सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कारण...
राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार नाही. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहेत. पुढील तारीख अजून देण्यात आलेली नसल्यामुळे ही सुनावणी कधी होणार हे नक्की झालेलं नाही. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर ही सुनावणी होणार होती. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाईंनी अपात्रतेच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ठाकरे गट तसंच शिंदे गटाला लेखी म्हणणं मांडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार दोन्ही गट आपापली बाजू मांडतील. मात्र आज ही सुनावणी होणार नाही. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी आता 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आज 29 नोव्हेंबर होणार होती. मात्र , ही सुनावणीही पुढे गेली आहे. 7 सप्टेंबरला ठाकरे गट आणि शिंदे गटा यांच्या दोन्ही बाजूंनी 5 सदस्यीस घटनापीठासमोर त्यांचा युक्तिवाद केला होता. महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच आता मोठ्या खंडापीठापुढे होणार आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ स्थापन करण्यात आलं आहे. या घटन...