27 तासांचा महाब्लॉक! लोकलसह या एक्स्प्रेसही रद्द, आज ही बातमी पाहूनच घराबाहेर पडा
Mumbai Local Megablock: मध्य रेल्वेच्या मार्गावरील तब्बल 27 तासांच्या जम्बोब्लॉकला सुरुवात झाली आहे. कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे लोकलसह एक्स्प्रेस ट्रेनवरही परिणाम होणार आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक लोकल गाड्या , एक्स्प्रेस गा्डया रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सीएसएमटीकडे येणाऱ्या काही एक्स्प्रेस ट्रेन पुणे , पनवेल आणि नाशिकपर्यंतच धावणार आहेत. त्याशिवाय काही ट्रेन पुणे , पनवेल आणि नाशिकमधून मार्गस्थ होतील. मध्य रेल्वेच्या या 27 तासांच्या मेगाब्लॉकचा फटका जवळपास 27 लाख लोकांना बसणार आहे. ब्लॉक कालावधी कुठे किती ? अप आणि डाउन धिम्या मार्गावर: शनिवार दि. 19.11.2022 रोजी 23:00 वाजल्यापासून ते रविवार दि. 20.11.2022 रोजी च्या 16:00 वाजेपर्यंत = 17:00 तासांचा ब्लॉक. अप आणि डाउन जलद मार्गावर: शनिवार दि. 19.11.2022 रोजी 23:00 वाजल्यापासून ते रविवार दि. 20.11.2022 रोजी च्या 16:00 वाजेपर्यंत = 17:00 तासांचा ब्लॉक. अप आणि डाउन हार्बर मार्गावर: शनिवार दि. 19.1...