पोस्ट्स

ठाकरे गट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ठाकरे गटाचा राष्ट्रवादीला 'दे धक्का', घड्याळ सोडून 'हा' माजी आमदार घेणार हाती मशाल

इमेज
  राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करत नाराजी व्यक्त करणारे वैजापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी अखेर हातातील घड्याळ काढून ठाकरेंची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. चिकटगावकर यांचा आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चिकटगावकर पक्षात नाराज होते आणि याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडपणे खुलासा केला होता. वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि आमदार सतीश चव्हाण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षअंतगर्त वाद सुरु होता. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत वैजापूर येथील काँग्रेसच्या ठोंबरे गटाला राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला होता. मात्र या प्रवेशाला चिकटगावकर यांनी विरोध केल्याने अनेकदा हा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. परंतु सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने अखेर गेल्या महिन्यात हा प्रवेश सोहळा पार पडला होता. त्यामुळे नाराज असलेल्या चिकटगावकर यांनी अखेर राष्ट्रवादीला ...