Tuesday, April 30, 2024

अबब... पुरंदरचे तापमान प्रचंड वाढत वाढे... पुढिल आठवड्यात तब्बल किती अंश तापमान होईल पहा...

 अबब...  पुरंदरचे तापमान प्रचंड वाढत वाढे...


पुढिल आठवड्यात तब्बल किती अंश तापमान होईल पहा...





पुरंदर :
     दुष्काळी पुरंदरमधील उन्हाचा पारा वाढता वाढत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक मेटाकुटीला आले आहेत. काल परवा पर्यंत ३८-३९ अंश सेल्सिअस तापमान असेल पुरंदरच्या ग्रामीण भागात पुढिल आठवड्यात तब्बल ३९ ते ४२ अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


पुरंदर तालुका, जि. पुणे :
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार पुरंदर तालुक्यात दिनांक ३० एप्रिल, २०२४ ते ०४ मे, २०२४ दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवसांत कमाल तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ११ ते १८ कि.मी. दरम्यान राहील. आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहील. प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषि मौसम सेवा तथा प्रमुख, कृषि हवामानशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, पुणे

पुणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक जिल्हा कार्यकारणी निवडी विषयी चर्चा.

 पुणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक 


जिल्हा कार्यकारणी निवडी विषयी चर्चा. 




पुणे : 

        मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित पुणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच बरखास्त करण्यात आली आहे. नवीन कार्यकारणी निवडीसाठी पुणे येथे बैठक झाली. १९ मे रोजी नवीन कार्यकारिणीची नियुक्ती होणार असून, प्रत्येक तालुक्यातील दोन सदस्य जिल्हा कार्यकारणी सदस्यपदासाठी नियुक्त करण्याच्या सुचना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे. 

      मराठी पत्रकार परिषदेच्या नियमानुसार कार्यकारिणीची निवड लोकशाही मार्गाने होत असतात. सर्वांनुमते किंवा थेट निवडणूकीच्या माध्यमातून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कार्यकरणीची निवड केली जाते. पुणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणीची मुदत संपल्याने बरखास्त करण्यात आली आहे. नव्याने कार्यकारणी निवडण्याबाबत चर्चा करण्यासाठी पुणे येथील आयबी हॉल येथे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची व पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांची बैठक रविवारी पार पडली. 

     नव्याने कार्यकारणी निवडण्याबाबत मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मावळती जिल्हा कार्यकारणी, विविध तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. १७ में पर्यंत जिल्हा कार्यकारणीसाठी इच्छूक सदस्यांची नावे मराठी पत्रकार परिषदचे विभागीय सचिव गणेश मोकाशी यांच्याकडे देण्यात यावीत. या सदस्यांतून परिषदेचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारणीची नियुक्ती रविवार १९ मे रोजी   करण्यात येणार आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, सचिव गणेश मोकाशी यांनी निवडीबाबत मार्गदर्शन केले. 

    बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे संघटक सुनील वाळूंज, बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळूंखे, इंदापूरचे सतिश सांगळे, भोरचे सुर्यकांत किंद्रे,संजय इंगुळकर, चाकणचे हनुमंत देवकर, शिरुर तालुका अध्यक्ष संजय बाराहाते, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अनिल वडघुले, सुरज साळवे, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, हवेली अध्यक्ष रमेश निकाळजे, अविनाश आदक, पुणे शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तारे...‌. बैठकीला उपस्थितांचे स्वागत पुणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील लोणकर व प्रास्ताविक मराठी पत्रकार परिषदेचे परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केले. तर आभार राज्य सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी मानले.

