पुन्हा 8 तारीख ठरली नाशिककरांसाठी वेदनादायी.. अपघातावेळी नेमकं काय घडलं? आजीबाईंनी सांगितली आपबिती
दुपारची सव्वा एकची वेळ...प्रवाशांनी खचाखच भरलेली बस... नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळील चौफुलीवर आली असता , बस भरधाव वेगाने सुरु होती..अन् बसचे ब्रेक निकामी झाले...गतिरोधक असतानाही बस चालक बस रोखू शकला नाही , बस थेट पुढील शिवशाही बसवर आदळली. मात्र याचवेळी बसखाली दोन दुचाकी आल्याने क्षणार्धात बसने पेट घेतला. यात दोन्ही दुचाकीस्वारांचा होरपळून मृत्यू झाला. शिवाय प्रवाशांनी खचाखच भरलेली बस ( Bus Accident) असल्याने तात्काळ बसमधून उड्या घेत आपले प्राण वाचविले. संगमनेरहून बसमध्ये बसलेल्या आजीबाईंनी बस अपघाताची आपबिती सांगितली. पुण्याच्या राजगुरूनगर आगाराची बस राजगुरूनगर हुन नाशिक ला निघाली होती. नाशिक शहरानजीक असलेल्या शिंदे टोल नाका परिसरात बस येताच चालकांना ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. याचवेळी गतिरोधक असल्याने अनेक वाहनांचा वेग कमी झाला होता. मात्र हि बस थेट पुढे असलेल्या शिवशाही बसला धडकली. मात्र याचवेळी नाशिकडे जात असलेल्या दोन दुचाकीस्वार या गाडीखाली आल्याने बसने ब्रेक दाबल्यानांतर लागलीच बसने पेट घेतला. यात पल्सर दुचाकीची पेट्रोल टाकी फुटल्याने बस अधिकच प...