Monday, July 31, 2023

अंत्यविधीसाठी तरी जागा द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन – नामदेव भोसले.

 अंत्यविधीसाठी तरी जागा द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन – नामदेव भोसले.....

पारधी समाजाची मागणी 



सासवड प्रतिनिधी:- दि.३१


गेल्या सत्तर वर्षात पुण्यातील पारधी समाज शासकीय सवलतीपासून वंचित राहिलेला आहे. सरकारी कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसिल कार्यालय व घोडेगाव प्रकल्प सांगत आहे की, "पुणे जिल्ह्यात पारधी कुटुंबाची घरेच नाही." अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील दिड लाख आदिवासी पारधी बांधव शासकीय सुविधांपासुन वंचित आहेत. महसुल अधिकारी, तलाठी व ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक तसेच आदिवासी प्रकल्प घोडेगाव कार्यालयातील मनमानी कारभारामुळे व जातीय भेदभाव वर्तणुकीमुळे पारधी समाज हा शासकीय  सुविधांपासुन वंचित राहीला आहे असे मत अदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांनी व्यक्त केले आहे.  

      पुणे जिल्ह्यातील पारधी समाजाला शिक्षणासाठी जातीचे दाखले रेशनिंग कार्ड, आधार कार्ड व त्यांना राहण्यास जागा नसल्यामुळे आणि पंचायत समिती व तहसिल, आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि पोलीस स्टेशन मध्ये जातीय वागणूक मिळत असल्यामुळे पुणे  जिल्ह्यातील दिड ते दोन लाख पारधी बांधवांवर जागा विना घर विना गावकुसाबाहेर उघड्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, हवेली, पुरंदरमधील सासवड व जेजुरी येथील पोलीस स्टेशन मध्ये काही खबरी वरीष्ट पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन खोट्या केस दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे जिवंत पणे सोडाच निदान मेल्यानंतर अंत्यविधीसाठी तरी जागा द्या आणि आमच्यावर होणारे अन्याय 

तात्काळ थांबविले पाहिजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे, ग्रामीण पोलीस अधीक्षक, आदिवासी संशोधन आयुक्त, घोडेगाव प्रकल्प अधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,आदिवासी पारधी समाजातील प्रतिनीधी व साहित्यिक, संघटक यांची एकत्रित बैठक घेऊन आदिवासी पारधी समाज बांधवाची होणारी फरपट थांबवण्यात यावी अन्याथा 3 ऑगस्ट रोजी आदिवासी पारधी समाजातील परंमपरागत अर्ध उघडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना ता.२८ जुलै रोजी देण्यात आले आहे अशी माहिती साहित्यिक व पारधी समाजाचे अध्यक्ष नामदेव भोसले यांनी दिली आहे. 

सासवड येथे पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास केली अटक.

सासवड येथे पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास केली अटक.

 ५गुन्हे उघडकिस तर ५ मोटार सायकल केल्या हस्तगत


 सासवड दि.३१

     पुरंदर तालुक्यातील सासवड येथे  दि. 30/07/2023 रोजी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते...त्याच्याकडे चौकशी  केली  असता त्याने पाच मोटरसायकल चोरल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. तर पोलिसांनी त्या पाचही मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत...

       याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  रविवारी   पोलीस हवालदार संतोश शिंदे, गणेश पोटे, योगेश गरूड, वाहतुक वार्डन ऋतुराज देसाई, विक्रम जगताप हे सासवड शहरात जेजुरी नाका येथे वाहतुक नियमन तसेच वाहतुक कारवाई करीत असतांना दुपारी 3 वाजलेच्या सुमारास एक तरुण संशयास्पद स्थितीत मोटार सायकल घेवुन जातांना आढळून आला. त्याचेकडे गाडीचे कागदपत्र वाहन चालवण्याचा परवाना मागितला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली व तो त्याचे ताब्यातील होंडा शाईन गाडी सोडुन नारायणपुर बाजुकडे पळुन गेला. त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडुन ताब्यात घेतले.त्याला विश्वासात घेवुन त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या होंडा शाईन मोटार सायकल  बाबत विचारपुस केली असता त्याने  मोटार सायकल  बारामती  मधील रूई एम.आय.डी.सी परीसरातुन चोरलेली असल्याची कबुली दिली आहे. तसेच तो चाकण येथुन बारामती येथे घरी महिन्या दोन महिन्यातुन जात येत होता. पण गावी जाण्या येण्यासाठी गाडी पाहिजे होती. घरचे लोक गाडी घेवुन देत नव्हते. म्हणुन तो गाडया चोरून काही दिवस वापरून सोडुन देत असे. त्याने सासवड परीसरातुनही चार मोटार सायकल चोरल्या असलेबाबत बाबतची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्या सर्व मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत..अल्ताफ ईकरार स्ययद, अस या  वय 20 वर्षीय तरुणच नाव असून ते सध्या , रूई एम.आय.डी.सी, बारामती, ता. बारामती, जि. पुणे. येथे राहतो तर  तो मुळचां   उत्तर प्रदेशचां असल्याचं त्यानं सांगितलय....

पोलिसांनी ताब्यात  घेतलेल्या मोटार सायकल 

 १) होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.50.F.3931


२) होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.12.QU.8092 

३) होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.12.GW.2488 

४) होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं.MH.12.JY.5568 

५) होंडा शाईन मोटार सायकल नं.MH.42.AB.0327 



 ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी  भोर विभाग तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोश जाधव, पोलीस अंमलदार संतोश शिंदे, गणेश पोटे, योगेश गरूड, जब्बार स्ययद, विशाल नगरे, शरद जाधवर, होमगार्ड विक्रम जगताप, ट्राफिक वार्डन श्रीकांत भंडलकर, चक्रधर गोपाळघरे, ऋतुराज देसाई, सचिन पवार, अक्षय लोंढे यांचे पथकाने केलेली आहे.                                       

     

Sunday, July 30, 2023

दत्ता आंबेकर यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्याबीड जिल्हा निमंत्रक पदी नियुक्ती

 दत्ता आंबेकर यांची पत्रकार ल्ला विरोधी कृती समितीच्याबीड जिल्हा निमंत्रक पदी नियुक्ती





मुंबई :
        पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बीड जिल्हा निमंत्रक पदी अंबाजोगाई येथील ज्येष्ठ पत्रकार दत्ता आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी आज ही घोषणा केली.

         राज्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्यांची पुनर्रचना करण्यासाठी सर्व जिल्हा आणि तालुकास्तरीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून आता नव्याने जिल्हा आणि तालुका स्तरावर या समित्या गठीत करण्यात येत आहेत. त्यानुसार दत्ता आंबेकर यांची बीड जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. वरिष्ठांची संमती घेऊन बीड जिल्हयातील सर्व तालुक्यांचे निमंत्रक आणि समन्वयक यांच्या नियुक्त्या करण्याची जबाबदारी दत्ता आंबेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नवीन सर्व नियुक्त्या पुढील दोन वर्षांसाठी असतील.

      पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जात असलेले खोटे खटले, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या धमक्या बाबत आवाज उठविण्याचे काम पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करते. सर्व जिल्ह्यातील नियुक्तया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदयाची माहिती जास्तीत जास्त पत्रकारांना व्हावी यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेतले जाणार आहे. पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रती बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला पाठविण्याच्या सूचनाही आंबेकर यांना करण्यात आल्या आहेत.

हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्षपदी अर्जुन मेदनकर बिनविरोध निवड उपाध्यक्षपदी विवेक बच्चे, महादेव पाखरे

 हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्षपदी अर्जुन मेदनकर बिनविरोध निवड   

उपाध्यक्षपदी विवेक बच्चे, महादेव पाखरे




आळंदी प्रतिनिधी :
      मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ चाकण आळंदी (ता. खेड ) संघाच्या अध्यक्षपदी अर्जुन मेदनकर, उपाध्यक्षपदी विवेक बच्चे, महादेव पाखरे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संजय इंगुळकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केली. यावेळी झालेल्या द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रियेत सर्व कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. या निवडीचे स्वागत करण्यात आले. पत्रकार संघाचे सदस्य आदी उपस्थित होते.
 
  मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशा नुसार मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषद राज्य निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ, पुणे विभागीय सचिव अरुण नाना कांबळे, परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार, राज्य सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांच्या मार्गदर्शना नुसार तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांचे सूचने प्रमाणे पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ चाकण आळंदीची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती.

  नवनिर्वाचित पदाधिकारी यामध्ये अध्यक्षपदी अर्जुन मेदनकर, उपाध्यक्षपदी विवेक बच्चे, महादेव पाखरे, कोषाध्यक्ष सुनील बटवाल, सचिव गौतम पाटोळे, कायेदशीर सल्लगार ऍड. विलास काटे, कार्यकारिणी सदस्यपदी भागवत काटकर, अनिल जोगदंड, बद्रीनारायण घुगे, अनिराज मेदनकर, प्रसन्नकुमार देवकर, हनुमंत घोंगडे यांची निवड करण्यात आली. पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या निमंत्रकपदी अविनाश राळे, जिल्हा प्रतिनिधी हनुमंत देवकर, श्रीकांत बोरावके, सल्लगार हरिदास कड यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संजय इंगुळकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी काम पाहिले. निर्धारित मुदतीत आणि प्रत्येक जागेसाठी एक एक अर्ज आल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. पसायदानाने निवडणूक सभेची सांगता उत्साहात झाली.

मुंबई - गोवा महामार्गासाठी आता आरपारची लढाई कोकणातील पुढाऱ्यांना १० हजार SMS पाठवून जाब विचारणार

 मुंबई - गोवा महामार्गासाठी आता आरपारची लढाई

कोकणातील पुढाऱ्यांना १० हजार

SMS पाठवून जाब विचारणार




मुंबई - गोवा महामार्गाची झालेली दूरवस्था आणि १३ वर्षांपासून रखडलेले महामार्गाचे काम याचा निषेध कोकणातील पत्रकार आणि जनता अनोख्या पद्धतीने करत आहेत.

     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत रायगडचे खासदार सुनील तटकरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना एकाच दिवशी म्हणजे ९ ऑगस्ट २२ रोजी तब्बल १०,००० एस.एम एस पाठवून महामार्गाला होत असलेल्या विलंबाचा जाब विचारतील.

     आज नागोठणे येथे झालेल्या रायगड प्रेस क्लबच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोकणातील पत्रकारांसह स्थानिक जनता आणि मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था पाहून ज्यांना ज्यांना संताप येतो अशा सर्वांनी या "एस.एम एस आंदोलनात सहभागी व्हावे" असे आवाहन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी केले आहे.



         याच दिवशी पत्रकार बोंबाबोंब आंदोलन करून आपला निषेध नोंदवतील. या आंदोलनात एस. एम. देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आदि सहभागी होत आहेत.

दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव तर सचिवपदी रामदास डोंबे बिनविरोध

दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव तर सचिवपदी रामदास डोंबे बिनविरोध





यवत :
      मराठी पत्रकार परिषद संचलित व पुणे जिल्हा पत्रकार संघ सलन्ग दौंड तालुका मराठी पत्रकार संघाची द्वीवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र जगताप (दै. महाराष्ट्र टाइम्स), तर सचिवपदी रामदास डोंबे (दै. पुढारी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

       कार्यकारणी निवड पुढीलप्रमाणे : नरेंद्र जगताप (अध्यक्ष), शरद रणदिवे (उपाध्यक्ष), रामदास डोंबे (सचिव), संदीप नवले (कोषाध्यक्ष), संतोष काळे (कार्याध्यक्ष), अमरसिंग परदेशी (सदस्य), त्रिभुज शेळके (सदस्य), जीवन शेंडकर (सदस्य), अक्षता हनमघर (सदस्या), मनोज खंडागळे (सदस्य), राजू जगदाळे (जिल्हा प्रतिनिधी), संदीप चाफेकर (जिल्हा प्रतिनिधी), रमेश वत्रे (हल्ला विरोधी कृती समिती) यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश कमथे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मंगेश गायकवाड यांनी कामकाज पाहिले. यावेळी पत्रकार संघाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली गेली. निवडणूक कार्यक्रमा प्रसंगी परिषद प्रतिनिधी एम जी शेलार, दीपक देशमुख, रवींद्र खोरकर, विशाल धुमाळ, संदीप सोनवणे, भाऊ ठाकूर, अमोल बनकर, निलेश भुजबळ, सचिन आव्हाड, हितेंद्र गद्रे, दादा चौधरी तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.




      मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार, मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषद राज्य निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ, पुणे विभागीय सचिव अरुणनाना कांबळे, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, राज्य सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या आवाहनानुसार बारामती तालुका पत्रकार संघाची निवडणूक जाहीर झाली होती. त्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्याबद्दल सरकारच्या विरोधात रायगड प्रेस क्लबचे ९ ऑस्टला 'बोंबाबोंब आंदोलन'

 मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्याबद्दल सरकारच्या विरोधात रायगड प्रेस क्लबचे ९ ऑस्टला 'बोंबाबोंब आंदोलन'

संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वाकण नाका ते कासू दरम्यानच्या महामार्गावर पत्रकार धडकणार

मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांत होडी फिरवून व खड्ड्यांविषयी भजन गात करणार अनोखे आंदोलन







रायगड : प्रतिनिधी 

       कोकणची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था, गेल्या १३ वर्षांत मंत्री व लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांच्या हिंदोल्यावर झोका घेत असलेली व महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेली जनता आणि असे असतांनाही केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने या महामार्गाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष या सर्वांची बाबींचा निषेध करण्यासाठी दोन्ही सरकार मधील मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात मुंबई गोवा महामार्गावर उतरून बोंबाबोंब करणारे अनोखे आंदोलन रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची एक प्रमुख संघटना असलेल्या रायगड प्रेस क्लब कडून ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी करण्याचे ठरविण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाकण नाका ते कासू दरम्यानच्या महामार्गावर उतरून जिल्ह्यातील पत्रकार हे आगळेवेगळे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आदि उपस्थित राहणार आहेत. 

      या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन क्लबशी संलग्न असलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या वतीने नागोठण्यात करण्यात आले होते. या बैठकीत आगामी आंदोलनाच्या संदर्भात विविध विषय व मुद्द्यांवर चर्चा करण्यात येऊन आंदोलनाचे स्वरूप ठरविण्यात आले. यामध्ये भजन किर्तन (रस्त्यावर पडलेल्या खड्यावर गाणी गाऊन), होडी, मासेमारीचा पाग आणि खड्यातले हांड्यात पाणी घेऊन महिला अशा स्वरूपाचे हे आंदोलन असेल.

