह अॅड. वैशाली किशोर जगदाळे यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरुन न्यायालयाने महापालिका आयुक्तांना नोटीस दिली होती. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने लेखी परीक्षा घेतली. त्यामुळे संघटनेने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली. न्यायमूर्ती एम.के.मेनन व न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. संघटनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ज्ञ, कायदे तज्ज्ञ अॅड.उदय वारुंजीकर यांनी बाजू मांडली. याचिकेवर दिवसभरात तीनवेळा सुनावणी झाली.


संघटनेच्या वतीने युक्तीवाद करताना अॅड.उदय वारुंजीकर म्हणाले, मानधनावरील कर्मचा-यांना कायम करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. 10 ते 15 वर्षांपासून काम करणा-या कर्मचा-यांना कायम करण्याऐवजी भरती प्रक्रिया राबवून नवीन कर्मचारी घेणे म्हणजे संघटनेच्या संभासदांवर मोठा अन्याय आहे. न्यायालयाने हा युक्तीवाद मान्य केला आणि महापालिकेच्या स्टाफ नर्स भरती प्रक्रियेला स्थगिती दिली. त्याशिवाय नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांनी 6 आठवड्यात महापालिका सर्वसाधारण सभेच्या ठरावावर निर्णय घ्यावा. तोपर्यंत मानधनावरील कामगारांना कामावरुन कमी करु नये, असाही आदेश दिला. हा निर्णय 8 आठवड्याकरिता अबाधित राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याचे भोसले यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने  अॅड. रोहित सखदेव, शासनाच्या वतीने अॅड. एम.एन.पाबाळे यांनी बाजू मांडली.


भाजप शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांनी महापालिका सभागृहात ठराव करुन कामगारांना दिलेला शब्द पाळला - भोसले


महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यावेळी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेशदादा लांडगे यांनी कोरोना महामारीच्या कालावधीत काम केलेल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान व्हावा. याकरिता यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील मानधनावर काम करणा-या कर्मचा-यांना तुम्हाला आम्ही सेवेत कायम करु असा जाहीर सभेत शब्द दिलेला होता. तो शब्द ख-यात उतरविण्यासाठी त्यांनी स्वत: आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या संमतीने महापालिका सभागृहात ठराव मंजूर करुन घेतला. तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला. त्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट आली. प्रशासनाने नवीन भरतीचा निर्णय घेतला. त्याला न्यायलयाने स्थगिती दिली आहे. आता राज्यात भाजपप्रणित एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे. त्यामुळे महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात कोरोना योद्ध्यांना सेवेत कायम करण्याच्या ठरावाला हे सरकार मान्यता देईल. प्रस्तावित सर्व कर्मचारी महापालिका सेवेत कायम होतील'', असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला

Featured Post

राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान

 राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान मुंबई :       ...