आणखी एका रिअल लाइफ हिरोच्या बायोपिकमध्ये दिसणार अक्षय कुमार
मुं बई: बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार कमर्शियल भूमिका साकारण्यासाठीच प्रसिद्ध नाही. तर , तो रियल लाईफ भूमिका साकारण्यामध्ये देखील माहीर आहे. रुस्तम , एअरलिफ्ट , केसरी , पॅडमॅन इत्यादी चित्रपटांच्या माध्यमातून अक्षय कुमारने आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याचबरोबर त्याने रियल लाईफ हिरोच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारून मोठ्या पडद्यावर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. अशा परिस्थितीत अक्षय कुमार अजून एका रियल हिरोच्या बायोपिकमध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय कुमार दिसणार अजून एका बायोपिकमध्ये बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार रिअल लाईफ हिरो बायोपिकमध्ये भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्याने अनेक हिरोंच्या भूमिका करून बॉलीवूडमध्ये स्वतःला सिद्ध केला आहे. अशा तो आता पूजा इंटरटेनमेंट निर्मित बायोफिक मध्ये दिगवंत अभियंता सरदार जसवंत सिंग यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 1989 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या बचत मोहिमेचे नेतृत्व करणारे दिगवंत सरदार जसवंत सिंग हे एक अभियंता होते. त्यांनी कोळसाखान्यातून 65 घाण कामगारांना वाचवले होते. त्यांच्या या कर्तुत्व निमित्त या दिवसाच्या आ...