लवकरच देशात एक देश, एक चार्जर धोरण, लॅपटॉप, स्मार्टफोन काहीही.. कोणतं केबल चालणार, वाचा सविस्तर!
न वी दिल्लीः स्मार्टफोन ( Smartphone ), टॅबलेट किंवा लॅपटॉपचा वापर केल्याशिवाय आता असंख्य कामं अर्धवट राहतात. या उपकरणांची बॅटरी ( Battery ) संपली की ते कधी एकदा चार्ज करू , असं होतं. एखादे वेळी आपलं चार्जर नसेल आणि दुसरीकडे चार्जर शोधण्यासाठी गेलो.. समोरच्या व्यक्तीनं विचारलं टाइप बी चार्जर पाहिजे की टाइप सी ( Type C Charger )… यातून तुमचा गोंधळ उडतो.. त्यातही नेमकं आपल्याला हवं असलेलं चार्जर नसेल तर चिडचिड होते … पण येत्या काही दिवसात चार्जरवरून असे फार प्रश्न उपस्थित होणार नाहीत. टाइप बी किंवा टाइप सीचा गोंधळ उडणार नाही.कारण स्मार्टफोन निर्माता कंपन्या आणि टेक्नोलॉजी कंपन्यांनी खूप समजदारीने एक मोठं पाऊल उचललंय. आता फक्त टाइप सी चार्जरचा वापर केला जाईल , यावर सगळ्यांचं एकमत झालंय.. नवा नियम कधी लागू होणार ? भारतातील स्मार्टफोन कंपन्या आणि औद्योगिक संस्थांनी संपूर्ण देशभरात एकच चार्जिंग पद्धत लागू करण्याच्या धोरणावर सहमती दर्शवली आहे. ग्राहक मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. वन नेशन वन चार्जर धोरणाच्या दिशेने हे मोठं पाऊल असल्याचं मानलं जातंय. हे धोरण लागू केल्यानंत...