Posts

Showing posts from July, 2025

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.

Image
 नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू  चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.  पुरंदर :       पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील वाल्हे गावचे हद्दीत माळवाडी जवळील उड्डानपुलाच्या उतारावर चारचाकी व मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन एक जण ठार झाले आहेत. दुचाकीस्वार अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद (वय ७५ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. गणेष बाळकृष्ण घाडगे (वय ४२ वर्षे) रा. एकंबे (ता. कोरेगाव जि. सातारा) यांच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात फिरोज अल्लाउदीन सय्यद (वय ४७ वर्षे) रा. शिवतक्रारवाडी नीरा यांनी जेजुरी पोलीसांत फिर्याद दाखल केली आहे.       याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. ७ जुलै)  दुपारी  सव्वा चार वाजता सुमा टाटा नेक्सॉन चार चाकी गाडी न. एम. एच. ११ सी. क्यु  २८५७ वरील चालक गणेश बाळकृष्ण घाडगे (वय ४२ वर्षे) रा. एकंबे ता. कोरेगाव जि. सातारा याने त्याचे ताब्यातील वाहन जेजुरी बाजुकडुन नीरा बाजुकडे घेवुन जात असताना ते हयगयीने निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवुन, रहदारीचे ...

पीएम किसानचा २० वा हप्ता या दिवशी खात्यात! तुमचं नाव यादीत आहे का?

Image
पीएम किसानचा २० वा हप्ता या दिवशी खात्यात!  तुमचं नाव यादीत आहे का?  पुणे :        पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी चालवलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी २ हजारांचा हप्ता दिला जातो. त्यामुळे वर्षभरात एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आता शेतकरी २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.       यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केल्यामुळे काही भागात पेरण्या वेळेवर झाल्या नाहीत. काही ठिकाणी पेरणीच पुन्हा करावी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. अशा वेळी केंद्र सरकारकडून मिळणारे २ हजार रुपये हे त्यांच्यासाठी खूप उपयोगाचे ठरतील. म्हणून सगळे शेतकरी हप्ता कधी जमा होतोय, याकडे लक्ष ठेवून आहेत.         अनेक जण म्हणत होते की जून महिन्याच्या शेवटी हप्ता मिळेल. पण अजून पर्यंत तो जमा झालेला नाही. आता अशी शक्यता आहे की १८ जुलै २०२५ रोजी बिहारमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा ...

🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨 वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग वाढवणार नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वाढता पाऊस.

Image
 🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨 वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग वाढणार  नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वाढता पाऊस.  पुरंदर :       पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिवनदायनी असेलेल्या नीरा नदित पुढील वीर धराणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली त्यानंतर अद्याप पावसाने विश्रांती घेतली नाही. परिणामी त्यामुळे नीरा नदिवरील वीर धरण ८०.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर धरणातून सोमवारी (दि.८ जुलै) सकाळी ६ वाजता विसर्ग वाढवण्यात येणार असून नीरा नदीच्या पात्रात ९ हजार ६९६ क्युसेक्सने विसर्ग सुरू होतं आहे.         नदीत पाणी सोडणार असल्याने काठावरील शेतकरी सुखावले आहेत. नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.      वीर धरण ८०.८९ टक्के भरलेले आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणात एकुण क्षमतेच्या ६८ टक्के पाणीसाठा झाला ...

शाळा सोडताना विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली थांबवा: शिक्षण संचालनालयाचा इशारा

Image
 शाळा सोडताना विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली थांबवा: शिक्षण संचालनालयाचा इशारा इंदापूरसह राज्यातील शाळांना निर्देश; विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट मोफत द्या पुणे | 2 जुलै २०२५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) व मार्कलिस्ट देताना कोणतीही रक्कम वसूल करू नये, असा स्पष्ट आदेश दिला आहे. ही कारवाई श्री. गणेश मोहन गुप्ते आणि श्री. प्रशांत कोरडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, इंदापूर तालुक्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालये हे प्रमाणपत्र देताना प्रति विद्यार्थी ₹२०० बेकायदेशीरपणे घेत आहेत. संचालनालयाचा कडक इशारा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१५/(५५/१५)/समन्वय कक्ष, दिनांक ४ जानेवारी २०१६ नुसार, विद्यार्थ्यांकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम मागणे नियमबाह्य असून, अशा प्रकारची वसुली झाल्यास शाळांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावी व ...