पोस्ट्स

शेतकरी संघटना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बाजार समितीचा संचालक मंडळात तज्ञ संचालकांची नियुक्ती करा : शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे यांची मागणी

इमेज
 बाजार समितीचा संचालक मंडळात तज्ञ संचालकांची नियुक्ती करा : शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे यांची मागणी नीरा दि.२४       कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळामध्ये तज्ञ संचालक नियुक्त करण्याची किंवा स्वीकृत संचालक घेण्याची पद्धत यापूर्वी होती. ती पद्धत पुन्हा सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष दिलीप गिरमे यांनी केली आहे. याबाबतची मागणी करणार पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सहकार विभाग आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्याकडे दिले आहे.       सहकारी क्षेत्रातील बहुतांश संस्थांमध्ये तज्ञ संचालक नियुक्त करण्याची पद्धत पूर्वीपासून सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा अशा प्रकारची तरतूद होती. मात्र २०१६ मध्ये या तरतुदीमध्ये राज्य सरकारकडून बदल करण्यात आला आणि तेव्हापासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर तज्ञ संचालक नियुक्ती करणे बंद झाले. ही पद्धत पुन्हा सुरू करावी आणि तज्ञ संचालक किंवा तज्ञ शेतकरी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष दिलीप गिरमे यां...