Posts

Showing posts with the label ग्रामीण

गुळूंचेच्या सरपंचपदी संतोष निगडे यांची बिन विरोध निवड

Image
 गुळूंचेच्या सरपंचपदी संतोष निगडे यांची बिन विरोध निवड नीरा दि.२३     गुळूंचे ता.पुरंदर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष निगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आज दिनांक 23 जून रोजी झालेल्या या निवडणुकीत संतोष निगडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.      गुळुंचे गावचे माजी सरपंच संभाजी कुंभार यांच्या नातेवाइकांचे सरकारी जागेत अतिक्रमण असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र ठरवले होते.त्यानतंर गुळूंचे गावचे सरपंच रिक्त झाले होते.यानतंर आता आज दिनांक २३ रोजी सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली यामध्ये संतोष निगडे यांची बिन विरोध निवड झाली.