Tuesday, April 23, 2024

नीरेत मोटरसायकलींची समोरा समोर धडक : अपघातात एक ठार तर तीन जखमी

 नीरेत मोटरसायकलींची समोरा समोर धडक :  अपघातात एक ठार तर तीन जखमी






पुरंदर :
         पुरंदर तालुक्यातील नीरा येथे नीरा - बारामती मार्गावर दोन मोटासायकलींची समोरा समोर जोरदार धडक झाली. यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर तीन जन जखमी झाले आहेत. यामध्ये बंटी सुरेश गमंडे रा.आनंदनगर निंबुत या ३५ वर्ष व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला. तर तुकाराम सुखदेव माने (२०) आणि तेजस राहुल शिंदे, इरफान आरिफ सय्यद रा.निंबुत (ता.बारामती) हे जखमी झाले आहेत.

       याबाबत नीरा पोलिसांनी मंगळवारी दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता दिलेल्या माहिती नुसार नीरा गावचे हद्दीत नीरा ते बारामती रोडवर बुवासहेब ओढ्यावरिल पुलावर बुवासाहेब मंदिराचे समोर मोटरसायकल क्र. एम. एच. ४२ w ३४४८ व मोटरसायकल क्र. एम. एच. ४२ बी. एम. ३३२५ यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात नंतर  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोकाशी आणि सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमींना लोणंद येथे हॉस्पिटलमध्ये उपचारा पाठवले व  वाहतूक सुरळीत केली. याबाबत अद्याप पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही.


Monday, April 22, 2024

नीरा येथे दोन मोटरसायकलची समोरा समोर धडक अपघातात एक जण ठार तर तीन जन जखमी

 नीरा येथे दोन मोटरसायकलची समोरा समोर धडक अपघातात एक जण ठार तर तीन जन जखमी 


 नीरा दि.२३

    पुरंदर तालुक्यातील नीरा येथे नीरा बारामती मार्गावर  दोन मोटासायकलची समोरा समोर जोरदार धडक झाली. यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर तीन जन जखमी झाले आहेत. यामध्ये बंटी सुरेश गमंडे रा.आनंदनगर निबुत या 35 वर्षीय व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला. तर तुकाराम सुखदेव माने (२०) आणि तेजस राहुल शिंदे व  इरफान आरिफ सय्यद रा.निंबुत ता.बारामती ,जी.पुणे हे जखमी झाले आहेत.


       याबाबत नीरा पोलिसांनी आज दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता दिलेल्या माहिती नुसार   निरा गावचे हद्दीत निरा ते बारामती रोडवर बुवासहेब ओढ्यावरिल  पुलावर जवळ बुवासाहेब मंदिराचे समोर मोटरसायकल क्रमांक एम एच 42/w/34 48   व मोटरसायकल क्रमांक एम एच 42/ बी एम/ 33 25 यांचा अपघात झाला.यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात नंतर  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोकाशी आणि सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमींना लोणंद येथे हॉस्पिटलमध्ये उपचारा पाठवले व  वाहतूक सुरळीत केली.याबाबत अद्याप पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही.

Saturday, April 20, 2024

अजितदादांची अपघातग्रस्त पत्रकारांना मदत; ताफ्यातील गाडीतून पाठवले रुग्णालयात, डॉक्टरांना उपचाराबाबत दिल्या सुचना.

 अजितदादांची अपघातग्रस्त पत्रकारांना मदत; ताफ्यातील गाडीतून पाठवले रुग्णालयात, डॉक्टरांना उपचाराबाबत दिल्या सुचना.




बारामती :
         बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत झालेला अपघात पाहून क्षणात आपला ताफा थांबवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जखमी झालेले जेष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रुग्णालयात उपचाराच्याही सुचना दिल्या.

     याबाबत अधिक माहिती अशी, सोनगाव येथील आनंदराव देवकाते पत्नी संगीतासह आपल्या कारमधून बारामतीहून सोनगावकडे निघाले होते. त्यावेळी रामभाऊ तावरे यांच्या दुचाकीची कारला धडक होऊन तावरे खाली पडले. त्यानंतर काही वेळातच तिथून कन्हेरीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली गाडी थांबवण्याच्या सूचना चालकाला दिल्या. हे तर रामभाऊ, असं म्हणत तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत तावरे यांना बसवले, सोबत काही लोक दिले आणि दवाखान्यात पाठवले.

