सासवड येथे ०३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा

सासवड येथे ०३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा सासवड दि.३ पुरंदर मधील सर्व दिव्यांग, विधवा, निराधार यांना ताकद देण्याचे प्रामाणिक प्रयत्न यापुढे मी करणार आहे. पिवळी शिधापत्रिकासाठी पात्र दिव्यांगांनी माझ्या संपर्क कार्यालयात कागदपत्राची पूर्तता करावी त्यांना घरपोच पिवळी शिधापत्रिका मिळण्याची मी व्यवस्था करतो तसेच पिवळी शिधापत्रिकासाठी कोणालाही १ रु सुद्धा देऊ नका तसेच कोणीही दिव्यागांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ आहे तसेच लवकरच पुरंदर मधील दिव्यांगाचा महा मेळावा घेण्यात येईल अशी घोषणा शिंदे गटाचे गटनेते तसेच प्रवक्ता विजय शिवतारे यांनी यावेळी केली. एमआरडी अंतर्गत असणाऱ्या ३५ गावातील दिव्यांग बांधवांनी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करावेत. या सर्व अर्जांना तात्काळ मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी केले. सासवड ( ता पुरंदर ) येथे जागतिक अपंग दिनानिमित्त दादा जाधवराव सांस्कृतिक भवनामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रणित प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन पुरंदर यांच्...