       या बैठकीला रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, सचिव अनिल मोरे, उपाध्यक्ष संजय मोहिते, खजिनदार दर्वेश पालकर, माजी अध्यक्ष विजय मोकल, सहसचिव पद्माकर उभारे, सह संघटक निशांत पवार, प्रेस क्लबचे प्रसिद्धी प्रमुख संजय भुवड, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कमलेश ठाकूर, सदस्य गौतम जाधव, नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष ॲड. महेश पवार, सचिव अनिल पवार, सुधागड प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद भोईर, रवींद्रनाथ ओव्हाळ, कमलेश सुतार, ॲड. सुशील गायकवाड, अजय गायकवाड आदि यावेळी उपस्थित होते. 

       मुंबई  गोवा महामार्गवर कासू ते कोलाड दरम्यान जे खड्डे पडले आहेत ते खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करावा यासाठी रायगड प्रेस क्लबकडून काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दासगाव-महाड येथे निवेदन देण्यात आले होते.  या निवेदनामध्ये ३१ जुलै पर्यंत हे खड्डे बुजवावे अन्यथा ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी रायगड प्रेस क्लबच्या वतीने वाकण नाक्यावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदना मार्फत देण्यात आला होता. मात्र असे असूनही जनतेशी काहीही देणे-घेणे नसलेल्या या दोन्ही सरकारने व येथील लोकप्रतिनिधींनी आपल्या निवेदनाची कोणतीच दखल घेतली नाही. सद्यस्थितीत तर या महामार्गाची महाकाय खड्ड्यांमुळे भयानक दुरावस्था झाली असून महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वाहने अडकून पडून दररोज अपघात होत आहेत व वाहनांची तोडमोडही होत आहे.  मात्र असे असूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलन करण्याचा निर्णय रायगड प्रेस क्लबकडून घेण्यात आला आहे. 






___________________________________________________


मंत्री,  लोकप्रतिनिधी व प्रशासनावर पत्रकार करणार एस.एम.एस. चा मारा.

      रायगड प्रेस क्लब कडून विविध प्रकाच्या अनोख्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकार महामार्गावरील हे आंदोलन करणार असून त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची ही शोकांतिका आंदोलनकर्ते पत्रकार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, रायगडचे खासदार सुनील तटकरे, खा. श्रीरंग बारणे यांना दुरावस्थेबाबत एस.एम.एस. चा मारा करून लक्ष वेधणार असल्याचेही नागोठण्यातील बैठकीत ठरविण्यात आले.




बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी, उपाध्यक्ष संभाजी काकडे तर सचिव संदिप आढाव बिनविरोध निवड.

बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी, उपाध्यक्ष संभाजी काकडे तर सचिव संदिप आढाव बिनविरोध निवड.




पुणे :
      मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित बारामती तालूका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हेमंत गडकरी, उपाध्यक्षपदी संभाजी काकडे, तर सचिवपदी संदिप आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल शिंदे व सह निवडणूक निर्णय अधिकारी भरत निगडे यांनी निवड जाहीर केली.

     मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ व पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या सुचनेनुसार बारामती तालुका मराठी पत्रकार परिषदेची द्ववार्षीक निवडणूक प्रक्रिया मोरगाव येथील शिवांकूश मंगल कार्यालयात पार पडली. सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. अध्यक्षपदासाठी हेमंत गडकरी, उपाध्यक्ष पदासाठी संभाजी काकडे, सचिव पदासाठी संदिप आढाव, कार्याध्यक्ष पदासाठी सचिन पवार खजिनदार पदासाठी बाळासाहेब बालगुडे , कार्यकारण सदस्य पदासाठी आसिफ शेख, अमोल गायकवाड यांची नियोजित वेळेत प्रत्येकी एक अर्ज आल्याने सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या निमंत्रक पदी राजेश वाघ, जिल्हा प्रतिनिधी म्हणून चिंतामणी क्षिरसागर, वसंत मोरे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी अशोक वेदपाठक, योगेश भोसले, मनोहर तावरे, प्रशांत धुमाळ, विजय भोसले, सतिश गावडे, ॲड. अमर वाघ, प्रशांत धुमाळ, सुनील जाधव, संतोष चौधरी आदी बारामती तालुक्यातील पत्रकार सदस्य उपस्थित होते.




     मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार, मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषद राज्य निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ, पुणे विभागीय सचिव अरुणनाना कांबळे, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या आवाहनानुसार बारामती तालुका पत्रकार संघाची निवडणूक जाहीर झाली होती. त्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

Saturday, July 29, 2023

सुनील वाळुंज यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रक पदी नियुक्ती

 


सुनील वाळुंज यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रक पदी नियुक्ती


मुंबई :
     पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रक पदी ज्येष्ठ पत्रकार सुनील वाळुंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज ही घोषणा केली.

       राज्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्यांची पुनर्रचना करण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून आता नव्याने जिल्हा आणि तालुका स्तरावर या समित्या गठीत करण्यात येत आहेत. त्यानुसार सुनील वाळुंज यांची पुणे जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आहे. पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यांचे निमंत्रक आणि समन्वयक यांच्या नियुक्त्या करण्याची जबाबदारी सुनील वाळुंज यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

     नवीन सर्व नियुक्त्या पुढील दोन वर्षांसाठी असतील. पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जात असलेले खोटे खटले, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या धमक्यां बाबत आवाज उठविण्याचे काम पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करते. सर्व जिल्ह्यातील नियुक्तया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदयाची माहिती जास्तीत जास्त पत्रकारांना व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड मध्ये एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेतले जाणार आहे. कायद्याच्या प्रती पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला पाठविण्याच्या सूचनाही वाळुंज यांना करण्यात आल्या आहेत.


वाल्हे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

 वाल्हे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

ग्रामीण भागातील ९७६ विक्रमी रक्तदात्यांनी केले रक्तदान.





वाल्हे (दि.२९) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार यांच्या

वाढदिवसाच्या निमित्ताने

प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्टवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने, वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत कार्यालयांच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या हास्ते करण्यात आले.या आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ग्रामीण भागातील विक्रमी संख्येत रक्तदान करून, या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला.


यावेळी, सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सुर्यवंशी, प्रा.संतोष नवले, उद्योजक सुनिल पवार, गोरख कदम, हनुमंत पवार, संदेश पवार, दादासाहेब राऊत, अभि दुर्गाडे आदींसह अनेक मान्यवर, तरूण वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.


या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्यां प्रत्येक रक्तदात्यांस प्रशस्तिपत्र उपस्थित मान्यवरांच्या हास्ते देण्यात आले. तसेच सेप्टी हेल्मेट, स्मार्ट वाॅच, ब्लू टूथ यांपैकी एक वस्तू भेट म्हणून रक्तदात्यांस देण्यात आले.

