कपलिंग तुटल्याने निरा येथे रेल्वे गाडीचे झाले दोन भाग

कपलिंग तुटल्याने निरा येथे रेल्वे गाडीचे झाले दोन भाग नीरा दि.१ पुरंदर तालुक्यातील निरा रेल्वे स्टेशनवर मालगाडी येत असताना दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटल्याने मालगाडीचे दोन भाग झाले. अर्धा भाग पाठीमागे राहिलाच राहिला . तर इंजिनचा भाग नीरा रेल्वे स्टेशनवर दाखल झाला होता. याबाबतची घटना समोर आलीय. रविवारी सायंकाळी पुण्याहून आलेल्या मालगाडीच्या बाबत हिंघटना ही घटना घडली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने पुन्हा पुढे गेलेला इंहिनाचा भाग माघारी आणून या दोन्ही रेल्वेभाग जोडले.यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान रेल्वेचे किंवा स्थानिक लोकांच झालं नाही. मात्र रेल्वेचा कपलिंग तुटून अर्धी रेल्वे (म्हणजे गार्डचा भाग) पिंपरे येथील फाटकात उभी राहिली. तर अर्धी गाडी रेल्वे ( इंजिन कडील अर्धा भाग) स्टेशन मध्ये गेली. यामुळे पिंपरे आणि परिसरातील अनेक लोक या ठिकाणी बघ्याच्या भूमिकेत आले होते. मालवाहू गाडी असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा अपघात होण्याच्या धोका नव्हता. कपलिंग तुटलेले रेल्वेचे डबे ऑटोमॅ...