पोस्ट्स

ITR भरणाऱ्यांसाठी शेवटचा इशारा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ITR भरणाऱ्यांसाठी शेवटचा इशारा, वर्ष संपण्यापूर्वी उरकून घ्या 'ही' कामं नाहीतर..

इमेज
  2022 वर्ष संपण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे वर्षाच्या शेवटी उरलेली सर्व कामे करण्यासाठी तुमच्या हातात काहीच दिवस आहेत. अशातच आर्थिक वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची संधी तुमच्याकडून चुकली असली तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयकर विभागाची इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. पण अनेकांना आयटीआर भरता येऊ शकला नाही. जर तुम्हीसुद्धा त्या अनेकांमध्ये असाल तर तुम्हाला आता 31 डिसेंबर पर्यंत विवरण पत्र शेवटची संधी असणार आहे. पण त्यासोबत तुम्हाला दंडही भरावा लागणार आहे. आयकर विभागाकडून वारंवार प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यासंदर्भात आठवण करु दिली जात असली तरी अनेकांकडून काही कारणास्तव तो भरला जात नाही. पण आता अशा लोकांसाठीही आयकर विभागाने दंडाच्या माध्यमातून करदात्यांना ही विवरण पत्र भरण्याची संधी दिली आहे. कसा भरू शकता आयटीआर ? आयकर कायद्याच्या कलम 139(1) अंतर्गत निर्धारित वेळेपर्यंत आयटीआर दाखल करण्यात अयशस्वी झाल्यास कलम 234A अंतर्गत दंड आकारला जातो. जर तुम्हाला 31 डिसेंबर 2022 पर्यंत आयटीआर भरायचा असेल तर तो 5,000 रुपयांच्या दंडासह भरता ...