अवघ्या ३० रुपयांत 'ही' कंपनी देतेय ६ OTT सब्सक्रिप्शन; जाणून घ्या जबरदस्त ऑफर
न वी दिल्ली - आजकालच्या जगात केबलसोबत आता OTT फ्लॅटफॉर्मची जोरदार हवा आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांकडून ब्रॉडबँड प्लॅन OTT सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. काही कंपन्यांनी रिचार्जच्या एकत्रित प्लॅनमधून तर काही अतिरिक्त शुल्क भरून OTT सब्सक्रिप्शन ऑफर देत आहेत. अशीच एक ऑफर Excitel कंपनीनं ग्राहकांसाठी आणली आहे. या ऑफरमध्ये अवघ्या ३० रुपयांत ग्राहकांना OTT सब्सक्रिप्शन मिळणार आहे. Excitel या OTT प्लॅटफॉर्मवर रिचार्ज प्लॅनसह सबस्क्रिप्शन एकत्रित देत नाही. कंपनी 300Mbps आणि 400Mbps च्या स्पीड प्लॅनसह OTT पॅक ऑफर करत आहे. कंपनीच्या मते ते ८ , ५० , ००० ग्राहकांशी जोडलेले आहेत आणि वेगाने त्यांचा विस्तार होत आहे. या ऑफर्सची माहिती जाणून घेऊया. Excitel OTT पॅक काय आहे ? कंपनीचा बेस प्लॅन ३० रुपयांपासून सुरू होतो. म्हणजेच तुम्हाला ३० रुपयांमध्ये OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल. याशिवाय ग्राहकांना ६० रुपये , १०० रुपये आणि २०० रुपयांमध्ये OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळते. तुम्हाला या सर्व प्लॅनचा लाभ फक्त हाय-स्पीड इंटरनेट प्लॅनसह मिळेल. ३० रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना Epic...