पुरंदर तालुक्यात विविध प्रकल्प पुनर्वसनासाठी घेतलेल्या जमिनीवरील अधीग्रहनाचे शिक्के काढण्याचा शासनाचा आदेश
गुंजवणी,रायता प्रकल्पासाठी गेलेल्या
जमिनी राहणार मूळ मालकाकडे
पुरंदर दि.१६
पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्याची मागणी अनेक वर्ष पासून केली जातं होती.त्याबाबत आता १५ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने आदेश काढला असून तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या सात बारावरील पुनर्वसनासाठी असलेले शिक्के काढले जाणार आहेत.त्यामुळे मागील चाळीस वर्षांपासून पुनर्वसनासाठी अडकलेल्या जमिनी मूळ मालकांना पूर्ण अधिकाराने वापरता येणार आहेत.
गुंजवणी प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील हिवरे, जेऊर, थोपटेवाडी, पिसूर्टी,वीर, तोंडल, परिंचे, वाल्हे, हरणी,राख, गुळूंचे,माहूर, मांडकी, गावातील जमिनींवर पुनर्वसनाचे शिक्के होते.त्याच बरोबर रायता प्रकल्पासाठी चांबळी,बोपगाव,हिवरे,भिवरी या गावातील जमिनींवर पुनर्वसनाचे शिक्के मारण्यात आले होते.त्यामुळे या भागातील लोकांना आपल्या जमिनी कसताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.मागील चाळीस वर्षा पासून या लोकांना या प्रकल्पातून शेतीसाठी पाणीही मिळालं नव्हत किंवा भविष्यात या प्रकल्पातून शेतीसाठी पाणी मिळेल या बाबत शेतकऱ्यांना शास्वती नव्हती. त्यामुळे हे शिक्के काढा. आम्हाला पाणी नको आमची शेती आम्हाला द्या. अशी मागणी प्रामुख्याने गुंजवणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. प्रामुख्याने राख, गुळूंचे, कर्नलवाडी,वाल्हे या भागातील शेतकऱ्यांनी ही मागणी लावून धरली होती.आता या शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबतचं एक परिपत्रक राज्य सरकारच्यावतीने १५ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले आहे
.