पोस्ट्स

दीड वर्षात पती-पत्नीच्या नात्याला पूर्णविराम. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अखेर चर्चा खऱ्या ठरल्या; मराठी अभिनेत्रीचा घटस्फोटासाठी अर्ज, दीड वर्षात पती-पत्नीच्या नात्याला पूर्णविराम

इमेज
  म राठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या खासगी आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दीड वर्षांपूर्वी लग्न झालेली मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता या चर्चा खऱ्या ठरल्या असून मानसी नाईकने याबाबत खुलासा केला आहे. ' हिंदुस्थान टाइम्स ' ला दिलेल्या एका मुलाखतीमुळे तिने या चर्चा खऱ्या असून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे म्हटले आहे. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. तसेच एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट केले होते. तेव्हापासून दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून आले होते. दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या. घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या असून मी याबाबत खोटे बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला झाल्याचे मानसी नाईक हिने सांगितले आहे. मी आता या क्षणाला खूपच दु:खी आहे. नेमके काय चुकले हे सांगणे आता माझ्यासाठी कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत आणि हे सगळे...