Posts

Showing posts with the label 14 वर्षाच्या शाळकरी पोराचे इंस्टाग्राम स्टेटस पाहून मास्तरही हादरले

14 वर्षाच्या शाळकरी पोराचे इंस्टाग्राम स्टेटस पाहून मास्तरही हादरले, थेट गुन्हाच दाखल

Image
  14 वर्षाच्या एका शाळकरी पोराने स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावर असं काही स्टेटस ठेवले की सगळेच हादरून गेले. आपल्याच शाळेतील एका 13 वर्षीय मुलीचा फोटो ठेऊन बायको होशील का असे स्टेटस ठेवले. या नंतर या मुलावर थेट गुन्हाच दाखल करण्यात आला. हडपसर पोलिसांनी या मुलावर विनयभंग व पोस्कोनुसार गुन्हा नोंद केला आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , यातील मुलगी आणि मुलगा हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेतात. दोघेही हडपसर परिसरात राहण्यास आहेत. मागील काही दिवसांपासून हा मुलगा मुलीचा पाठलाग करत होता. मैत्री कर अन्यथा उचलून घेऊन जाईल , अशी धमकीही त्याने या मुलीला दिली होती. परंतु मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान मुलगी दुर्लक्ष करते हे पाहून आरोपी मुलाने तिचा फोटो घेऊन माझी बायको होशील का असे स्टेटस इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवले होते. त्यानंतर मात्र मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.