 भव्य रक्तदान शिबिरात ९७६ रक्तदात्यांनी रक्तदान करुन

शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


या रक्तदान शिबिरास, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, बारामती तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, विराज काकडे, निरा उपसरपंच राजेश काकडे, सोमेश्वर सहकारी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन उत्तमराव धुमाळ, दिवे सरपंच अमित झेंडे, कोमल निगडे, नाना सस्ते, अशोक बरकडे, सरपंच अमोल खवले, गुळूंचे सरपंच संतोष निगडे, दत्तात्रेय पवार, माजी कृषी अधिकारी सिद्राम भुजबळ, किरण गदादे, कांचन निगडे, जितेंद्र निगडे, शिवाजी साळुंके, संदेश पवार, अभि दुर्गाडे, महेश काका जगताप आदींसह अनेक मान्यवरांनी भेट दिली.

दौंड व पुरंदर तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

 दौंड व पुरंदर तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित



नीरा : दि.२९

      पुरंदर उपविभागातील दौंड व पुरंदर तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पावसाची स्थिती लक्षात घेऊन तसेच अन्य प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे. 


       जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी पोलीस पाटील भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. पोलीस पाटील पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती. 


         पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी/मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील गराडे, सोनारी व हिवरे या गावांतील पुणे वर्तुळाकार महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोजणीची तारीख निश्चित केलेली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नियोजित लेखी परीक्षा घेणे प्रशासकीय कारणास्तव शक्य होणार नसल्याने १ ऑगस्ट रोजीची नियोजित लेखी परीक्षा पुढील तारखेपर्यंत तूर्त स्थगित करण्यात आली आहे. दौंड-पुरंदर उपविभागीय कार्यालयाकडून लेखी परीक्षेचा दिनांक, स्थळ व पुढील कालबद्ध कार्यक्रमाबाबत अवगत करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Thursday, July 27, 2023

महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत युट्युबर संघटनेचे उपाध्यक्षपदी पत्रकार तुषार धुमाळ यांची निवड

 महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत युट्युबर संघटनेचे उपाध्यक्षपदी पत्रकार तुषार धुमाळ यांची निवड



पुणे दि.२७


 महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत युट्युबर चॅनल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवड पुसेगाव येथील बैठकीत करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी प्रसिद्ध युट्यूबर सँडियन यादव यांची निवड करण्यात आली.तर  बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील  प्रसिद्ध  युट्युबर  व पत्रकार तुषार धुमाळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आली आहे.


दि 25 श्री क्षेत्र पुसेगाव येथे सेवागिरी महाराजांच्या मंदिर परिसरात  युट्युबरच्या अडीअडचणी व संघटन करण्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक पारपडली . या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्यातील  बैलगाडी शर्यत यूट्यूब च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे   सर्व युट्युबर  उपस्थित होते.बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची  सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.



 बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रथमच लाईव्ह व मुलाखत घेणाऱ्या युट्युबरची संघटना स्थापन झाली असून आगामी काळामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्राचा प्रचार व प्रसार करणे तसेच गोवंश  संवर्धनासाठी  आम्ही एकत्र येत  निर्णय घेतले असल्याचे निर्वाचित उपाध्यक्ष तुषार धुमाळ यांनी  सांगितले आहे. धुमाळ यांनी मैदान रिपोर्टर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत घराघरापर्यंत पोचवली.

सेवानिवृत्त पोलीसांनी सभोवतालच्या धोकेदायक हलचालींवर लक्ष ठेवा : डी.वाय.एस.पी. तानाजी बरडे सेवानिवृत्त पोलीस अंमलदाराचा सत्कार.

 सेवानिवृत्त पोलीसांनी सभोवतालच्या धोकेदायक हलचालींवर लक्ष ठेवा : डी.वाय.एस.पी. तानाजी बरडे

सेवानिवृत्त पोलीस अंमलदाराचा सत्कार.



पुरंदर :
   सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी समाजात काय वेगळं घडत असल्यास किंवा सभोवताली काही धोकेदायक हलचाली झाल्यास त्वरित नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये माहिती द्या. आता आपल्या कुटुंबाला वेळ द्या स्वतःचे स्वास्थ्य सांभाळा असे आव्हान भोर उपविभाग पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले आहे.

    भोर उपविभाग पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत पोलीस स्टेशन मधील सेवानिवृत्त पोलिस अंमलदाराचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बरडे बोलत होते. व्यासपीठावर भोर उपविभाग पोलीस अधिकारी भोर पोलीस स्टेशन रेखा वाणी, सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडलीक गावडे, राजगडाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश आखाडे उपस्थित होते.

     यावेळी ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सेवानिवृत्त झालेले सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार रविंद्र जयसिंग काळभोर, ३० एप्रिल २०२३ रोजी सेवानिवृत्त झालेले सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार प्रदिप चंद्रराव जाधव, ३० मे २०२२ रोजी सेवानिवृत्त झालेले सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार हणुमंत नाना गार्डी, ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झालेले राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार प्रमोद क्रुष्णाजी भोसले, ३१ में २०२३ रोजी सेवानिवृत्त झालेले जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुदर्शन बाबुराव होळकर, राजकुमार सोनबा जगताप, सारोळाचे भिमराव शंकर पानसरे यांचा सहपत्नी तर ३१ मे २०२२ सेवानिवृत्त झालेले राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार स्व. सुनील बाबन शिंदे यांच्या पत्नी मंदा सुनील शिंदे यांचा शाल श्रीफळ प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभाग पोलीस अधिकारी तानाजी बर्डे होते. या सत्कार समारंभाला मराठी पत्रकार परिषद मुंबईचे राज्य प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पुणे जिल्हा सोशल मिडियाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, महिला संघटक सुनिता कसबे, अझीम आतार, विजय लकडे सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांना पुढील जीवनास शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन व आभार पत्रकार हणुमंत वाबळे यांनी केले.





पत्रकार सन्मान योजनेच्याजा चक अटी शिथिल होणार मराठी पत्रकार परिषदेच्याप्र यत्नांमुळे विविध प्रश्न मार्गी लागणार

 पत्रकार सन्मान योजनेच्याजा चक अटी शिथिल होणार

मराठी पत्रकार परिषदेच्याप्र यत्नांमुळे विविध प्रश्न मार्गी लागणार



 मुंबई :बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी लवकरच रद्द करण्याची घोषणा मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज विधान परिषदेत केली..सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील असंख्य ज्येष्ठ आणि वयोवृद्ध पत्रकारांचा रखडलेला पेन्शनचा प्रश्न मार्गी लागणार आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी सरकारला त्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.. 


 मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड येथील अधिवेशनात परिषदेने केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेन्शन योजनेत वाढ करून ती 11 हजारांवरून 20 हजार रूपये करण्याची घोषणा केली होती..  मात्र त्याचा शासनादेश निघाला नव्हता तो दोन दिवसात काढण्याची घोषणाही आज सरकारने केली आहे..

विधान परिषदेत विविध आमदारांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न उपस्थित केले.. त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत पत्रकारांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.. 

मराठी पत्रकार परिषदेच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतील रक्कम वाढविण्याची घोषणाही आज सरकारने केली.. ही रक्कम सध्या 50 कोटी रुपये आहे.. ती वाढवून 100 कोटी रूपये करावी अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे...

पत्रकारांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात मराठी पत्रकार परिषद सातत्यानं आवाज उठवत असते. मराठी पत्रकार परिषदेने समोर आणलेले पत्रकारांचे सर्व प़श्न सोडविण्यासाठी एक अभ्यासगट नेमला जाईल असेही शंभुराजे देसाई यांनी जाहीर केले आहे.. तसेच केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले जाईल अशी घोषणाही सरकारने केली आहे..


