औरंगाबाद ते शिर्डी अवघ्या एका तासात, भरावे लागणार एवढा टोल
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे "> हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे "> समृद्धी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी "> नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 10 जिल्ह्यातील 26 तालुके आणि 391 गावातून जाणाऱ्या या महामार्गामुळे राज्यातील विकासात आणखी एक भर पडणार असून , प्रवास सुखकर होणार आहे. दरम्यान याचा फायदा औरंगाबाद ते शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील होणार आहे. कारण समृद्धी महामार्गामुळे आता औरंगाबाद ते शिर्डी अवघ्या एका तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद "> औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील "> जालना जिल्ह्यातील साई भक्तांचा प्रवास आता कमी वेळेत आणि सुखकर होणार आहे. समृद्धी महामार्गाचा नागपूर-शिर्डी हा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीस खुला केला जाणार आहे. त्यामुळे औरंगाबादहून शिर्डी जाण्यासाठी वैजापूर व श्रीरामपूरमार्गे आदळ- आपट करीत चार तासांत शिर्डीत जाण्याच्या जाचातून भाविकांची सुटका होणार आहे. औरंगाबादच्या सावंगी इंटरचेंजपासून अवघ्या चाळीस मि...