     पत्रकार तावरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. मात्र अशातही क्षणाचा विलंब न लावता अजितदादांनी स्वतः पुढे होत दाखवलेली ही तत्परता सर्वांना भावली. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना देखील रामभाऊ तावरे यांच्या उपचाराबाबत कळवले. देवकाते पती पत्नीला काळजीचे काही कारण नाही असं सांगत दिलासा दिला.

Friday, April 19, 2024

आळंदी मंदिरातून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान. पुणे, सासवड दोन दिवस मुक्काम होणार लोणंदला अडीच दिवस मुक्काम

 आळंदी मंदिरातून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान.


पुणे, सासवड दोन दिवस मुक्काम होणार
लोणंदला अडीच दिवस मुक्काम

पालखी सोहळा दिंडी समाज बैठकीत निर्णय
१७ जुलैला पंढरपूर आषाढी एकादशी 





आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवार २९ जून २०२४ रोजी आषाढी वारीसाठी आळंदी मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असून पहिला मुक्काम आळंदीतील गांधी वाड्यातील दर्शनबारी मंडपात होणार आहे. यावर्षी पुणे येथे ( दि. ३० जून व १ जुलै )  व सासवड ( दि. २ व ३ जुलै ) येथे सोहळ्याचा दोन दिवस तसेच लोणंदला अडीच दिवस सोहळा मुक्कामी राहणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला असल्याचे माऊलींचे  पालखी सोहळा प्रमुख व देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी सांगितले. 

      पंढरपूर येथील आळंदी देवस्थानच्या माऊली मंदिर मठात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली परंपरेने उत्साहात झाली. या बैठकीस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्थ ॲड. राजेंद्र उमाप, आळंदी देवस्थान नियुक्त पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त योगी निरंजननाथ, ह. भ. प. विठ्ठल महाराज वासकर , नामदेव महाराज वासकर, राणु महाराज वासकर, माऊली महाराज जळगांवकर, अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी, उपाध्यक्ष भाऊसाहेब फुरसुंगीकर, राजाभाऊ थोरात, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे यांच्यासह विविध दिंडी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत नवनियुक्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्थ ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांचा दिंडी समाज संघटने तर्फे सत्कार करण्यात आला. या बैठकीत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी पालखी सोहळ्याचे पत्रिकेचे वाचन करून उपस्थितांना माहिती दिली.

        यावेळी पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी माहिती दिली. ते म्हणाले, श्रींचे पालखी प्रस्थान आळंदी मंदिरातून शुक्रवारी २९ जूनला होईल. पुणे आणि सासवडला दोन दिवस तसेच लोणंद येथे (०५ ते ०८) सोहळ्याचा अडीच दिवस मुक्काम राहील. पुणे व सातारा जिल्ह्याच्या सिमेवरील निरा नदित दि. ०५ रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घातले जाणार आहे. मंगळवारी ( दि. १६ ) जुलैला पंढरपूर मुक्कामी सोहळा येईल. बुधवारी ( दि. १७ )  जुलैला आषाढी एकादशी परंपरेने पंढरपूर मध्ये साजरी होणार आहे.

       पालखी सोहळ्याचे प्रवासा दरम्यान पुण्यात संगमवाडी ते भवानी पेठ तसेच निंबोरे ओढा ते फलटण विमानतळ हे अंतर पायी वारीतील वाटचालीस खूप जास्त आहे. यामध्ये सुवर्णमध्य काढून पालखी सोहळ्याला अर्ध्या तासाचा विसावा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. ह. भ. प. राजाभाऊ थोरात आणि नामदेव महाराज वासकर यांनी मागणी केली आहे. प्रवासात विसावा वाढला तर रात्रीच्या समाज आरतीस उशीर होतो. या बाबत विचार करून नियोजन करण्याची मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली आहे.

