ठेकेदाराकडून लाच घेणाऱ्या ग्रामसेवकांची तुरुंगात रवानगी

ठेकेदाराकडून लाच घेणाऱ्या ग्रामसेवकांची तुरुंगात रवानगी ठेकेदाराच्या तक्रारीनंतर वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई बारामती . पुण्याच्या बारामती तालुक्यातील पळशी गावात ग्रामसेवकाचे काम करणाऱ्या ग्रामसेवकाने ठेकेदाराकडून कामाचे बिल काढण्यासाठी पंचवीस हजार रुपये लाच घेतलीय. याच कारणावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी या ग्रामसेवकावर कारवाई करून त्याला ताब्यात घेतलय. त्याला न्यायालया समोर हजर केल असता न्यायालयाने त्याची रवानगी तीन दिवसासाठी पोलिस कस्टडीत केलीय .कांतीलाल बापुराव काळाणे अस या लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाच नाव आहे. पळशी येथे बांधण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवकाने ठेकेदाराकडे 2 टक्के रकमेची मागणी केली होती.या संदर्भात ठेकेदार अतुल रामदास भिलारे याने वडगाव निंबाळकर पोलिसात स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती .यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.. याबाबत वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी कांतीलाल बापुराव काळाणे (वय58 वर्ष) हे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पळशी गावामध्ये ग्रामसेवक म्हणून काम कर...