#कायद्याचंबोला : लहान मुलांसोबतची एक चूक खडी फोडायला पाठवेल, प्रत्येक पालकाला हे कायदे माहीत हवेत
मुले हे कोणत्याही देशाचे भविष्य असतात , त्यामुळे प्रत्येक देश त्यांना आणि त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी गुंतवणूक करतो. शरीराने आणि मनाने मऊ असलेली मुले सहजपणे शोषणाला बळी पडतात . त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी देशाच्या कायद्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदी काय आहेत आणि त्या कशा वापरायच्या , हे प्रत्येक पालकाला माहीत असणे आवश्यक आहे. कुणाची फसवणूक , कुणाचा छळ , कुणाला मानसिक त्रास , कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ , कुणाच्या हक्कांवर गदा , प्रॉपर्टीचे वाद , कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो ? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात , पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज # कायद्याचंबोला . कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा. शिक्षणाचा अधिकार बालकांसाठी शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार असून घ...