पुणे ते बँकॉक या थेट विमान सेवेचे उदघाटन
पुणे - 12 नोव्हेंबर 2022 म्हणजे आजपासून पुणे-बँकॉक-पुणे दरम्यान विमान सेवा सुरु होत आहे. या मार्गावर दर मंगळवार , गुरुवार , शनिवार आणि रविवारी विमान उड्डाणे होतील. Flight No Sector Dep Arr. Frequency Aircraft SG 81 PNQ-BKK 18:45 00:40 Tue, Thu, Sat, Sun B-737 SG 82 BKK-PNQ 14:15 17:10 Tue, Thu, Sat, Sun B-737 पुणे आणि बँकॉक दरम्यानच्या या हवाई संपर्कामुळे व्यापार , शिक्षण आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारत आणि थायलंड या देशांमधील द्विपक्षीय देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळेल , असे ज्योतिरार्दित्य सिंदिया यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते पुढे म्हणाले की , पुणे विमानतळ हे देशातील महत्त्वाचे विमानतळ असून या विमानतळावर पायाभूत सुविधा उभारण्याला सरकार चालना देत आहे. या विमानतळाचे नवीन टर्मिनल पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल , तर नवीन आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनल (मालवाहतूक केंद्र) डिसेंबर 2024 पर्यंत वि...