तब्बल 4122 जागांसाठी भरती; पण तुम्ही किती एलिजिबल? इथे मिळेल A-Z माहिती

मुंबई , 02 डिसेंबर: महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय ? कोणते उमेदवार या पदभरतीचा फॉर्म भरण्यास एलिजिबल असतील ? असेल प्रश्न तुम्हालाही पडले असतील. याच सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ह तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. या पदांसाठी भरती विविध जिल्ह्यांतील तलाठी ( Talathi) एकूण जागा - 4122 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी , हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आण...