      आळंदी ते पंढरपूर या पायी वारी प्रवासात विसाव्यास जागा नसल्याने शासनाने रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावर्षी वाखरी ते पंढरपूर या रस्त्याचे काम सुरु आहे. पालखी तळ खाली तसेच रस्ता वर झाला आहे. यामुळे वाहनांना अडचण येणार असल्याने नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बाबत बरड, वेळापूर, भंडीशेगाव येथे वाहनांची अडचण येणार आहे. आळंदी - पंढरपूर हा पालखी मार्ग नसून महामार्ग झाला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याचे प्रवासास अडचण निर्माण झाली आहे असल्याने प्रशासनाने लक्ष घालून मार्ग काढण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे.

       याशिवाय दुष्काळी परिस्थिती, पाण्याची समस्यां असल्याने सोहळ्यात पिण्याचे पाण्याची व्यवस्था प्रभावी पणे करण्याची मागणी देवस्थान तर्फे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी या बैठकीत केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूचना, मागण्या करीत बैठकीतील चर्चेत भाग घेतला. सोहळ्याचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल असे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.

Tuesday, April 16, 2024

गुरुवारी निरा शहरासह ग्रामीण भागातील बत्तीगुल होणार. निरा महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका बसणार : तब्बल सहा तास खंडित राहणार.

 गुरुवारी निरा शहरासह ग्रामीण भागातील बत्तीगुल होणार. 


निरा महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका बसणार : तब्बल सहा तास खंडित राहणार. 





पुरंदर : 

       लोणंद येथील अतीउच्च वीजवाहीनीचे पोल बदलण्याच्या कामामुळे निरा शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा तब्बल सहा तास खंडित होणार आहे. गुरुवार दि. १८ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित ठेवावा लागणार असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या निरा कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात भरदूपारी वीज पुरवठा खंडित झाल्यावर निरा बाजारपेठेतील व्यावसायिकांचे, रहिवाशांचे हाल होणार असून, ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे वेळापत्रक बिघडणार आहे. 


      महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या निरा कार्यालयाकडून करण्यात आलेल्या जाहीर आवाहना नुसार दिनांक 18.04.2024 रोजी 220 केवी  लोणंद अतिउच्च उपकेंद्र येथून निघणारे 22 केवी निरा अर्बन एजी व 22 केवी निरा ग्रामीण फिडर वरील उच्च दाब पोल बदलवयाचे असल्याने निरा  ग्रामीण (नींबूत)  शाखा कार्यालयाकडून आवटेज घेण्यात येणार असून खालील फीडर चा वीजपुरवठा दुपारी १२.०० ते सायंकाळी  ६.०० वा . पर्यंत खंडित होणार आहे

१. 22 केवी निरा अर्बन

२. 22 केवी निरा अर्बन एजी

सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना विनंती करण्यात येते की महावितरणास सहकार्य करावे. 


     वास्तविक निरा शहराला सोमेश्वर (ता. बारामती) व लोणंद (ता. खंडाळा) या दोन ठिकाणावरून वीज पुरवठा होत असतो. काही कारणास्तव एका ठिकाचा वीजपुरवठा खंडित होत असल्यास दुसऱ्या ठिकाणचा वीजपुरवठा निरा शहराला देण्याची सोय मागील काळात केली होती. कालांतराने आता एकाच खांबावरुन असा वीजपुरवठा होत असल्याने गैरसोयीचे झाले आहे. गुरुवारी ऐन दुपारच्या वेळेत लोणंद येथून वीजपुरवठा खंडित होत असताना सोमेश्वरची वीज निरा शहराला मिळणे गरजेचे होते. निरा महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका गुरुवारी निरा शहरातील व्यावसायिकांना बसणार आहे. 

पुण्यातील धायरी भागात सुनेत्रा पवार यांचा झंझावाती प्रचार


 पुण्यातील धायरी भागात सुनेत्रा पवार यांचा झंझावाती प्रचार


पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील शहरी भागावर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघातील धायरी परिसरात सुनेत्रा पवार यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. या प्रचारादरम्यान सुनेत्रा पवार यांनी सामाजिक, उद्योग आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेत महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले. 


