नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शरद जगताप यांची बिन विरोध निवड

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शरद जगताप यांची बिन विरोध निवड नीरा दि.२२ पुरंदर तालुका आणि बारामती तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न समितीच्या सभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज सोमवारी सासवड येथील बाजार समितीच्या कार्यालयात पारपडलीय..यामध्ये राष्ट्रवादीचे शरद जगताप यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आलीय... या बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवड निवडणुकीत आघाडीने सर्व जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे 10 तर काँग्रेसचे 8 उमेदवार होते.निवडी नंतर आमदार संजय जगताप यांनी सभापती शरद जगताप यांचा सत्कार करून अभिनंदन केलंय... यावेळी राष्ट्रवादीचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे, बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पोमान, शिवसेना तालुका अध्यक्ष अभिजित जगताप,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, दत्ता झुरूंगे,माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे, ...