माऊलींचा आजपासून समाधी सोहळा
ला खो भाविक आळंदीच्या वाटेवर : संत नामदेव महाराजांच्या पालखीचे आगमन आळंदी- ज्ञानेश्वर फड आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्वर ।्। चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा। तो सुख सोहळा काय वर्णू ।्। विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव। स्वर्गाहुनी देव करिताती ।। नामा म्हणे देवा चला तया ठाया। विश्रांती घ्यावया कल्पवरी ।। संत ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रेला गुरुवार (दि. 17) पासून सुरुवात होणार आहे. सकाळी 7 वाजता श्रीगुरू हैबतबाब यांच्या पायरी पूजनाने सोहळ्याची सुरुवात होईल. तत्पूर्वी अलंकापुरीत आता भाविक जमण्यास सुरुवात झाली आहे. हजारो भाविक अलंकापुरीत दाखल झाले असून लाखो भाविक आळंदीच्या वाटेवर आहेत. संतांची पालखी सोहळेदेखील आता अलंकापुरीत दाखल होत आहेत. संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे बुधवारी (दि. 16) सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान हरिनाम गजरात भक्तीमय वातावरणात अलंकापुरीत आगमन झाले. तर गुरुवारी (दि. 17) श्री पांडुरंगराच्या दिंडीचे आळंदीत आगमन होणार आहे. अलंकापुरीत सर्वत्र आता हरिनाम सप्ताहास सुरुवात होत असू...