सावधान !! बिगरशेती प्लॉट घेताय ? खात्री करा तुमची फसवणूक होऊ शकते
सावधान !! बिगरशेती प्लॉट घेताय ? खात्री करा तुमची फसवणूक होऊ शकते बिगर शेती अर्थात एन ए चा खोटा आदेश देऊन शासनाची फसवणूक ; सासवड पोलिसात फिर्याद दाखल. सासवड दि.२८ पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयात बिगर शेतीचा खोटा आदेश देऊन शासनाची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सासवड पोलिसात नायब तहसीदार यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 468,420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आरोपी अल्तापहुसेन बाबासाहेब पाटील याने मार्च 2022 मध्ये हिवरे येथील गट नं.829,830,831,832,833 या शेतजमीन गटाचे फाळणीबारा नुसार प्लॉटच्या नोंदी करता येतील का असे तेथील तलाठी यांना विचारले.यासाठी तलाठी निलम देशमुख यांना त्यांचेकडे असलेली एन.ए. ऑर्डर ही दाखविली. तलाठी यांनी सदर ऑर्डरनुसार नोंद करता येत नाही. तुम्ही कजाप करुन आणा, त्याशिवाय नोंदी धरता येणार नाहीत. असे सांगितले. त्यानंतर मा.उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर उपविभाग पुरंदर यांनी तलाठी यांना या गटाचा पंचानामा करुन मागितल...