पत्रकारांच्या प्रश्नांच्या बाबतीत सरकारच्या सकारात्मक भूमिकेबाबत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी सरकार, शंभूराजे देसाई, डॉ. निलमताई गोर्हे, आणि लक्षवेधी देणारया सर्व आमदारांचे आभार मानले आहेत...

डोळ्याची साथ पसरू नये स्वच्छतेवर भर द्यावा : डॉ. नरेश बागुल.

 डोळ्याची साथ पसरू नये स्वच्छतेवर भर द्यावा : डॉ. नरेश बागुल.

नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून विद्यार्थ्यांचा सर्वे.


नीरा :
     पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये डोळे येण्याची साथ पसरले आहे. आपल्या भागामध्ये डोळ्याची साथ पसरू नये म्हणून ग्रामस्थांनी व विदयार्थ्यांनी हाताची व डोळ्यांची स्वच्छता यावर विशेष लक्ष देऊन काळजी घेणे. रुग्ण आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा यांच्याशी संपर्क करून मोफत औषधोपचार करून घ्यावेत असे आव्हान डॉ. नरेश बागुल यांनी केले आहे.

      प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा अंतर्गत नीरा शहर, गुळुंचे, मांडकी येथील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा येथे जाऊन सदयस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांची काही समस्या आहे का याबाबत सर्वे करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश बागुल बोलत होते. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. समिक्षा कांबळे, आरोग्य सहाय्यक बाळासाहेब भंडलकर, आरोग्य सहाय्यिका सत्यभामा म्हेत्रे, बेबी तांबे, आरोग्य सेवक तुकाराम मुलमुले, आरोग्य सेविका अनिता नेवसे, योगीता टिळेकर, शाळांतील शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

       पावसाळ्या मध्ये उद्भवणारे साथीचे आजार यामध्ये जलजन्य, किटकजन्य आजार पसरू नये म्हणून आपला आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवणे व पाणी उकळून थंड करून प्यावे असे आव्हान डॉ. समिक्षा कांबळे यांनी केले.



Wednesday, July 26, 2023

नीरा येथे आरपीआयचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 नीरा येथे आरपीआयचा वर्धापन दिन उत्साहात साजरा 


विद्यार्थ्यांना करण्यात आले शालेय साहित्याचे वाटप



नीरा दि.२७


    नीरा (ता. पुरंदर) येथे आज गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा वर्धापन दिन, त्याचबरोबर पक्ष अध्यक्ष दीपक निकाळजे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच तेजस्वी काकडे आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सफाई कर्मचारी महिलांना साडी चोळी देऊन  सन्मानित करण्यात आले.

        रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन नीरा येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पक्षाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्धापन दिन आज गुरुवारी देखील साजरा करण्यात आला. यावेळी नीरेच्या सरपंच तेजस्वी काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, प्रमोद काकडे, संदीप धायगुडे, विजय धायगुडे,दादा गायकवाड, सचिन मोरे,



विजय शिंदे, नानासाहेब हेंद्रे, किरण सोनवणे, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमांमध्ये सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे,अनिल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या कामाबद्दल कौतुक केले. तर यावेळी नीरा ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचाऱ्यांना साडीचोळी देऊन. त्यांचा सन्मान करण्यात आला .त्याच बरोबर शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.तर पाडेगाव येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना एक वेळचे जेवण देण्यात आले... 

   यावेळी आलेल्या मान्यवरांचे आभार आरपीआयचे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी मानले.

Monday, July 24, 2023

तलाठ्याच्या ४६४४ जागांसाठी तब्बल १३ लाख अर्ज : तलाठी परीक्षेतून सरकारला 127 कोटींचा महसूल

 

तलाठ्याच्या  ४६४४  जागांसाठी तब्बल १३ लाख अर्ज

तलाठी परीक्षेतून सरकारला 127 कोटींचा महसूल



मुंबई दि.२५


राज्यात चार  वर्षापासून रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून तलाठी पदासाठी४६४४ जागांसाठी  जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जागांसाठी राज्यभरात तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.या परीक्षा शुल्कापोटी सरकारच्या तिजोरीत तब्बल १२७ कोटी रुपयांचा महसुल जमा झाल आहे. विशेष म्हणजे, पी.एचडी., इंजिनिअर, एमबीए झालेल्या हजारो उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांनीही अर्ज केले आहेत.

राज्यात 4 वर्षांनंतर तलाठी गट(क) भरतीला मुहूर्त मिळाला आहे. सरकारने ४६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून 26 जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यात २३ जुलैपर्यंत सुमारे १३ लाखांच्या जवळ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अजून दोन दिवस म्हणजेच २५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.

यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. एकूण जागेच्या तुलनेत आलेल्या अर्जाचा विचार केल्यास एका जागेसाठी २७५ उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचंड स्पर्धा या परीक्षेसाठी निर्माण झाली, याचे कारण म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेली शासकीय भरती. म्हणूनच शासनाला ही परीक्षा २० पेक्षा अधिक दिवस घ्यावी लागणार आहे.

तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. २३ जुलैपर्यंत शासनाकडे १२ लाख ७७ हजार १०० अर्ज आले आहेत. ज्याची एकूण शुल्क रक्‍कम तब्बल १२७ कोटी रुपये हे शासकीय तिजोरीत जमा झाले आहेत. एवढंच नाही तर हा आकडा येत्या दोन दिवसांत अजून वाढणार आहेत.

पूर ग्रास्थांना मिळणाऱ्या प्राथमिक मदतीमध्ये वाढ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

 पूरग्रस्थांना मिळणाऱ्या प्राथमिक मदतीमध्ये वाढ : उपमुख्यमंत्री  अजित पवार यांची घोषणा 



मुंबई : दि.२४

पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीऐवजी यंदा दहा हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही सभागृहांत सोमवारी केली.

              आपत्ती प्रतिसाद मदतनिधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली तरी, अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मागील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी २५ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.


            भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी जळगाव जामोद मतदारसंघात ढगफुटीने झालेल्या प्रचंड हानीकडे लक्ष वेधले. हजारो एकर शेती खरडून गेली, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घरदारे वाहून गेली. सरकारच्या मदतीकडे लोकांचे डोळे लागले आहेत, असे सांगत तातडीची मदत पाच हजार रुपयांऐवजी दहा हजार करण्याची मागणी त्यांनी केली होती 

 यानंतर सरकारने प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेतयामध्ये धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.,पूरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी.शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत.

ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखील पंचनामे त्वरित सुरु करावेत.

बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल याकरिता स्वस्त धान्य  दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा या बाबतच्या सूचना सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत .

देशात आज घटणाऱ्या संभाव्य घडामोडी कोणत्या ते पहा

 देशात आज घटणाऱ्या संभाव्य घडामोडी कोणत्या ते पहा 



 नवी दिल्ली दि. २५ 


  देशाब्आदेशभरात आज अनेक महत्जवाच्या घडामोडी घादाणार आहेत . दिल्लीत संसदेचे आणि राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. 

मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गटाकडून मौन निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

 राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे.


तर, प्रागतिक पक्षांच्या आघाडीने आदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.



