Posts

Showing posts with the label पाऊस

नीराखोऱ्यात दमदार पावसामुळे ४ धरणांमध्ये १३.६२१ टीएमसी पाणीसाठा

Image
 नीराखोऱ्यात दमदार पावसामुळे ४ धरणांमध्ये १३.६२१ टीएमसी पाणीसाठा नीरा खोरे अपडेट | २० जून २०२५ | सकाळी ६.०० गेल्या काही दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे नीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या जलसंपत्ती विभागाच्या अहवालानुसार, भाटघर, निरा देवघर, वीर आणि गुंजवणी या चार धरणांमध्ये एकूण १३.६२१ टीएमसी म्हणजेच २८.१८ टक्के साठा नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ४.६८४ टीएमसी (९.६९%) पाणीसाठा होता, यामुळे यंदा दुप्पटहून अधिक पाणीसाठा झाल्याचे स्पष्ट होते. धरणनिहाय सविस्तर माहिती: भाटघर धरणात आज ४८ मिमी पावसाची नोंद झाली असून, एकूण साठा ३.३८४ टीएमसी (१४.४०%) इतका झाला आहे. सध्या धरणात १२१४ क्यूस्सेकने नवीन पाणी येत आहे. निरा देवघर धरणात ६८ मिमी पाऊस पडला असून, एकूण साठा १.९७० टीएमसी (१६.७९%) झाला आहे. येथे २४२ क्यूस्सेकचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २० मिमी पाऊस झाला असून, साठा ६.९०१ टीएमसी (७३.३५%) पर्यंत पोहोचला आहे. येथून कालव्यातून कोणताही विसर्ग सुरू नाही. गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रा...

गारडे धरण १०० टक्के भरले

Image
 गारडे धरण १०० टक्के भरले  सासवड  दि. ८             पुरंदर तालुक्यातील सासवड शहराला पाणीपुरवठा  करणारे गाराडे धरण. आता १०० टक्के भरले असून  आता धरणाच्या संडव्यातून कऱ्हा नदीत पाणी वाहू लागले आहे.   ६५.३७ दशलक्ष घनफूट क्षमतेचे गराडे धरण  आता १०० टक्के भरले आहे. त्यामुळे सासवड शहर व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.सध्या धरणातून कर्‍हा नदी तसेच पश्चिम भागातील सर्व बंधार्‍यांत विसर्ग सुरू आहे. ते भरल्यानंतर नाझरे धरणाकडे विसर्ग चालू होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता गणेश गायकवाड यांनी दिली. कर्‍हा नदीवरील गराडे धरणातून सासवड शहरासह गराडे गावासह कोडीत खुर्द व बुद्रुक, चांबळी व हिवरे आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या चतुर्मुख महादेव मंदिर परिसर, दरेवाडी, थापे-वारवडी, रावडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी परिसरात संततधार पावसामुळे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे कर्‍हा नदी प्रवाहित होत गराडे धरण 100 टक्के भरले आहे. दुसरीकडे परिसरातील पाझर तलाव, बंधारे, विहिरी पूर्व भरून वाहू लागले आहेत. या पाण्यामुळे ...

6 जण प्रवास करीत असलेली स्कॉर्पिओ नाल्यात गेली वाहून

Image
  नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केळवदजवळ एका नाल्यामध्ये स्कॉर्पिओ अडकली असून त्यामध्ये असलेले 6 प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. सतरापूर आणि नांदा गावांमधून वाहणाऱ्या नाल्याला पूर आलाय. पुलावरून पाणी वाहात असताना स्कॉर्पिओ चालकानं गाडी नेण्याचं भलतं धाडस केलं. मात्र पाण्याचा मोठा लोंढा आला आणि स्कॉर्पिओ वाहून गेली. एका खडकाला गाडी अडकली मात्र त्यातून प्रवाशांना बाहेर येता आलं नाही, असं दृष्यांवरून दिसतंय. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यातील कुणी बचावलं असण्याची शक्यता फारच कमी असल्याचं मानलं जातंय. या धक्कादायक घटनेमुळे भलतं धाडस कसं जीवावर बेतू शकतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. हे सुद्धा वाचा

वीर धरणाच्या पणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ

Image
 वीर धरणाच्या पणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ    नीरा दि.१२   पुरंदर तालुक्यातील वीर धरणाच्या पणी साठ्यात काल सोमवारी दिवसभरात मोठी वाढ झाली आहे. काल दिवस भरात जवळ जवळ १ टीएमसी पाणी वीर धरणात आले असल्याची माहिती अभियंता विजय नलावडे यांनी दिली आहे.       काल दिनांक ११ जून रोजी सकाळी वीर धरणात ४.३९ टीएमसी म्हणजे ४६ टक्के पाणी साठा होता. काल दिवसभर आणि आज रात्री झालेल्या पावसामुळे वीर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पाणीसाठ्यात एक टीएमसी ने वाढ झाली आहे.आज मंगळवारी सकाळी वीर धरणातील एकूण पाणीसाठा ५.३६ टीएमसी झाला आहे.वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याची माहिती शाखा अभियंता विजय नलावडे यांनी दिली आहे.असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणात मोठ्या प्रमाणत पणी येणार आहे या पाण्याचा उपयोग धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतीसाठी होणार आहे. त्यामूळे कालव्याच्या पाण्यावर शेती अवलंबून असणारा शेतकरी सुखावला आहे.