पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा.योगेश खरात यांचा सत्कार
पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा.योगेश खरात यांचा सत्कार
इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता.इंदापूर महाविद्यालयातील वाणिज्य विभागप्रमुख प्रा.योगेश मारुती खरात यांनी डॉ.भरत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली 'इम्पॅक्ट ऑफ फूड डिलिव्हरी स्टार्टअप्स ऑन हॉटेल इंडस्ट्री इन पुणे विषयावर संशोधन प्रबंध सादर करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केली.
या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते प्रा. खरात यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग,डॉ. प्रशांत शिंदे,डॉ.विलास बुवा तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम,खजिनदार वीरबाला पाटील,विश्वस्त कुलदीप हेगडे, विश्वस्त राही रणसिंग,विश्वस्त शंकर रणसिंग यांनी प्रा.खरात यांचे अभिनंदन करून त्यांच्या संशोधन कार्याचे कौतुक केले आणि भविष्यातही शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रा.योगेश खरात यांनी संपादन केलेली विद्यावाचस्पती पदवी ही महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत मोलाची भर असून त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि संशोधन संस्कृतीला नवी उभारी मिळाली असल्याचे संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा