'पप्पू कुठे आहे' विचारणाऱ्या महुआ मोईत्रांवर निर्मला सीतारामन संतापल्या, म्हणाल्या "स्वत:च्या."; लोकसभेत जोरदार खडाजंगी

तृ णमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांनी पप्पू कुठे आहे हे शोधण्यासाठी आपल्याच अंगणात शोध घ्यावा असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला आहे. महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत अर्थ मंत्रालयावर टीका करताना ' आता पप्पू कोण आहे ?' अशी विचारणा केली होती. यानंतर निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या टीकेला उत्तर दिलं असून लोकसभेत मोठं भाषण केलं. यावेळी त्यांनी बंगाल सरकारकडून केंद्रीय योजनांवर बहिष्कार टाकला जात असल्याची टीकाही केली. सीतारामन यांनी अनुदानाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान महुआ मोईत्रा यांच्या टीकेला उत्तर दिलं. “ सन्माननीय सदस्या महुआ मोईत्रा यांनी पप्पू कोण आहे आणि कुठे आहे ? अशी विचारणा केली आहे. त्यांनी आपल्याच अंगणात शोध घेण्याची गरज आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांना पप्पू सापडेल ,” असं उत्तर सीतारामन यांनी म्हटलं. “ सर्व मॅक्रो-इकॉनॉमिक्सच्या मूलभूत गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे ,” अशी टिप्पणी करत त्यांनी म्हटलं की “ जेव्हा सर्वसामान्यांना लाभ देण्यासाठी चांगल्या योजना आणल्या जातात तेव्हा पश्चिम बंगाल त्या नियंत्रि करतो आणि त्याच वितर...