धायरी येथील उद्योजक यशवंत कांबळे आणि हेमंत कांबळे यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली.  तसेच उद्योजक संतोष कदम यांच्या व्यंकटसाई होंडा शोरूमला सदिच्छा भेट दिली. यावेळी कदम व त्यांच्या संपूर्ण स्टाफने सुनेत्रा वाहिनींचे  आपुलकीने स्वागत केले. मनसेच्या माजी नगरसेविका युगंधरा चाकणकर यांच्या धायरी येथील संपर्क कार्यालयास पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सनी चाकणकर, सुहास चाकणकर, विक्रम चाकणकर, संतोष कदम यांच्यासह त्यांचे सहकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीच्या घटक पक्षातील एक असणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या स्वागताबद्दल सुनेत्रा पवार यांनी त्यांचे आभार मानले. 


धायरी गावचे माजी सरपंच, श्री धायरेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, खजिनदार केशवराव रायकर यांच्या धायरी येथील निवासस्थानी पवार यांनी सदिच्छा भेट दिली. 91 वय वर्ष असूनही केशवराव रायकर यांची उत्तम, ठणठणीत प्रकृती आहे. श्री धायरेश्वराची त्यांच्यावर असणारी ही कृपाच. त्यांनी गावाचा कारभार पाहताना गावाला जसे प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने देवस्थान ट्रस्टचा कारभार करताना अत्यंत काटेकोरपणे शिस्तबद्धपणे केला. त्यांच्या व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या याच प्रयत्नातून आज देवस्थानचा लौकिक सर्वदूर पसरला आहे. स्वतःच्या भल्या मोठ्या एकत्रित कुटुंबालाही त्यांनी एका धाग्यात गुंफले आहे. अशा या वंदनीय व्यक्तिमत्त्वाची झालेली भेट ऊर्जा देणारी ठरली असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.  यावेळी विजयकुमार रायकर, गणेश रायकर, राजेंद्र रायकर व सर्व रायकर कुटुंबीयांनी माझ्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.  

यासोबतच प्रसिद्ध गायक जितेंद्र भूरूक यांच्या निवासस्थानी पवार यांनी  सदिच्छा भेट दिली. तसेच  उद्योजक बापू विठ्ठल रायकर, कृष्णात मुरकुटे,  योगीराज आणि औदुंबर सोसायटी व चंद्रनील सोसायटीतील रहिवाशांनी आमच्या सर्वांच्या मनात "घड्याळ" फिक्स असल्याचे सांगत बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित आहे अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांना  दिली.

Saturday, April 13, 2024

जनसागराच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही", राजगड तालुक्यातला सुनेत्रा पवारांचा दौरा चर्चेत

 "जनसागराच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही", राजगड तालुक्यातला सुनेत्रा पवारांचा दौरा चर्चेत



बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना काल वेगळाच प्रचारादरम्यान अनुभव आला. काल सुनेत्रा पवार या प्रचारासाठी राजगड तालुक्यातील वडगाव झांजेमध्ये पोहचल्या असता त्यांचा गावाच्या वेशीवरच प्रचंड उत्साहाने गावकऱ्यांनी स्वागत केले. गावच्या वेशापासून सुमारे अर्धा किलोमीटर आत गावापर्यंत रांगोळ्यांच्या अंथरलेलया पायघड्या. गावातील तमाम ज्येष्ठ मंडळीनी तरूणांसह धरलेला लेझिमचा डाव, युवकांचे ढोल पथक आणि प्रत्येक घरातील माता भगिनींनी माझे केलेले औक्षण अशा अफाट उत्साहात सुनेत्रा पवार यांचं स्वागत करण्यात आलं.


यातच सुनेत्रा पवार यांची पदयात्रा या अशा मिरवणुकीने भैरवनाथ मंदिरासमोर पोहोचली आणि लेझीमचा डाव टिपेला पोहोचला. त्याने वातावरण एवढे भारून गेले की पुणे जिल्हा कात्रज दुध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, जिल्हा सरचिटणीस अर्जून भिलारे, वेल्हे खुर्दचे सरपंच प्रकाश जेधे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी लेझीमच्या डावावर ताल धरला.


