१०१ टक्के ही हत्याच! सुशांत राजपूतच्या मृतदेहावर पोस्टमोर्टम करतेवेळी नेमकं काय झालं?
मुं बई - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता कूपर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यानं नवा खुलासा केला आहे. सुशांतच्या मृतदेहावर मुका मार लागल्याच्या खूणा होत्या. हा मृतदेह आत्महत्येचा नसून हत्येचा असल्याचं वरिष्ठांना सांगितलं परंतु माझं काम मी करतो , तुझं काम तू कर. माझं काम केवळ पोस्टमोर्टम करणं आणि मृतदेह शिवणे हेच होते. दीड दोन तास पोस्टमोर्टम झालं. त्याचं व्हिडिओग्राफी केली नाही फक्त फोटोग्राफी केली असं कर्मचारी रुपकुमार शाह यांनी म्हटलं. रुपकुमार शाह यांनी सांगितले की , सुशांत सिंह हा खूप मोठा अभिनेता होता. त्याच्यासारख्या माणसाने आत्महत्या केल्यानं याकडे निरखून बघणं आमचं काम आहे. मी २८ वर्षात ५०-६० मृतदेहाचं पोस्टमोर्टम केले आहे. सुशांतचा मृतदेह पाहिल्यावर ही हत्या असल्याचं दिसलं. हातापायाला मार लागलेला माणूस गळफास लावून घेऊ शकत नाही. सुशांतने आत्महत्या केली असावी हे मला पटलं नाही. मी वरिष्ठांना कळवलं. तेव्हा केवळ पोस्टमोर्टम करून द्या असं काम होतं ते करून दिले असं त्यांनी म्हटलं. टीव्ही ९ च्या मुलाखतीत शाह यांनी हा दावा केला आहे. मृत्यू संशयास्पद असल्याचं मृतदेहाच्...