 दिल्सलीतील  अधिवेशानाथ वोरोधक मणिपूर प्रकरणी  जाब विचारणार 

मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी आणि पंतप्रधानांकडून उत्तराच्या मागण्यासाठी विरोधक आज पुन्हा सभागृहात आक्रमक होणार आहेत . सरकार सातत्याने चर्चेबाबत बोलत असले तरी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत निवेदन करून सभागृहात चर्चा करण्याची मागणी करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजप संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. ज्यामध्ये आज संसदेत मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.



स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत याचिकेवर सुप्रीम कोर्टात मागील सुनावणीत आजची तारीख देण्यात आली होती. त्यामुळे आज तरी सुनावणी होणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीशांच्या न्यायपीठासमोर प्रकरण आहे. मुंबई पुण्यासह 25 पेक्षा अधिक महापालिका जिल्हा परिषदा आणि इतर निवडणुकांचे भवितव्य या याचिकेवर अवलंबून आहे.



विधिमंडळ अधिवेशन

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नियम  293 अन्वेय दोन दिवस सभागृहात चर्चा झालेली आहे. यामध्ये विरोधकांनी सरकारवर अनेक आरोप  केलेले आहेत. या चर्चेला आज मुख्यमंत्री विधानसभेमध्ये उत्तर देणार आहेत. हे उत्तर देत असताना शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



अमित शाह आज पुण्यात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अमित शहा आज पुण्यात येणार आहेत. देवी यांचे पार्थिव आज सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी पुण्यातील संघाचे कार्यालय मोतीबाग या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अमित शहा यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, धर्मेंद्र प्रधान यासह अनेक केंद्रीय मंत्री अंत्यदर्शनासाठी येणार आहेत.



हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी

राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 25 जुलैपर्यंत हसन मुश्रीफ यांना ईडीच्या अटकेपासून संरक्षण आहे. मात्र, बदलत्या राजकीय घडामोडी पार्श्वभूमीवर, ईडीच्या वकिलांनीच कोर्टाकडे मुदतवाढ मागितली होती. आरोपांत तथ्य आणि पुरावे असल्याचे ईडीच्या वकिलांनी पुनरूच्चार केला असला तरी युक्तिवादासाठी त्यांनी वाढीव वेळ मागितला होता. 



मणिपूर महिला अत्याचाराविरोधात आज आंदोलन

मणिपूर महिला अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मौन निषेध करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व फ्रंटल आणि सेलचे राज्यप्रमुख यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे. आज तालुका, जिल्हास्तरावर महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यांसमोर काळी फित बांधून या घटनेचा तीव्र निषेध केला जाणार आहे.

मणिपूरमध्ये उसळलेली दंगल, महिलांवर होत असलेले अत्याचाराच्या विरोधात राज्यातील प्रागतिक पक्षांच्या आघाडीने 25 जुलै रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. मणिपूरमध्ये मागील डीच महिन्यांत हिंसाचारात 150 बळी गेले, 60 हजार लोक बेघर झाले, पाच हजार जाळपोळी झाल्या, तरीही पंतप्रधान एक अक्षरही बोलले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर नाईलाजाने कारवाईची घोषणा केली. या सर्वच घटना अत्यंत वेदनादायक व संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत, असे प्रागतिक पक्षांनी म्हटले. प्रागतिक पक्षांच्या या आघाडीमध्ये राज्यातील शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी महाराष्ट्र, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन पार्टी, रिपाई (सेक्युलर) पार्टी व श्रमिक मुक्ती दल हे तेरा घटक पक्ष सहभागी आहेत.

पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील 5 दिवसही पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर कायम असेल. मुंबई पुढील दोन दिवस काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर डिप्रेशनमध्ये होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 26 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.


ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं सोमवारी दु:खद निधन झाले. त्यांच्या आज पार्थिवावर अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. दुपारी 12.30 वाजता जवाहर बाग स्मशानभूमी, ठाणे (दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळ) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी आज निकाल

एअर होस्टेस गीतिका शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्ट आज आपला निकाल सुनावणार आहे. या प्रकरणात हरियाणाचे माजी मंत्री गोपाल गोयल कांडा हे मुख्य आरोपी आहेत. विशेष न्यायमूर्ती विकास ढल हे 20 जुलै रोजी या प्रकरणाचा निकाल देणार होते, मात्र त्यांनी या प्रकरणाची सुनावणी 25 जुलैपर्यंत पुढे ढकलली.

कर्ज वसुलीसाठी गरिबांना छळू नका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सूचना

 कर्ज वसुलीसाठी गरिबांना छळू नका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सूचना 

कर्जदारांना आरबीआयकडे करता येणार तक्रार 



  नवी दिल्ली दि.२५



    कर्ज वसुलीसाठी गरिबांना छळू नका अशा स्पष्ट सूचना अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना दिल्या आहेत कर्जवसुलीसाठी बँकांकडून अनेकदा ग्राहकांना धमकावल जात किंवा इतर मार्गाने त्रास दिला जातो. कर्जदारांना हा त्रास जास्त अनेक वेळा सहन करावा लागताे. मात्र, आता बँकांना असं करता येणार नाही. लहान कर्जदारांना परतफेडीसाठी छळू नका, अशा सूचना सर्व सरकारी व खासगी बँकांना दिल्या माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाेकसभेत दिली आहे 


या समस्येबाबत हातकणंगले येथील खासदार धैर्यशील माने यांनी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, सर्वच बँकांनी अशी प्रकरणे संवेदनशीलता राखून माणुसकीच्या भावनेतून साेडविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. कठाेर मार्गांचा अवलंब करू नये.


कर्जवसुलीबाबत काही नियमही करण्यात आले आहेत.त्यानुसार वसुली एजंटने ग्राहकाला सकाळी 

८ ते सायं ७ या वेळेतच कॉल करावा. ग्राहकाच्या ठिकाणीच (पत्त्यावर )भेटू शकतो. रस्त्यात अगर इतर ठिकाणी त्याच्याकडे वसुलीची मगणींक्रता येणार नाही. वसुली अधिकाऱ्याने आपले ओळखपत्र दाखवावे. प्रत्येक ग्राहकांची गोपनीयता पाळावी.त्याची समाजात मान हनिंहोनार नाही याची काळजी घ्यावी ग्राहकाचा शारीरिक वा मानसिक छळ करता येत नाही. असे घडल्यास, ग्राहक थेट आरबीआयकडे तक्रार करू शकतो. त्यामुळे आत सामान्य कर्जादराची बँकांकडून होणारी छळवणूक थांबणार आहे

.

मोदींच्या काळात देशातील कर्जाच्या रकमेत अडीच पटीहून अधिक वाढ

 मोदींच्या काळात देशातील कर्जाच्या रकमेत अडीच पटीहून अधिक वाढ 




मुंबई दि.२५


    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशावरील कर्जा मध्ये मोठी वाढ झाली आहे. हे कर्ज २.६५ पटीने वाढून ही रक्कम आता १५५.६० लाख कोटीं रुपये इतकी झाली आहे.

     ३१ मार्च२०२३ पर्यंत देशात नोंदविल्या गेेलेल्या एकूण जीडीपीच्या ५७.१० टक्के इतके या कर्जाचे प्रमाण आहे. २०१४ साली देशावर ५८.६ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. त्याची रक्कम त्यावेळच्या जीडीपीच्या तुलनेत ५२.२० टक्के इतकी होती. 