तर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे आणि मोनिका बांदल यांनाही राहावले नाही. त्या दोघींनी या जल्लोषात सहभागी होऊन फुगडी घातली. साऱ्या गावात जणू दसरा दिवाळीचा माहोल तयार झाला होता. याच माहोलात घड्याळाचा गजर करून महायुतीच्या विजयाचा निर्धार करण्यात आला. भोर राजगड मुळशी विधानसभा मतदार संघातील राजगड, तोरणा या गडकोटांच्या कुशीत राजगड तालुक्यात पार पडलेला संपर्क दौरा म्हणजे महायुतीच्या विजयाची मिळालेली ग्वाही अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली. 


या दौऱ्याची सांगता वडगाव झांजेमध्ये झाली ती अशा भक्कम, जल्लोषी, उत्स्फूर्त प्रतिसादाने झाली. राजगड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष दामगुडे यांनी प्रास्ताविकात देशहित जपत विकासाच्या पाठीशी सारा राजगड तालुका घड्याळाच्या पाठीशी एकवटल्याचे सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे, अण्णासाहेब देशमाने, संदीप खुटवड, विकास नलावडे, निर्मला जागडे, कीर्ती देशमुख, शैला दारवटकर, संगीता जेधे स्थानिक ग्रामस्थ सत्यवान दामगुडे ,दिनकर झांजे, किसन झांजे, पांडुरंग झांजे, शंकरराव दामगुडे, बापूसाहेब आलगुडे, तानाजी झांजे, किरण पानसरे, दशरथ झांजे, माऊली झांजे, काशिनाथ झांजे, अलका झांजे, हर्षदा झांजे, रुपाली झांजे, ज्योती दामगुडे, तानाजी झांजे, विठ्ठल झांजे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सर्व ग्रामस्थांनी महायुतीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत केले. आपुलकीने सन्मान केला. निर्धारपूर्वक प्रचंड मताधिक्याने विजयाची ग्वाही दिली. त्याबद्दल या साऱ्या साऱ्यांचे सुनेत्रा पवार यांनी मनापासून आभार मानले. तर संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची प्रचिती आजच्या राजगड तालुका दौऱ्यातही सुनेत्रा पवार यांना आली. जनसागराच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनसंपर्कासोबत राज्य आणि केंद्र शासनाचा माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व शक्तीनिशी कटिबद्ध राहीन. हा माझा शब्द. देखील यावेळी सुनेत्रा पवार यांनी गावकऱ्यांना दिला.

Friday, April 12, 2024

खा.शरद पवार यांनी घेतली माजी खा. स्व. संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबीयांची भेट पारंपरिक विरोधकांच्या भेटीने चर्चा.

 खा.शरद पवार यांनी घेतली माजी खा. स्व. संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबीयांची भेट

    

पारंपरिक विरोधकांच्या भेटीने चर्चा. 




पुरंदर  : 

       बारामती तालुक्यातील निंबुत येथे आज शुक्रवारी खा. शरद पवार यांनी माजी खासदार स्वर्गीय संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी काकडे यांचे पुत्र पृथ्वीराज काकडे, जयराज काकडे, मेघराज काकडे व काकडे कुटुंबातील जेष्ठांची भेट घेत पवार यांनी त्यांचं सांत्वन केले. 


   माजी केंद्रीय संरक्षण व कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील निंबुत येथील काकडे कुटुंबांतील माजी खासदार स्व.संभाजीराव काकडे यांच्या पत्नींचे कांठवती काकडे यांचे नुकतच निधन झाले. यानंतर आज शुक्रवारी पवार यांनी काकडे कुटुंबातील सदस्यांची सांत्वन भेट घेतली आहे. यावेळी शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे, मार्केटिंग फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष शामकाका काकडे, संचालक राहुल शामराव काकडे, सोमेश्वरचे संचालक अभिजित काकडे उपस्थित होते. 



