पोस्ट्स

उपमुख्यमंत्री अजित पवार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पूर ग्रास्थांना मिळणाऱ्या प्राथमिक मदतीमध्ये वाढ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

इमेज
 पूरग्रस्थांना मिळणाऱ्या प्राथमिक मदतीमध्ये वाढ : उपमुख्यमंत्री  अजित पवार यांची घोषणा  मुं बई : दि.२४ पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीऐवजी यंदा दहा हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही सभागृहांत सोमवारी केली.               आपत्ती प्रतिसाद मदतनिधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली तरी, अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मागील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी २५ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.               भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी जळगाव जामोद मतदारसंघात ढगफुटीने झालेल्या प्रचंड हानीकडे लक्ष वेधले. हजारो एकर शेती खरडून गेली, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घरदारे वाहून गेली. सरकारच्या मदतीकडे लोकांचे डोळे लागले आहेत, असे सां...