पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी १ सप्टेंबरला पुण्यात भव्य मूक मोर्चा

इमेज
  ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी १ सप्टेंबरला पुण्यात भव्य मूक मोर्चा हल्ल्यांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत अधिकारी आक्रमक; जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा पुणे, दि. ३१ : कर्तव्य बजावत असताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले, धमक्या, दबाव आणि मानसिक त्रासाच्या घटनांना आळा घालून त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारीही या आंदोलनात सहभागी होणार असून जिल्हा परिषद पुणे ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे असा शांततामय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे अध्यक्ष अमोल घोळवे आणि सरचिटणीस संदीप ठवाळ यांनी केले आहे. जळगावच्या घटनेनंतर संतापाची लाट जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीमध्ये १७ ऑगस्ट २०२६ रोजी नियोजित ग्र...

नीरा येथे आढळून आलेल्या बेवारस व्यक्तीचा ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा शोध सुरू

इमेज
 नीरा येथे आढळून आलेल्या बेवारस व्यक्तीचा ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा शोध सुरू     नीरा  पुरंदर तालुक्यातील नीरा येथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, जेजुरी पोलिसांकडून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी नीरा येथे एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची जेजुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक ८५/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. तसेच २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी GD क्रमांक ०१४ नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस नोंदीत आहे.  मृत व्यक्तीचे अंदाजे वय ५० वर्षे, बांधा सडपातळ आहे. त्याच्या अंगात निळ्या व पिवळ्या रंगाचा चेक्स असलेला फुल बाह्यांचा शर्ट आणि चॉकलेटी रंगाची पॅन्ट होती. तसेच त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्य...

नीरा-शिवतक्रारमध्ये रंगणार ‘द लिजेंडरी नाईट’; किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांना उजाळा

इमेज
नीरा-शिवतक्रारमध्ये रंगणार ‘द लिजेंडरी नाईट’; किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांना उजाळा  पुरंदर :        भारतीय संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून देणारी आणि ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांना आदरांजली वाहणारी ‘द लिजेंडरी नाईट’ ही विशेष संगीत मैफल शनिवारी (दि.२२ ऑगस्ट) नीरा-शिवतक्रार येथे रंगणार आहे. संगीतप्रेमींसाठी ही मैफल पर्वणी ठरणार असून, किशोर कुमार यांच्या गाजलेल्या गीतांचे सादरीकरण स्थानिक व प्रतिभावान गायकांच्या आवाजातून अनुभवता येणार आहे.          ऑर्केस्ट्रा एव्हरग्रीनच्या वतीने प्रथमच नीरा-शिवतक्रार परिसरात या भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे अडीच तासांच्या या विशेष कार्यक्रमात किशोर कुमार यांच्या सदाबहार गीतांचा नजराणा संगीतप्रेमींना अनुभवता येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक, भावगीत, विरहगीत तसेच उत्साहपूर्ण गाण्यांची विविधता या मैफलीतून सादर होणार असल्याने रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.        या कार्यक्रमात स्थानिक गायक प्राजक्ता पवार, सचिन अग्रवाल, प्रसाद...

निरा नगरीत स्वातंत्र्यदिनानिमित्त समूह राष्ट्रगीत गायनाचा ऐतिहासिक उपक्रम. ‘३ मिनिटे देशासाठी’ नागरिकांनी काय करायचं!

इमेज
निरा नगरीत स्वातंत्र्यदिनानिमित्त समूह राष्ट्रगीत गायनाचा ऐतिहासिक उपक्रम.  ‘३ मिनिटे देशासाठी’ नागरिकांनी काय करायचं!  पुरंदर :         स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने निरा शहरात यंदा देशभक्तीचा अनोखा जागर होणार असून, ‘३ मिनिटे देशासाठी’ या संकल्पनेतून १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शहरातील विविध ठिकाणी एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी निरा नगरी सज्ज झाली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.        निरा शहरातील विविध प्रमुख चौक व ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रगीत प्रसारित करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या प्रसारित ठिकाणी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहून राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.      निरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक, जयभवानी जीवनदीप मंडळ, कानिफनाथ तरुण मंडळ, जय शंकर मित्र मंडळ, श्री बुवासाहेब चौक, नगर रोड वरील भैरवनाथ इलेक्ट्रॉनिक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

नीरेत एटीएम फसवणुकीची मालिका; बँका आणि यंत्रणा झोपेत, भामटे मात्र मोकाट! आठवडाभरात दुसरी घटना; ४० हजारांचा गंडा, तक्रारदाराची पोलिस आणि बँकांकडूनही हेलपाटे

इमेज
नीरेत एटीएम फसवणुकीची मालिका; बँका आणि यंत्रणा झोपेत, भामटे मात्र मोकाट!  आठवडाभरात दुसरी घटना; ४० हजारांचा गंडा, तक्रारदाराची पोलिस आणि बँकांकडूनही हेलपाटे  पुरंदर :            पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट झाला असून, आठवडाभरात दुसऱ्यांदा एका खातेदाराची हजारो रुपयांची फसवणूक झाल्याने बँकांची सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित यंत्रणांची कार्यपद्धती पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. नागरिकांचे कष्टाचे पैसे क्षणात लंपास होत असताना बँका आणि यंत्रणा मात्र जबाबदारी झटकत असल्याचे चित्र समोर आले आहे.       मागील आठवड्यात एसबीआयच्या एटीएममध्ये पिंगोरी येथील एका शेतकऱ्याचे एटीएम कार्ड बदलून सुमारे ३० हजार रुपये काढण्यात आले होते. त्या घटनेची धूळही बसलेली नसतानाच गुरुवारी राख येथील मेंढपाळ व्यावसायिक अण्णा महानवर यांची महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये तब्बल ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.             महानवर पैसे काढण्या...