        निंबूतचे काकडे हे शरद पवार यांचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जातात. आज पर्यंत शरद पवार यांनी काकडे कुठुंबियांची कधीही भेट घेतली नव्हती. जवळपास ५५ वर्षांनी शरद पवार हे काकडे कुटुंबीयांच्या भेटीला आले होते. मात्र यावेळी बदलेली राजकीय परिस्थिती. पाहता पवार यांच्या या भेटीबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील पाच वर्षापासून काकडे कुटुंबीयांशी जुळवून घेत शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजीत काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली आहे.

पवारांच्या विरोधात काकडे यांनी अनेक वेळा खासदारकी आणि आमदारकी लढवली होती. शरद पवारांच्या विरोधात ॲड. विराज काकडे तर अगदी २०१९ च्या निवडणुकीत ही संभाजीराव काकडे यांच्या सुनबाई मृणालिनी जयराज काकडे यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. जवळपास ५५ वर्षांनी शरद पवार हे काकडे यांच्या भेटीला आले होते.

Thursday, April 11, 2024

छंद व कला आनंदी जीवनाचा मंत्र - प्रदीप कोथमिरे

 छंद व कला आनंदी जीवनाचा मंत्र - प्रदीप कोथमिरे 



"आयुष्यात माणूस भौतिक सुख, संपत्ती द्वारे सहजपणे मिळवू शकतो परंतु माणसाच्या जीवनात खरे समाधान आणि आनंद मिळविण्यासाठी एखादा चांगला छंद व कला जोपासणे गरजेचे आहे" असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेते प्रदीप कोथमीरे यांनी केले. विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बारामती व माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या क्रीडा, सांस्कृतिक व विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर आवड, प्रामाणिक प्रयत्न व निष्ठापूर्वक साधना करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव अँड. नीलिमाताई गुजर होत्या. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी वर्षभरात राबविलेल्या विशेष उपक्रमांचा आढावा घेऊन विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रा बरोबरच कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही अग्रेसर आहे असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.अभिजीत कुलकर्णी व विद्या प्रतिष्ठान संस्थेचे रजिष्ट्रार श्रीश कंभोज व्यासपीठावर उपस्थित होते, त्यांच्या हस्ते  

वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम कलाविष्कार, जिल्हास्तरीय, विभागीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या 'पाऊसपाड्या' या एकांकिकेतील सहभागी विद्यार्थी इम्रान तांबोळी, सुजल बर्गे, पूनम धोंडे व इतर कलाकारांचा आणि दिग्दर्शक आदेश यादव यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर विशेष नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. 

भारत सरकारच्या राष्ट्रीय पुस्तक न्यास च्या वतीने पुणे येथे आयोजित पुस्तक महोत्सवात लोकनृत्य सादर केलेल्या कलाकारांचाही गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ' श्रीमती नीलिमताई पवार सुवर्ण पदकासाठी' प्रशंसा प्रमाणपत्र प्राप्त अनामिका भरत चांदगुडे हिस गौरवण्यात आले. 

याबरोबरच ग्रंथ वाचन स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने आयोजित केलेल्या 'मेरी माटी मेरा देश' या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्हास्तरीय व विद्यापीठ स्तरीय यशस्वी विद्यार्थी, सायबर सुरक्षा पथनाट्य स्पर्धा, करिअर संसद, स्वयंसिध्दा, अविष्कार, स्वररंग 2023 विभागीय स्तर व विद्यापीठ स्तर, रोटरी क्लब ऑफ बारामती आयोजित मास्टर शेफ स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्तरावर सहभागी होऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. राष्ट्रीय खेळाडू म्हणून सन्मानित केलेलीखो खो खेळाडू प्रांजल मडकर, रोड रेस क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयाचे नेतृत्व करणारी राधिका दराडे, पॉवर लिफ्टिंग व बेंच प्रेस राष्ट्रीय खेळाडू सानिका मालुसरे,आर्चरी प्रकारातील राष्ट्रीय खेळाडू ऋतुजा घाटे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी कबड्डी खोखो बॅडमिंटन व विविध क्रीडा प्रकारात महाविद्यालयाचे जिल्हास्तर,विभागीय स्तर,विद्यापीठ स्तरावर, राज्यस्तरावर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. 