    ते २०१८-१९ मध्ये भारत कर्जाच्या व्याजापोटी ५.८३ लाख कोटी रुपये द्यावे लागत होते. २०२२-२३ मध्ये हे प्रमाण वाढून ९.२८ लाख कोटी झाले आहे.

२०१९-२० मध्ये कर्ज १०५.२० लाख कोटी रुपये होते.तर 

२०२०-२१मध्ये १२१.०९ लाख कोटी रुपये झाले तर 

२०२१-२२ मध्ये १५५.६०लाख कोटी रुपये झाले.

९ वर्षांत २.६५ पट अशी विक्रमी कर्जवाढ झाली आहे. म्हणजेच देशावरील कर्ज कमी होण्या ऐवजी ते दर वर्षी वाढतच चालले आहे 

Sunday, July 23, 2023

पिंपरे खुर्द येथील खून प्रकरणातील आरोपींना पाच दिवसाची पोलीस कस्टडी

 पिंपरे खुर्द येथील खून प्रकरणातील आरोपींना पाच दिवसाची पोलीस कस्टडी 



 नीरा दि.२३


      पुरंदर तालुक्यातील नीरा नजीक पिंपरे येथे शुक्रवारी झालेल्या खून प्रकरणा मध्ये सहभागी असलेल्या दहा आरोपींना सासवड येथील न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. यामध्ये मयताच्या पत्नीसह दहा जणांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपासासाठी पोलिसांनी पोलीस कस्टडीची मागणी केली होती.


  पिंपरे येथे शुक्रवारी रात्री हरिश्चंद्र थोपटे यांचा गळा चीरून खून करण्यात आला होता.यानंतर पोलिसांनी काल शनिवारी संध्याकाळी मयताच्या पत्नीसह दहा जणांना अटक केली होती. यामध्ये आरोपींनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली आहे. आज रविवारी या आरोपींना सासवड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची म्हणजेच गुरुवार पर्यंतची पोलीस कस्टडी दिली आहे. या मध्ये गुन्ह्याच्या अनुसंगाणे आणखी काही पुरावे हाती लागतात का? त्याच बरोबर आणखी काही लोकांचा यामध्ये सहभाग आहे का ? त्याचबरोबर गुन्ह्या संदर्भात असलेले इतर पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी कस्टडीची मागणी केली होती. त्यामुळे कोर्टाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.मयताची पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी थोपटे यांना मारण्यासाठी एका टोळीला सुपारी दिली होती. या टोळी संदर्भात पोलीस अधिकचा तपास करीत आहे.याबाबतची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण बापूराव सांडभोर यांनी दिली आहे.

Saturday, July 22, 2023

पिंपरे येथे अनैतिक संबंधातून पत्नीनेच काढला नवऱ्याचा काटा

 पिंपरे येथे अनैतिक संबंधातून  पत्नीनेच काढला नवऱ्याचा काटा



 खुनाचा २ तासात उलगडा : जेजुरी पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी 


नीरा :  23


   नीरा नजीक पिंपरे खुर्द येथे काल शुक्रवारी झालेला खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.तर या खुनात मयताच्या पत्नीचा मोठा सहभाग असल्याचे उघड झाले आहे . या प्रकरणी पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दोन तासात मयताच्या पत्नीसह नऊ जणांना ताब्यात घेतले होते. पोलीस तपासात अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. याबाबत उपा विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी माहिती दिली आहे.

      पिंपरे (खुर्द) येथील बेंदवस्तीत  काल शुक्रवारी (दि.२१) रोजी रात्री आठ  वाजलेच्या चे सुमारास  हरीशचंद्र बजरंग थोपटे (वय ४२ वर्षे ) र यांचा कोणीतरी अज्ञाताने धारदार शस्त्राने कपाळावर, गालावर, हनगुटीवर, गळ्यावर वार करून. खून केला होता या प्रकरणी त्याबाबत मयताचा भाऊ सतिश बजरंग थोपटे यांनी तक्रार दिलेवरून जेजुरी पोलीसात गुन्हा दखल करण्यात आला आहे.


        याप्रकरणी  संशयित आरोपी  प्रणव ढावरे रा. पाडेगाव ता. खंडाळा जि. सातारा यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली. यामध्ये मयत थोपटे याची पत्नी  पुजा हरीशचंद्र थोपटे हीचे मदतीने आरोपी धीरज उर्फ बंटी संजय ढावरे, निकेश विरेंद्रसिंह ठाकुर, हिवरकरमळा  व त्याचे इतर सिध्दांत संभाजी भोसले रा. जेजुरी लवथळेश्वर, सुरेश कांतीलाल कडाळे रा. पाडेगाव फार्म ता. खंडाळा, लखन सुर्यवंशी याचे सोबत कट रचुन खुन करण्याची सुपारी देवुन, खुन केला. असल्याचे सांगितले.हा खून करताना  स्वरूप रामदास जाधव, विशाल चव्हाण, शुभम मचारे यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले, या सर्व आरोपींना ताब्यात घेणेत आले आहे. तर  याब्बतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर हे करीत आहेत. 


      ही कारवाई पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग आनंद भोईट यांचे मागर्दर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड तानाजी बरडे याचे सुचनेप्रमाणे, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, म.पोलीस उपनिरीक्षक रूपाली पवार, पोलीस उपनिरीक्षक पुंडलीक गावडे  आर. एम. साबळे, सर्जेराव पुजारी सह फौजदार झेंडे, संदिप मोकाशी, पो.ना. सोमेश राउत, विठठल कदम,  बनसोडे,  मदने, राजेंद्र भापकर, नानासाहेब कांरडे, आणासाहेब देशमुख, संजय ढमाळ, रेणुका पवार, निलेश करे, सदीप भापकर, प्रविण शेडे, अमोल महाडीक, निलेश जाधव, संदीप पवार, भरत आरडे, विनोद हाके, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भोर यांचे कार्यालयाकडील पो. हवा विशाल रासकर, निलेश सटाले, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेशन शाख पुण ग्रामीण याचेकडील पो.स. ई. ननावरे, पो. हवा. काचन पो. कॉ धीरज जाधव, पो.हवा. कारंडे असे यांनी मिळून केली आहे.


Friday, July 21, 2023

पिंपरे येथील माथाडी कामगाराच्या खून प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

 पिंपरे येथील माथाडी कामगाराच्या  खून प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई 

पोलिसांनी एका महिले सह नऊ संशयितांना घेतले ताब्यात




 दि.२२


         पुरंदर तालुक्यातील नीरा नजीक पिंपरे येथे कोयत्याचा वार करून एकाचा खून करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री हा खून करण्यात आला होता.हरिश्चंद्र बजरंग थोपटे यांचा यामध्ये झाला मृत्यू झाला होता. कोयत्याचा वार करून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यातआला आहे.. हरिश्चंद्र थोपटे हे नीरा येथे माथाडी कामगार म्हणून काम करीत होते.


