पोस्ट्स

सत्तासंघर्षाच्या सुनावणीला मुहूर्त गवसला? . लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सत्तासंघर्षाच्या सुनावणीला मुहूर्त गवसला? मुख्य युक्तिवाद 10 जानेवारीपासून होण्याची शक्यता

इमेज
  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाच्या   सुनावणीसाठी कदाचित मुहूर्त मिळू शकतो. सत्तासंघर्षाची सुनावणी 10 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court) प्रलंबित आहे. यापूर्वी याप्रकरणाची सुनावणी 1 नोव्हेंबर रोजी पार पडली होती. त्यावेळी दोन्ही गटांनी कागदपत्रांचा गोषवारा द्या आणि दोन्ही बाजूंनी एकत्र बसून महत्त्वाचे मुद्दे ठरवा , अंस म्हणत न्यायालयानं दोन्ही पक्षकारांना 4 आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर याप्रकरणी 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणं अपेक्षित होतं , पण त्यावेळी सुनावणी होऊ शकत नव्हती. आता याप्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्या तारखांचा विचार सुरु आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या प्रकरणात तारीख पे तारीखचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं. आता अखेर या प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरु होऊ शकते. पुढच्या वर्षी 10 जानेवारीपासून या प्रकरणाचा मुख्य युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 1 नोव्हेंबर रोजी या प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली ह...