 विद्यादीप या महाविद्यालयाच्या नियतकालिकाच्या २७ व्या अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभानंतर लोकनृत्य, वैयक्तिक नृत्य, मूकनाट्य व पाऊसपाड्या या एकांकिकेने सर्व उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सर्व उपस्थितांचे स्वागत सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी डॉ.हणमंतराव पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. राजकुमार कदम यांनी करून दिला. सांस्कृतिक विभागाचे अहवाल वाचन डॉ.नेताजी करळे व डॉ. अमर भोसले यांनी केले. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे वाचन डॉ. दिनेश सरोदे व प्रा. किशोर ढाणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य शामराव घाडगे, डॉ लालासाहेब काशीद प्रा.नीलिमा पेंढारकर, प्रा. विजय काकडे , माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भगवान चौधर, अँड तुषार झेंडे पाटील, सांस्कृतिक व क्रीडा समितीतील सर्व सदस्य तसेच शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी, पालक व प्रेक्षक मोठ्या संख्येने गदिमा सभागृहात उपस्थित होते. प्रा. राजेंद्र वळवी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंदा गांगुर्डे व प्रा. तुषार जगताप यांनी केले.

Monday, April 8, 2024

सुनेत्रा पवार यांनी घेतली विजय शिवतारे आणि कुटुंबियांची भेट..

 सुनेत्रा पवार यांनी घेतली विजय शिवतारे आणि कुटुंबियांची भेट..

पुरंदरमध्ये सक्रिय झाल्याचं सांगत विजय शिवतारे यांनी दिल्या शुभेच्छा.. 





सासवड : 

      बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज पुरंदर दौऱ्यादरम्यान शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे व त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. शिवतारे यांच्या सासवड येथील निवासस्थानी झालेल्या भेटीत सुनेत्रा पवार यांनी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी विजय शिवतारे यांनी आम्ही सर्वजण मनापासून सक्रिय झालो असून कार्यकर्तेही विविध गावात प्रचार करत आहेत. त्यामुळे पुरंदर तालुक्यातून ५० हजारपेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असं विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितलं. 




       यावेळी शिवतारे कुटुंबियांकडून सुनेत्रा पवार यांचा सन्मान करण्यात आला. तसेच निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या भेटीप्रसंगी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Sunday, April 7, 2024

माजी आमदार संभाजीराव कुंजीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार

 माजी आमदार संभाजीराव कुंजीर 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार


अजित पवार यांची घेतली पुण्यात भेट

 




 सासवड तां ८: पुरंदरचे माजी आमदार संभाजी राव कुंजीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत नुकतीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार् यांच्या पुणे येथील जिजाऊ बंगला या निवासस्थानी त्यांची भेट घेतली, 

ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत बैठक झाली, यावेळी, सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मोहनशेठ वांढेकर, पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य बाळुतात्या यादव, शिवसेना युवा नेते प्रवीण कदम, गुर्होळीचे माजी सरपंच हिरामण खेडेकर, आदी उपस्थित होते.



माजी आमदार कुंजीर यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा तालुक्यात रंगली आहे, गेली अनेक वर्षे 

ते सक्रिय राजकारणातून बाहेर होते, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची चर्चा सुरू झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत, माजी मंत्री दादासाहेब जाधवराव यांचा पराभव करून १९८० साली ते निवडून आले होते, श्री कुंजीर यांच्या बरोबर तालुक्यातील अनेक गावातील आजी माजी सरपंच व पदाधिकारी प्रवेश करणार आहेत,

Featured Post

राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान

 राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान मुंबई :       ...