  दरम्यान या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी काल रात्री लगेच 9 जणांना ताब्यात घेतलंआहे. जेजुरी पोलीस या बाबत तपास करत आहेत . भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, जेजुरीचे पोलीस निरीक्षक सांडभोर आणि जेजुरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करून संशयितांना घटने नंतर अवघ्या तीन तासात जेरबंद केलं आहे. या घटने बाबत पोलीस संशयितांची चौकशी करीत आहेत.हे संशयित पिंपरे,नीरा,आणि पाडेगाव परिसरातील आहेत.तर यातील काही जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.


नवीन अधिकाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी


पुरंदर तालुक्यातील जेजुरी, सासवड या पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. या ठिकाणी आता नवीन आणि तरुण अधिकारी रुजू झालेत.त्याचबरोबर भोर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सुद्धा नवीन अधिकारी आले आहेत हे सर्व अधिकारी तरुण तडफदार आहेत या अधिकाऱ्यांच्या बदली नंतरची ही मोठी घटना आहे. या घटनेचा तातडीने तपास लावण्यात या अधिकाऱ्यांना मोठ यश आले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचं स्थानिकांकडून कौतुक होते आहे.

पिंपरे येथे एकाचा कोयत्याने गळा चिरून खून

 पिंपरे येथे एकाचा कोयत्याने गळा चिरून खून 


  पोलीस घटनास्थळी दाखल 



  नीरा दि.२१


  पुरंदर तालुक्यातील नीरा नाजीक पिंपरे  येथे कोयत्याचा वार करून  एकाचा खून करण्यात  आला आहे.  हरिश्चंद्र बजरंग थोपटे यांचा यामध्ये झाला मृत्यू  झाला आहे.कोयात्याचा वार करून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. जेजुरी पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्यात येतेय...


       याबाबत स्थानिक लोकांनी दिलेल्या माहिती नुसार हरिश्चंद्र बजरंग थोपटे वय ४२ रा.  बेदवस्ती पिंपरे. हे रात्री

साडेसात वाजता नीरा डाव्या कालव्यालरील डाव्या बाजूला गळा चालेल्या अवस्थेत मृत  आढळले.  त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने  वार केल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या गळ्यावर तीन वार करण्यात आले आहेत.. पुणे पंढरपूर महा मार्गालगत दुचाकीवरुन हिरोहोंडा  मोरे सायकल  क्रमांक एम.एच. १२- बी.आर. ७२१९ वरून ते घरी जात होते. त्यांच्या कपाळावर, नाकावर व हणवटी व मान या भागात खोलवर जखमा झाल्याचे दिसून येत आहे.


Sunday, July 9, 2023

पिंपरे येथे दोन दुचाकीची समोरा समोर धडक. एक युवक ठार, तीन जखमी.

 पिंपरे येथे दोन दुचाकीची समोरा समोर धडक.

एक युवक ठार, तीन जखमी. 



 नीरा दि. ९ :- 

वाहतुकीसाठी नेहमीच धोकादायक असलेल्या पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर रविवार (दि.०९) पुन्हा अपघात झाला. 

निरा नजीक पिंपरे (ता.पुरंदर) येथे दोन दुचाकीस समोरासमोर धडकल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी आहेत. याबाबतची माहिती नीरा पोलिसांनी दिली आहे.



 पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा ते वाल्हा दरम्यानच्या निरा डावा कालव्यावरील पुलाजवळ दोन दुचाकी समोरा समोर धडकल्या. या अपघातात किरण रामदास धुमाळ (वय २८) रा. जेऊर, ता.पुरंदर) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मावशी मिना कांतीलाल दरेकर (वय ४०) या जखमी झाल्या आहेत.


 धुमाळ हे आपल्या एम. एच १२ जे. पी.३९३० या दुचाकीवरून निरा येथून जेऊरकडे निघाले होते. जेजुरी बाजूने मोहन विनायक रोंदळे (वय ३२) व भिमा बाळु  मधुकर (वय ३०) रा. शिंदवणे ता.हवेली हे दोघे एम.एच. १२ ए.डी १४९४ दुचाकीवरून भरधाव आले. रोंदळे गाडी चावलत होते. त्यांनी विरुद्ध दिशेला येऊन धुमाळ यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. 

यामध्ये चौघे ही जखमी झाले. किरण धुमाळ यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. धुमाळे हे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये नोकरीस होते. रविवारची सुट्टी असल्याने ते त्यांची मावशी मिना दरेकर सोबत ऊस लागणीसाठी जेऊरला निघाले होते. यावेळी हा अपघात झाला.



पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावरील, अरूंद महामार्ग असलेल्या दौंडज खिंड ते निरा हा मार्ग अत्यंत 

धोकेदायक पालखी महामार्ग झाला आहे. या पालखी महामार्गावर अनेक छोटो- मोठे अपघात सुरू आहेत. मात्र, संबंधित प्रशासनाकडून जाणीवपुर्वक या अरूंद पालखी महामार्गाकडे काणाडोळा होत आहे. 

 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या आगोदर, या पालखी मार्गाची सार्वजनिक बांधकाम मंञी रवींद्र चव्हाण, महसूल मंञी राधाकृष्ण विखे - पाटील, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच आळंदी देवस्थान आदींनी पालखी तळ व पालखी महामार्गाची पाहणी केली होती. 

माञ, यानंतरही या पालखी महामार्गावरील कोणत्याही कामाची दखल घेतली गेल्याचे दिसत नसून, वाल्हे ते निरा हा अत्यंत धोकेदायक अरूंद पालखी महामार्ग रुंदीकरण करण्यासंदर्भात अनेकदा मागणी करूनदेखील शासनाकडून माञ, याची अद्यापपर्यंत दखल घेतली जात नसल्याने, अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला असून, अनेकजन कायमचे जायबंदी झाले आहेत. 

संबंधित विभागाने या घटनेकडे गांभीर्याने घेऊन, वाल्हे ते निरा हा अरूंद पालखी महामार्गाचे रुंदीकरण करून, साईडपट्टी भरून घ्यावी. अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Friday, July 7, 2023

जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबुब पानसरे सशस्त्र हल्यात ठार.

 जेजुरीचे मा. नगरसेवक मेहबुब पानसरे शसस्त्र हल्यात ठार. 



पुरंदर : 


जेजुरी नगरपरिषदेच माजी नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मेहबुब पाणसरे यांच्यावर धारधार तलवारीने प्राणघातक हल्ला झाला होता. पानसरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, खासदार सुप्रिया सुळे यांच्या जवळचे होते. त्यांच्या वर झालेल्या हल्ल्याची व म्रुत्यूच्या घटनेने जेजुरीसह पुरंदर तालुक्यात खळबळ माजली आहे. 


        शुक्रवारी संध्याकाळी जमिन खरेदी विक्री व्यव्हारातून पानसरेंवर काही लोकांनी हल्ला केला होता. त्यांना पुणे शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रात्री नऊच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान म्रुत्य झाल्याची माहिती समोर येत आहे. धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्याण ते गंभीर जखमी होते वार. जमिनीच्या खरेदीविक्री वादातून प्राणघातक हल्ला झाल्याची चर्चा आहे. जेजुरी शहरात पानसरे यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्यावरील प्राणघातक हल्ला व त्यानंतर झालेल्या म्रुत्यूमुळे जेजुरीसह पुरंदर तालुक्यातील जनतेतून हळ हळ व्यक्त होत आहे.

Featured Post

महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, राजकीय हालचालींना वेग

एस. प्रशांत पुणे : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली असून, महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी ...